सुशांत सिंह राजपूत चा छिछोरे हा चित्रपट आज प्रसिद्ध झाला तर मंडळी पाहूया छिछोरे हा चित्रपट कसा आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी आहेत तर या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, ताहीर राज भसीन, वरूण शर्मा, तुषार पांडे वरूण पोलिषेट्टी इत्यादी कलाकार आहेत.
तर मंडळी, या चित्रपटाची कथा ही महाविद्यालयीन जीवनावर आधारित आहे. कॉलेजमध्ये साथ मित्र शिकत असतात आणि त्या मित्रांची गोष्ट म्हणजे हा चित्रपट. विविध घटनाक्रम घडत असताना कथा पुढे सरकत जाते आणि अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. यामध्ये मैत्रीकडे पाहण्याचा आणि हाताळण्याचा दृष्टिकोन कसा असावा. हे दाखवण्यात आलेले आहे. महाविद्यालयीन जीवनात मौज मज्जा मस्ती या सारखे जीवनातील चढ-उतार येतच असतात.तसेच वेगवेगळे अंदाज वातावरण आणि भाषा या गोष्टींना या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलेली आहे.
मैत्रीण निभावत असताना प्रेम रुसवे-फुगवे भांडणे इत्यादी गोष्टीही यात नमूद करण्यात आले आहेत चित्रपटातील गाणी तर सोशल मीडियावर फार लोकप्रिय झाले असून संगीत खूपच श्रवणीय आहे या कॉमेडी इमोशन रोमान्स यासारखा मसाला सर्व पाहायला मिळत आहे त्यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हॉस्पिटल मधील दृश्य कलाकार यांच्यातील संवाद हे पाहताना चित्रपटात काय होईल याचा अंदाज येत राहतो कथानकाला कोणतं वळण मिळेल हेही आपल्याला थोडं थोडं समजत जातात या चित्रपटात मुलाच्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या सुशांत त्याच्या मित्रांचे टीम आपल्या मुलाला आजारपणातून बरं करण्यासाठी आणि तो अयशस्वी नाही हे जाणून देण्यासाठी आणतो. म्हणजेच आता ही मित्र उतारवयात होती. परंतु त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील किस्से आणि करामती ह्या द्या तितक्यात तरुण आहेत आणि यामुळेच चित्रपटाला खरी रंगत येते.
सुशांत सिंह राजपूत श्रद्धा कपूर ताहिर राज भसीन वरून शर्मा तुषार पांडे यांनी साकारलेली भूमिका लक्षात राहण्यास योग्य आहे. हा चित्रपट आपल्या कॉलेजला आईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महत्वपूर्ण आहे. जर आपल्याला कॉलेजचा पुन्हा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहावाच.
थ्री इडियट, अंदाज अपना अपना, जिंदगी ना मिलेगी दोबारा अशा चित्रपटांकडून मैत्रीकडे पाहण्याचा मित्रांना हाताळण्याचा कॉलेज लाईफ असे फ्रेम दाखवण्यात आले आहेत. तसेच फ्रेम्स या चित्रपटातही पाहता येतात चित्रपटाची सुरुवात पाहत असताना आपल्याला स्टुडन्ट ऑफ द इयर या करण जोहरच्या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.