ग्राम सेवक
- ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या बैठकीस हजर राहून येथे वृत्त लिहिणे
- जन्म-मृत्यू विवाह यांची नोंदणी करणे
- पाणीपट्टी घरपट्टी इतर कर जमा करणे
ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास खात्याचा वर्ग-3 चा सेवक असतो.तसेच हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो. राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला किंवा दोन किंवा अधिक ग्रामपंचायतीला मिळून ग्रामसेवकाची नियुक्ती केली जाते.
ग्रामसेवक हे पद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नेतृत्वाखाली जिल्हा निवड मंडळाकडून नियुक्त केले जाते. ग्रामसेवकास वेतन हे जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून दिले जाते. ग्रामसेवकाची बदली, नेमणूक, पदोन्नती, बडतर्फ याबद्दलची सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतात.
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीमधील प्रशासकीय अधिकारी असतो. ग्रामसेवकावर नियंत्रण नजीकच्या पंचायत समितीमधील गट विकास अधिकारी यांची असते. त्यानंतर जिल्हा परिषद मधील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रण असते.
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते.
Gramsevak mahiti in marathi