केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने डिसेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ची तारीख जाहीर केली आहे.
CTET परीक्षेसाठीच्या तारखा, परीक्षेचे स्वरूप, आणि त्यासाठी लागणारी अन्य माहिती देण्याचा हा प्रयत्न
◆ CBSC ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे CTET परीक्षेची माहिती दिली.
ही परीक्षा ८ डिसेंबर २०१९ रोजी (रविवार) होणार असल्याचे सीबीएसईने जाहीर केले आहे.
◆ यंदा ही परीक्षा २० भारतीय भाषेत घेतली जाणार आहे तसेच ११० शहरात ही परीक्षा होणार आहे.
◆ परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, परीक्षाची फी, परीक्षेसंबंधी ठिकाण ही माहिती मिळवण्यासाठी CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर १९ ऑगस्टपर्यंत माहिती मिळते.
◆ शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत सर्व केंद्र शासनाच्या केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, दिल्ली शिक्षा बोर्ड आणि महाराष्ट्र राज्यातील सगळ्या शाळेमध्ये CTET/TET उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
◆ CTET परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60 % गुण आवश्यक.
◆ या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचे असून त्याची फी भरावयाची शेवट तारीख 23 सप्टेंबर पर्यंत आहे.
◆ या परीक्षेत अनुसूचित जाती/जमाती, ओबीसी, दिव्यांग या उमेदवारांना ५ गुणांची सवलत देण्यात आली आहे.
◆ CTET परीक्षेत पेपर 1 व पेपर 2 हे दोन्ही 150 गुणांचे असतात.
◆या परीक्षेमध्ये 150 प्रश्न 150 गुणांसाठी असतात महत्वाचे म्हणजे या परीक्षेमध्ये नकारात्मक गुणदान पद्धती नाही.
◆ यामध्ये शालेय शिक्षणाशी निगडित 5 विषय प्रत्येकी 30,30 गुणांचे असतात.
परीक्षेचे स्वरूप
पेपर 1
- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 गुण)
- मराठी भाषा (30 गुण)
- इंग्रजी व्याकरण (30 गुण)
- गणित (30 गुण)
- परिसर अभ्यास (30 गुण)
एकूण 150 गुणांसाठी हा पेपर असून ही परीक्षा D.T.Ed व समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेल्याना देता येते.
पेपर 2
- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 गुण)
- मराठी भाषा (30 गुण)
- इंग्रजी व्याकरण (30 गुण)
- गणित व विज्ञान (60 गुण)
- सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)
हा पेपर व पेपर 1 B.Ed असलेल्यांना देता येतो त्यासोबत समकक्ष इतर परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांना देता येतो आपण पदवी व D.T.Ed उत्तीर्ण असाल तरीही हा पेपर देता येतो.
अभ्यासक्रम
पेपर 1
- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगट बालकांशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
- मराठी भाषा
यामध्ये मराठी व्याकरणाच्या विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.तसेच मराठी कविता व उतारा यावर आधारित प्रश्न येतात.
- इंग्रजी व्याकरण
- गणित
यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन,विभाज्यता,लसावी, मसावी, काळ-काम-वेग, शेकडेवारी, नफा-तोटा,सरासरी ,व्याज इत्यादी घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
- परिसर अभ्यास (30 गुण)
यामध्ये विज्ञान, भूगोल व इतिहास यावर मूलभूत माहितीवर आधारित प्रश्न विचारले जातात.
पेपर 2
- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
- मराठी भाषा
- इंग्रजी व्याकरण
पेपर दोन देतांना ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना घटक चार विज्ञान व गणित विषयावरील प्रश्न सोडवावे लागतात आणि ज्यांची पदवी कला शाखेतील आहे त्यांना घटक पाच समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकवरील प्रश्न सोडवावेत.
- गणित व विज्ञान
यात गणितसाठी 30 गुण व विज्ञानसाठी 30 गुण आहेत.
गणितात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन,विभाज्यता,लसावी, मसावी, काळ-काम-वेग, शेकडेवारी,नफातोटा,सरासरी ,व्याज इत्यादी घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
- सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल
इतिहास विषयात भारताचा इतिहास
भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोल व पृथ्वीची रचना यावर आधारित मूलभूत प्रश्न विचारले जातात.
CTET , TET, TAIT साठी कलासेस
Gurukul Academy for TAIT and TET Classes
Near of Kotak Mahindara Bank Opposite to Parekh Medical Store, Sangli, Maharashtra 416416
098228 60578