जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

2021 मध्ये CTET चा अभ्यास करताना लागणारी पुस्तके । Books required for studying CTET

तर मंडळी, आज आपण सीटीईटी साठी लागणारे पुस्तके करणार आहोत. यामध्ये आपल्याला दोन पेपर द्यावयाचे आहेत. यासाठी दोन पेपर असतात त्यामध्ये पहिला पेपर वर्ग पहिली ते पाचवी पर्यंत असतो. त्यामध्ये बाल विकास एवं शिक्षाशास्त्र, भाषा एक म्हणजेच हिंदी, भाषा दोन इंग्रजी, गणित आणि पर्यावरण अध्ययन असे विषय असतात. तर मंडळी या परीक्षेची तयारी करताना नवीन नियमांकडे लक्ष द्यावे लागेल.2019 सालि आलेल्या नवीन नियमानुसार आपल्याला मराठी विषय निवडता येतो. हा मराठी विषय तीस मार्क आला असून  दुसरा विषय आपल्याला हिंदी निवडता येतो त्याला इंग्रजी विषय आहे. तुम्हाला कोणत्या मिडीयम मध्ये पेपर सोडवायचा आहे. हा ऑप्शन भाषा निवडता येतो त्या वर्षी 110 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार असून सुमारे वीस भाषांमध्ये हे पेपर आपल्या देता येणार आहेत. त्यामुळे मराठी या विषयाचे हक्काचे मार्क आपल्याला मिळणार आहे. यामध्ये मराठी विषयातील व्याकरण आणि  उतार्यावरील प्रश्न असे प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे मराठी विषयाचा अभ्यास करताना कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा या कोड्यात आपण पडतो. परंतु आज मी तुम्हाला कोणते पुस्तक अभ्यासावे लागेल हे सांगणार आहे.


खाली विषय प्रमाणे पुस्तके यादी दिलेली आहे.
 • बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र या विषयाबद्दल अरिहंत बुक पब्लिकेशन चे पुस्तक हिंदीमध्ये उपलब्ध आहे सोबतच इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे पण मराठीमध्ये अभ्यास करायचा असल्यास के सागर पब्लिकेशन यांचे पुस्तक वापरता येते.

  
 •  मराठी भाषा यासाठी बाळासाहेब शिंदे आशा लता गुट्टे के सागर यापैकी पुस्तक वापरता येते
 •  इंग्रजी व्याकरणासाठी रेन अँड मार्टिन के सागर पब्लिकेशन किँवा बाळासाहेब शिंदे यांची पुस्तक वापरता येते.
 •  गणित विषयासाठी पंढरीनाथ राणे किंवा अरिहंत प्रकाशन चे पुस्तक वापरता येते.
 • परिसर अभ्यास याविषयी आर्यांच्या पुस्तकात विस्तारित माहिती दिलेली आहे तुम्ही ती अभ्यास करू शकता.

 या विषयांचा अभ्यास करताना चौथी पासूनचे पुस्तके दहावीपर्यंत अभ्यासल्यास विषयाचे आकलन होण्यास खूप मदत होते तसेच विषयानुसार येणारे प्रश्न आहे पाचवी ते दहावी यांस NCERT च्या पुस्तकातूनच  प्रश्न घेतले जातात   आता पेपर-2 साठी उपयुक्त असणारी पुस्तके पाहूयात
 • यामध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र हे देखील तीस मार्क जात असून यामध्ये काठिण्य पातळी वाढते या पेपरसाठी अरिहंत प्रकाशन चे पेपर-2 साठी असणारे पुस्तक उपयोगी ठरते मराठीमध्ये अभ्यास असणार असाल तर डॉक्टर शशिकांत अन्नदाते के सागर पब्लिकेशन पुस्तक उपयुक्त आहे
 • मराठी भाषा यासाठी बाळासाहेब शिंदे आशा लता गुट्टे के सागर यापैकी पुस्तक वापरता येते
 •  इंग्रजी व्याकरणासाठी रेन अँड मार्टिन के सागर पब्लिकेशन किंवा बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक वापरता येते.

पेपर दोन देत असताना येथील लक्ष देण्याची बाब अशी की ज्यांची पदवी ही कला किंवा कॉमर्स शाखेतील आहे त्यांना  सामाजिक शास्त्रे म्हणजेच इतिहास व भूगोल राज्यशास्त्र यावर प्रश्न पडतात हा पेपर साठ मार्क चा असतो तर ज्यांची पदवी गणित आणि विज्ञान या शाखेतून झाले असेल तर त्यांना हा पेपर गणित आणि विज्ञान चा सोडवावा लागतो त्यासाठीही 60 गुण असतात
 • यामध्ये गणित विषयासाठी पंढरीनाथ राणे यांचे मराठी मधील पुस्तक व आर्यन बुक चे हिंदी किंवा इंग्रजीतून पुस्तक उपयोगी आहे यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग लसावी मसावी घन काळ काम वेग शेकडेवारी सरासरी व्याज सरळव्याज नफा तोटा यासारख्या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात
 •  तर विज्ञान विषयात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आरोग्यशास्त्र यावर प्रश्न विचारले जातात यामध्ये हिंदी किंवा इंग्रजीत अरिहंत प्रकाशनचे पुस्तक उपयोगी आहे
 • सामाजिक शास्त्र व इतिहास भूगोल ला अरिहंत प्रकाशनचे पुस्तक उपयोगी पडते सोबतच एनसीईआरटी व महाराष्ट्र स्टेट बोर्ड याचे पाठ्यपुस्तके अभ्यास उपयोगी पडते.


 तर मंडळी यांचा अभ्यास झाल्यावर आपल्याला मागील प्रश्नपत्रिका अभ्यासल्यास प्रश्नांचा टाईप कशा पद्धतीने प्रश्न येतात हे कळू शकते त्यासाठी मागील झालेल्या प्रश्नपत्रिका अरिहंत प्रकाशन चे मागील प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत या पुस्तकांची मी लिंक येथे दिलेली आहे तेथून खरेदी करू शकता धन्यवाद


CTET 2021 -2022च्या शिक्षक पात्रता परीक्षा साठी लागणाऱ्या पुसकांची लिस्ट 

त्यावर क्लिक करून खरेदी करू शकता.


Child Development and Pedagogy for CTET 2021 Paper I and II | Third Edition| By Pearson 


CTET 2021 Paper I | First Edition| By Pearson


Mathematics and Science for CTET 2021 Paper II | First Edition| By Pearson


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या