• ग्रामसभेचा पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असतो.
  •  ग्रामसभा कमीत कमी सहा जास्तीत जास्त बारा वेळा भरवली जाते .
  • ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सात सदस्य जास्तीत जास्त 17 सदस्य असतात.
  •  ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा एकवीस वर्षे पूर्ण असावी लागते.
  • ग्रामपंचायतीसाठी प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धती अवलंबलेली असते .
  • ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असून तो प्रशासकीय अधिकारी असतो.
  •  ग्रामपंचायतीमधील सदस्य व सरपंच कालावधी पाच वर्षाचा असतो.
  • ग्रामीण स्थानिक शासन संस्था यांना एकत्रितपणे पंचायत राज असे म्हणतात.

  • जिल्हा नियोजन आयोगाची स्थापना 1974 रोजी झाली 
  • त्यानुसार या आयोगाचे अध्यक्ष पालकमंत्री ,उपाध्यक्ष विभागीय आयुक्त, सचिव जिल्हाधिकारी हे असतात.
  • प्रशासन व्यवस्था हा घटक समाजाच्या दृष्टीने उपयुक्त असतो.
  •  केंद्रस्तरावर केंद्र प्रशासन हे काम पाहते राज्यस्तरावर राज्यशासन काम पाहते.
  • स्थानिक स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फतीने स्थानिक प्रशासन काम पाहते.
  • स्थानिक स्वराज्य संस्था या आपले कायदे बनवू शकत नाहीत वरिष्ठांनी केलेले कायदे अमलात आणतात 
  • वॅरन हेस्टींग  गव्हर्नर जनरल ने 1772 मध्ये पहिल्यांदाच जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती केली.
  •  नंतर  1773 मध्ये रेग्युलेटिंग एक्ट हा कायदा अस्तित्वात आला. 1984मध्ये रेग्युलेटिंग ॲक्टमधील त्रुटी दूर करण्यासाठी पिट्स इंडिया अॅक्ट अस्तित्वात आला.



  • 1882 मध्ये लॉर्ड रिपन या व्हॉइसरायने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला .
  • त्यानेच तालुका बोर्ड व जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना केली.
  •  या बोर्डावर जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी नियुक्त करण्यात आला म्हणून आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात.
  • 1935 चा भारत प्रशासन कायद्यानुसार देशांमध्ये 1937 मध्ये प्रांतिक सरकारच्या निवडणुका घेण्यात आल्या.
  • 1947 मध्ये मुंबई हे राज्य अस्तित्वात आले
  • बाळ गंगाधर खेर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.
  •  1953 मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर प्रांतरचना आयोगाची रचना करण्यात आली .
  • 1 ऑक्टोंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार देशातील पहिले घटक राज्य आंध्र प्रदेश हे अस्तित्वात आले.
  • 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई व कर्नाटक राज्याची स्थापना झाली.
  • यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.
  •  त्यांच्या आत्मचरित्राचे नाव कृष्णाकाठ हे होय.
  • यांचे समाधीस्थळ प्रीतीसंगम कृष्णा व कोयना नदीच्या संगमावर आहे हे कराड या गावी वसलेले आहे.
  • 1956 मध्ये संयुक्त  महाराष्ट्र चळवळीची सुरुवात झाली.
  •  एम एस जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ अस्तित्वात आली.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे राज्य निर्माण व्हावे याकरिता त्यांनी आंदोलने केली.
  •  एकशे पाच जणांचे हुतात्मे दिल्यानंतर 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुंबईसह निर्मिती करण्यात आली.
  •  स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.
  •  तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने बलवंतराय मेहता समितीने सादर केलेल्या अहवालाची मूल्यांकन करण्यासाठी व महाराष्ट्रासाठी पंचायत राज व्यवस्था सुरु करण्यासाठी समिती नेमली.
  • वसंतराव नाईक समितीने त्यांचा अहवाल 1961 मध्ये राज्य शासनास सादर केला वसंतराव नाईक समितीच्या अहवालानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अस्तित्वात आला.
  • 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र शासनाने पंचायत राज व्यवस्था स्वीकारली व पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे नववे राज्य ठरले.

  • महाराष्ट्रात ग्रामपंचायती या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या.
  •  1965 मध्ये महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
  • 1965 मध्ये महानगरपालिका व नगरपालिका अधिनियम अस्तित्वात आला.
  • 1966 मध्ये जमीन महसूल अधिनियम हा राज्यात अस्तित्वात आला.
  • 1967 मध्ये ग्राम पोलीस अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला.
  • पंचायतराज व्यवस्थेमध्ये सर्वात पायाभूत घटक ग्रामपंचायत आहे.
  •  दोन किंवा अधिक गावांसाठी स्थानिक शासन व्यवस्था असलेल्या ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.
  • ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात.
  •  ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो.
  •  ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषद करते.
  •  गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या बैठकीला ग्रामसभा असे म्हणतात.
  • ग्रामपंचायत आणि ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवत असतो.