प्रश्न सुटण्यासारखा असेल तर
काळजी नका करु,
आणि तो न सोडवता येणारा असेल तर
काळजी करुन काय होणार?
---------------------------
कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!
कारण एक जुनी म्हण आहे “जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.
------------------------
भूतकाळासाठी रडण्यापेक्षा
वर्तमानकाळाशी लढण्यात
आणि भविष्याच्या शिखरावर
चढण्यातच खरा पराक्रम आहे…
---------------------------
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो...
---------------------------
अगदी सरळमार्गी असणे
हेही एक प्रकारचे पापच आहे.
हे पाप कालांतराने मनुष्याच्या
दुर्बलतेचे कारण बनते….
---------------------------
स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.
---------------------------
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
---------------------------
---------------------------
एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते असे म्हणतात..
पण
कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…
---------------------------
जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
आल्यासाठी एक पान राखाव..
------------------------
कळी सारखे उमलुन फुलासारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
आश्रु असो कोणाचेही
आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे …
व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्षे नक्की वाढतील.
पण लक्षात घ्या, की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरूणपणातली नव्हे!
---------------------------
गोड माणसांच्या आठवणींनी…
आयुष्य कस गोड बनत…
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत…
शुभ प्रभात ..
शुभ दिवस…
---------------------------
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा…
---------------------------
माणुस " कसा दिसतो" ह्यापेक्षा,
" कसा आहे" ह्याला महत्व असतं...
कारण शेवटी,
सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य
मरणापर्यंत असतं.
---------------------------
काही फायदा नाही इथे प्रामाणिक पणे वागण्याचा...
समोरची व्यक्ती पण तितकीच प्रामाणिक नसताना...!!!
---------------------------
हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते .