नमस्कार मंडळी, मराठी विषयाचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे वर्णमाला या विषय आज आपण पाहणार आहोत.
मराठी वर्णमालेत प्रथम तीन प्रकार पडतात
- र्हस्व-दीर्घ
- सजातीय-विजातीय
- संयुक्त स्वर
- र्हस्व-दीर्घ
■ स्वरांचा उच्चार करताना ज्या स्वरांना उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना 'ऱ्हस्व स्वर' असे म्हणतात.
उदाहरणार्थ अ, इ, उ, ऋ, लृ
■ ज्या स्वरांचा उच्चार करत असताना अधिक वेळ लागतो त्या चोरांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ आ, ई, ऊ
र्हस्व-दीर्घ
अ - आ
इ - ई
उ - ऊ
ऋ
लृ
- सजातीय - विजातीय
उच्चार करत असताना एकाच उच्चारताना तून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात तसेच अभिनव उच्चारतानातून निघत असणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
सजातीय - विजातीय
अ - आ : अ - इ
इ - ई : इ - उ
उ - ऊ
- संयुक्त
ज्या स्वरांचा उच्चार स्पष्ट आणि मोकळा व स्वयंपूर्ण होत असला तरी प्रत्येक सुवर दोन स्वरांच्या संयोगामुळे होत असतो त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
हे सर्व दीर्घ स्वर असतात.
ए = अ + इ/ई
ऐ = आ + इ/ई
ओ = अ + उ/ऊ
औ = आ + उ /ऊ
◆ स्वरादी
अनुस्वार ंं , विसर्ग ः
◆ व्यंजन
वर्णमालेतील अक्षरांचा उच्चार करत असताना ज्या वर्णाचा उच्चार स्वर यांच्या साह्याने पूर्ण होतो त्यास व्यंजने असे म्हणतात.
व्यंजनात एकूण पाच प्रकार असतात ती पुढीलप्रमाणे
- स्पर्श व्यंजन (25)
- अर्धस्वर (4)
- उष्मे / घर्षक (3)
- महाप्राण (14)
- स्वतंत्र (1)
- स्पर्श व्यंजन (25)
कठोर | मुर्दू |अनुनासिक
क्, ख्, ग्, घ्, ङ्
च्, छ्, ज्, झ्, ञ्
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
त्, थ्, द्, ध्, न्
प्, फ्, ब्, भ्, म्
- अर्धस्वर (4)
य - इ
र - ऋ
ल - लृ
व - उ
- उष्मे / घर्षक (3)
श
ष
स
- महाप्राण (14)
ह्
आणि इंग्रजी टायपिंग करताना H येणारे शब्द ( अपवाद च)
ख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, श्, ष् , स्
- स्वतंत्र
ळ
◆ इंग्रजी भाषेतून आलेले 2
ॲ, ऑ
मो. रा. वाळंबे हे ॲ, ऑ याना स्वरादी म्हणत.
◆ वर्णमालेत स्थान नाही.
क्ष् , ज्ञ्
डॉ. श्रीपाद सबनीस यांनी क्ष व ज्ञ ला वर्णमालेत स्थान देण्याची मागणी केली. (अखिल भारतीय साहित्य संमेलन 2016 चे अध्यक्ष)