पंचायत समिती | स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्त्वाची माहिती
- पंचायत राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणजे पंचायत समिती होय.
- पंचायत समिती सभापती व उपसभापती यांची निवड 2.5 (अडीच) वर्षांसाठी असते.
- पंचायत समितीचे मुख्यालय तालुक्याच्या ठिकाणी असते पंचायत समितीचे अध्यक्ष स्थान सभापती भूषवतात.
- पंचायत समितीमध्ये प्रशासकीय प्रमुख म्हणून गट विकास अधिकारी असतात.
- BDO (गटविकास अधिकारी) यांची नेमणूक राज्य शासन करते.
- पंचायत समितीतील सभासदाची निवड गट विकासातील मतदारांकडून होते.
- पंचायत समिती सभासदांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.
- पंचायत समिती प्रशिक्षणाची विभागणी सात भागात करण्यात आली आहे.
- पंचायत समितीचे सचिव गटविकास अधिकारी असतात.
- पंचायत समितीला उत्पन्नाची स्वतंत्र साधन नसते.
- BDO नां मदत करणारा अधिकारी विस्तारअधिकारी असतो.