भारताचा भूगोल | स्पर्धा परीक्षा नोट्स
- भारतात 28 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश आहेत.
- भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांक राजस्थानचा लागतो त्यानंतर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो
- महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो
- तर भारतातील गोवा हे राज्य सर्वात लहान राज्य आहे.
- भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे
- आशिया खंडातील दक्षिण भागात मध्यवर्ती आहे.
- कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाते भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते.
 |
indian geography |
- भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार 8 अंश 4 इंच उत्तर ते 37 अंश 6 इंच उत्तर आहे एकूण अक्षवृत्तीय विस्तार 29 अंश 2 इंच इतका आहे.
- तर रेखावृत्तीय विस्तार 68 अंश 7 इंच पूर्व ते 97 अंश 24 इंच त्याचा एकूण रेखावृत्त विस्तार 29 अंश 17 इंच आहे.
- हिंदी महासागराचे नाव हे देशाच्या नावावरून ठेवले आहे. असा जगातील एकमेव महासागर आहे.
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे.
- क्षेत्रफळ सुमारे 32 लाख 87 हजार 263 चौरस किलोमीटर आहे.
- भारताची भू सीमा जवळपास पंधरा हजार दोनशे किलोमीटर लांबीचे आहे आणि सागरी भूसीमा 7517 किलोमीटर लांबीचे आहे.
- काश्मीरच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत 3214 किलोमीटर आंतर आहे तर गुजरातच्या पश्चिमेकडून अरुणाचल प्रदेशच्या पुर्व टोकापर्यंत अंतर 2993 किलोमीटर आहे.
- पूर्वेला अरुणाचल प्रदेशातील किबिथू आणि पश्चिमेला गुजरात मधील मोठा येथिल सूर्योदय आतील वेळेचा फरक सुमारे 116 मिनिटांचा आहे.
- लडाख प्रदेशातील लेह येथे सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक चार तासाचा आहे.
- कन्याकुमारी येथे हे सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यातील फरक सुमारे 45 मिनिटांचा आहे