समसंख्या 
  • ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात ज्या संखेच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात
 उदाहरणार्थ 14 16 22 26 28 36

numerology


विषम संख्या
  • ज्या संखेच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक येतो अशा सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात
  • ज्या संख्यांना 2रे भागले असता प्रत्येक वेळी बाकी एक उरतो अशा सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात
 उदाहरणार्थ 1 3 5 7 13 15 17 27 87
मूळ संख्या
  • ज्या संख्येला एक व ती स्वतः संख्या या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विभाजन नसतो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात
  • 1ते 100 पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत
2,3,5,7,11,13,17,19,23,29,31,37,41,43,47,53,59,61,67,71,73,79,83,89,97.

संयुक्त संख्या
  • ज्या संख्यांना 1 व ती स्वतः संख्या याव्यतिरिक्त आणखी एखादा अवयव असतो म्हणजेच विभाजक असतो अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात
  • 1ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत
एक ही मूळ संख्या नाही ही आणि संयुक्त ही नाही.

जोडमूळ जुळ्या मूळ संख्या
  • ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात.
  • 1ते 100 पर्यंत एकूण जोड मूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत 
3-5 5-7 11-13 17-19 29-31 41-43 59-61 71-73
  • ज्या दोन मूळ संख्या मध्ये फक्त दोनच फरक असतो अशा  मूळ संख्या ना जोडमूळ संख्या असे म्हणतात.
सहमूळ संख्या सापेक्ष संख्या
  •  ज्या दोन संख्यांच्या दरम्यान एक हा एकमेव अवयव सामायिक असतो अशा संख्यांच्या जोडीला सहमूळ सापेक्ष मूळ संख्या जोडी असे म्हणतात
मजेशीर 
  • 1 ते 10 पर्यंत अंकाची बेरीज केल्यास 55 येते याच पद्धतीने 11ते 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज 155 येथे अशा पद्धतीने 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज ही शंभरच्या फरकाने येते म्हणजेच 21 ते 30 च्या अंकांची बेरीज 255 येते अशा पद्धतीने 100 पर्यंत.....
  • 1ते 100 पर्यंत पर्यंत मूळ संख्या 25 आहेत संयुक्त संख्या 74 आहेत सम संख्या 50 आहेत  विषम संख्या 50 आहेत.
  • 1ते 100 पर्यंत च्या संख्यांची बेरीज 2550 येते तर विषम संख्यांची बेरीज 2500 येते यातील फरक हा 50 चा आहे