आज आपण Revolt RV 400 या बाईक बद्दल माहिती घेऊ या. Revolt RV 400 ही बाईक भारतातील पहिलीच अशी बाईक आहे जी पूर्णपणे आर्टिफिसीयल इंटेलिजन्स (AI) इनबिल्ट सिस्टिम आहे. या गाडीला आपल्याला अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कनेक्ट करता येऊ शकतो. आपण ही बाईक आपल्या आवाजाने सुरू करता येते. Revolt RV 400 ही बाईक जून महिन्यात भारतामध्ये लाँच करण्यात आली असून तिचे technology पूर्ण पणे वेगळी आहे.
या बाईक ला भारतीयांकडून भरपूर प्रसिद्धी मिळत आहे असे या बाईक चे को-फौंडेर राहुल शर्मा यांनी सांगितले. राहुल शर्मा हे मायक्रोमॅक्स कंपनीचे सह-सौस्थापक आहेत. त्यांनी 2 वर्षामागे येणारे युग हे पूर्णपणे इलेक्ट्रिक बाईक चे असेल हे ओळखले आणि इलेक्ट्रिक बाईक ही पर्यावरणाला कमी हानी पोचवत असल्यामुळे त्यांनी या गाडीमध्ये लक्ष दिले व अशा प्रकारे भारतामध्ये पहिली बाईक लाँच केली.
राहुल शर्मा यांनी Revolt RV400 साठी हरियाणा मध्ये माणेसर जवळ कंपनी साठी जागा आणि पूर्ण अद्ययावत technology चा वापर करून कंपनी उभारली असून तिथे 1.2 लाख बाईक(मोटरसायकल) तयार करण्याचे ठरले आहे.
Revolt RV 400 ही बाईक जून महिन्यात लाँच झाली असून तिचे प्री-बुकिंग फक्त 1000 रुपये मध्ये होत आहे. ही बाईक सुरुवातीला फक्त दिल्लीमध्ये मिळणार असून नंतर ती नागपूर एनआर सी, हैद्राबाद, नागपूर ,चैनाई ,अहमदनगर व पुणे येथे उपलब्ध करण्यात येतील असे सुत्रकडून समजले.
ही बाईक आपल्याला बुकिंग करायची असेल तर ती आपण Revolt आणि अमेझॉन च्या वेबसाईट वर जाऊन करू शकतो. या बाईक मध्ये आपल्याला भरपूर नवीन फीचर्स मिळणार असून ही एक पूर्णपणे नवीन टेकनोलोजि आहे.
बाईक मध्ये आपल्याला एलइडी लायटींग, 4G कानेटविटी, फुल्ल डिजिटल डॅशबोर्ड असे बरेच फीचर्स मिळणार आहेत. Revolt RV 400 या बाईकमध्ये आपल्याला कॉम्पॅक्ट design, एक बॅटरी पॅक आहे. या गाडी मध्ये USD fork, एक मोनो शॉक आणि डिस्क ब्रेक आदी फीचर्स आहेत.
ही बाईक च्या बॅटरी पॅक बद्दल बोलायचे तर 72 volt ची बॅटरी असून ती बाईक च्या 3.25 किलोवॉट च्या मोटर ला फुल्ल पॉवर देते जेणेकरून ही बाईक ची टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. एकदा ही बॅटरी चार्ज केली तर 156 किलोमीटर चे अंतर कापू शकेल. चार्जिंगसाठी या बाईक ला 4 तास लागतील.
बाईकच्या चार्जिंगसाठी कंपनीने एक मोबाइल स्वॅप स्टेशन असणार असून ते आपण मोबाइल अप च्या माध्यमातून ट्रॅक केलं जाऊ शकत.
या बाईक ची मस्त फीचर् म्हणजे या बाईक चा आवाज, यामध्ये कंपनीकडून आपल्याला 4 प्रकारचे आवाज देण्यात आले असून आपल्याला हवे ते आवाज आपण बाईक ला देऊ शकतो आणि ते आपण मोबाईलद्वारे सेट करू शकतो.
ही बाईक भारतामध्ये रेड आणि कॉसमिक ब्लॅक या दोन रंगामध्ये उपलब्ध आहे.