नमस्कार मंडळी या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शिक्षक दिन का साजरा केला जातो. तर मंडळी आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. देशाच्या जडणघडणीमध्ये अनेक नेत्यांनी आपले योगदान दिले, यामध्ये देश स्वातंत्र व्हायच्या पूर्वीही दिले तर देश स्वतंत्र झाल्यानंतरही अनेकांनी योगदान दिले. यामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे.  डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ इ.स. १९५२ - इ.स. १९६२ असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तीरुत्तनी या ठिकाणी झाला.


राधाकृष्णन यांनी त्यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते असे सांगितले पहिला प्रश्न असा की नीतिमान पण चिकित्सक,  विज्ञानभिमुख पण अध्यात्मप्रवण असा माणूस कसा तयार करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा कसा उपयोग होऊ शकेल?
 दुसरा प्रश्न असा होता प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला अत्याधुनिक भाषेमध्ये आधुनिक पद्धतीने कशा पद्धतीने समजावून सांगता येईल? भारतीय तत्वत चिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगायचे? त्याच पद्धतीने कसे पटवून द्यायचे?
व तिसरा प्रश्न असा होता की मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती असेल कुणाशी ही याच तीन प्रश्नांच्या अनुरोध करून बोलत असत. असे नरहर कुरुंदकर यांनी लिहिले आहे.

भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून त्यांना ऑक्सफर्ड मध्ये नावाजले गेले त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट हा पुरस्कार ठेवला आहे.
 डॉक्टर राधाकृष्णन यांनी जवळपास 47 ग्रंथांचे लेखन केले यामध्ये त्यांचे अनेक ग्रंथ गाजलेले आहेत ते विद्यार्थ्यांना उद्युक्त करण्यासाठी उपयुक्त आहेत.
  • An Anthology (Of Radhakrishnan Writings) (1952)
  • The Bhagavadgita (1948)
  • The Brahma Sutra: The Philosophy of Spiritual Life (1960)
  • The Creative Life (1975)
  • The Concept of Man (1960)
  • The Dhammapada (1950)
  • East and West in Religion (1933)
  • East and West: Some Reflections (First series in Bently Memorial Lectures) (1955)
  • Education, Politics and War (A collection of addresses) (1944)
  • Eastern Religions and Western Thought (1939)
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या जन्मदिवस आला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा सांगितली होती. जगात शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला शिक्षक दिन साजरे केले जाते. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सितंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या तिरुत्तनी गावांमध्ये ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याचा आवड होती. ते  स्वामी विवेकानंदन पासून प्रभावित झाले होते. राधाकृष्णन यांचं निधन 17 एप्रिल 1975 रोजी चेन्नई येथे झाला.  


जगात शिक्षक दिन पाच ऑक्टोबरला साजरे केले जाते. युनेस्कोने 1994 मध्ये शिक्षकांचे कार्याला सलाम करण्यासाठी पाच ऑक्टोबरला विश्व शिक्षक दिनासाठी मान्यता दिली. सिंगापूर मध्ये सप्टेंबर मध्ये पहिल्या शुक्रवारी शिक्षक दिन साजरा केला जातो.  तसेच अफगाणिस्तानमध्ये 5 ऑक्टोंबरलाच शिक्षक दिन साजरा केला जातो. सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना भारतातील पहिली महिला शिक्षक म्हणून ओळखले जाते त्यांनी मुलींच्या व महिलांच्या शिक्षणासाठी आपले योगदान दिले आहे. आपल्याला सांगू इच्छितो की चीनमध्ये 10 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. तर रुस मध्ये पाच ऑक्टोबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.
इराणमध्ये दोन मेला 1980 प्रोफेसर आयातोल्लाह मोर्तेजा मोतेहारी  यांच्या हत्येनंतर दोन मेला शिक्षक दिन साजरा केला जातो. मलेशियामध्ये शिक्षक  दिनाला गुरु या नावाने ओळखले जाते. जो 16 मेला साजरा केला जातो. थायलंडमध्ये 16 जानेवारीला तर तुर्कीमध्ये 24 नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये सहा मेला हा शिक्षक दिन साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षक दिन ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी साजरा केला जातो. अर्जेंटिना मध्ये शिक्षक दिन 11 सप्टेंबरला साजरा केला जातो. वियतनाम मध्ये 20 नोव्हेंबरला पेरूमध्ये सहा जुलैला तर पाकिस्तानमध्ये पाच ऑक्टोबरला हा शिक्षक दिन साजरा केला जातो.