मंडळी वाहन चालवताना आता विचार करून वाहन चालवणे गरजेचे आहे. कारण भारत सरकारने आरटीओचे नियम बदललेले आहेत आणि आता दंडात भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढ खूप मोठ्या रकमेच्या स्वरूपात असून ही सामान्य लोकांना झेपेल एवढी नाही त्यामुळे इथून पुढे वाहन चालवताना आपण किती जागरूक असावं हे माहीत असणे  गरजेचे आहे.ह्या दंडाची रक्कम आपल्याला माहीत असावे म्हणून ही पोस्ट.


  •  तर मंडळी कोणावर किती दंड असेल हे आपण पाहू
अल्पवयीन च वाहन चालक या नियमाचे उल्लंघन झाले असल्यास पूर्वी आपल्याला एक हजार रुपये दंड होता तो आता वाढवून 25 हजार रुपये इतका करण्यात आला आहे. विनापरवाना जर गाडी आपण चालवत असेल तर पूर्वी पाचशे रुपये दंड होता तर यात पाच हजार रुपये दंड आता करण्यात आलेला आहे. जर आपण विना हेल्मेट गाडी चालवत असाल तर पूर्वी शंभर रुपये दंड होता आता एक हजार रुपये करण्यात आलेला आहे. आपण कार चालवत असाल आणि विना सीट बेल्टच कार चालवत असाल पूर्वी शंभर रुपये दंड होता तो आता एक हजार रुपये करण्यात आलेला आहे.
 आपण गाडी चालवताना वेळ वाचावा म्हणून मोबाईल वापरतो परंतु हे मोबाईल वापरत असताना आपण नियमाचे उल्लंघन करत आहोत हे आपण विसरत असतो. पण इथून पुढे गाडी चालवत असताना मोबाईल वापरणे हे आपल्याला खूप महागात पडू शकते आणि यात आपल्याला जवळपास पाच हजार रुपये मोजावे लागतील पूर्वी या दंडाची रक्कम 1000 होती.
 संध्याकाळ झाल्यावर आपल्याला इकडे तिकडे तळीराम दिसतातच ते स्वतःचा तोल आवरत कसे चालतात आपल्याला माहित आहे. परंतु हेच तळीराम गाडी हाकताना मोठे अपघात घडवून आणू शकतात. त्यामुळे पूर्वी मध्यपान करून गाडी चालवत असताना 2000 रुपये दंड होता परंतु आता हा दंड पाचपट वाढवून दहा हजार रुपये करण्यात आलेला आहे. त्यानंतर विना परमिट वाहन चालवत असाल तर पूर्वी पाच हजार रुपये दंड होता तो आता दहा हजार रुपये करण्यात आलेला आहे.
आपण आपले पैसे वाचावेत म्हणून गाडीचा विमा उतरवण्यास टाळाटाळ करतो परंतु आता जर आपली गाडी सापडली तर विमा रकमेएवढे रक्कम दंड म्हणून घेण्यात येत आहे. 1000 रुपये दंड होता तो आता दुप्पट करण्यात आलेला आहे म्हणजेच दोन हजार रुपये करण्यात आलेला आहे.
 कॉलेज कुमार किंवा इतर कोणीही असो गाडी सुसाट चालवणे आणि त्याची मजा घेणे याच एकदा एकदा अनुभव घेतोच परंतु ही गाडी सुसाट चालवणे आता महागात पडणार आहे. त्यासाठी दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पूर्वी ही रक्कम एक हजार रुपये होती. धोकादायक वाहन चालवणे ह्या पूर्वी एक हजार रुपये दंड होता तो आता वाढून पाच हजार रुपये करण्यात आलेला आहे. जर वेग मर्यादा ओलांड त असाल तर आपल्याला दोन हजार रुपये दंड बसू शकतो हा दंड पूर्वी चारशे रुपये इतका होता आपल्या गाडीची कागदपत्रे आपल्या गाडीजवळ नेहमी ठेवा किंवा आपल्या जवळ नेहमी ठेवा. कारण आता हा दंड दहा हजार रुपये करण्यात आलेला आहे. पूर्वी दंडाची रक्कम पाच हजार होती.  
आपण आपल्या गाडीला हॉर्न बसवून, सायलेन्सर वेगळे बसवून गाडीचे कर्कश आवाज काढत असतो. परंतु आता हे कर्कश आवाज आणि इतर प्रकारचे प्रदूषण केल्यास दहा हजार रुपये दंड बसू शकतो. पूर्वी ही रक्कम एक हजार रुपये होती त्यापेक्षा अधिक भार वाहून नेणे यासाठी चार हजार रुपये दंड पूर्वी होता तो आता वीस हजार रुपये करण्यात आलेला आहे. त्यासोबत दवाखान्याजवळ हॉर्न वाजवणे याला पूर्वी काहीच दंड नव्हता त्यासाठी आता आपल्याला एक हजार रुपये पर्यंत दंड मोजावा  लागू शकतो.
 ट्रॉलीला रिप्लेकटर लावली नसेल तर अडीच हजार रुपये दंड पूर्वी होता तो आता पाच हजार रुपये करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने विनापरवाना वाहन चालविल्यास तीन महिन्याची आपल्याला शिक्षा होऊ शकते त्यासोबत विना हेल्मेट वाहन चालविल्यास तीन महिन्यासाठी परवाना रद्द करण्याची तरतूद केलेली आहे.
 तर मंडळी आपलं वाहन आपण कसं चालवायचं हे आपल्याला माहीत पाहिजे आणि हे दंड भरण्यापासून कशा आपल्याला वाचवायचं यासाठी विमा हेल्मेट गाडीची कागदपत्रे परत वर सांगितलेल्या सर्व गोष्टींची मर्यादा पाळणे हे आपल्यासाठी आवश्यक आहे तर मंडळी ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण असेल तर शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.