दिवाळीपूर्वीच राज्यात निवडणूक पार पडणार असूूून केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली.

election 2019


निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर अशी आहे. तर या आलेल्या अर्जांची छाननी 5 ऑक्टोंबर रोजी होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 7 आक्टोंबर देण्यात आलेली आहे. मतदान हे 21 ऑक्टोंबर रोजी असून या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला त्यानंतर तीन दिवसांनी देण्यात येणार आहे. आज पासून राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये आठ कोटी 94 लाख मतदार असून या निवडणुकीसाठी एक 1.8 लाख ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार  आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल.