1857 उठावाचे परिणाम हे ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेला कारणीभूत ठरले ब्रिटिशांचे भारतातील सत्ताही मजबूत आणि बळकट झाली आणि ईस्ट इंडिया कंपनी कडील व्यापाराचे अधिकार जाऊन पार्लमेंट ऑफ ब्रिटिशची सत्ता भारतात आली. क्वीन विक्टरिया राणीने एक जाहीरनामा काढला. चला तर मंडळी पाहूयात 1857 चा उठावाचे परिणाम
1858 च्या भारत सरकार अधिनियमानुसार भारतीय प्रशासनाचे नियंत्रण हे कंपनीकडून जाऊन ब्रिटिश राजपद आकडे सोपविण्यात आले. अठराशे सत्तावन नंतर ब्रिटिशांनी त्यांचे विस्तारवादी आणि राज्य खालसा करण्याचे धोरण बंद केले. 1858 अधिनियमानुसार, इंग्लंड मध्ये एक भारतीय राज्य सचिव नियुक्त करण्यात आला. यात अधिनियमानुसार गव्हर्नर जनरल हे पद जाऊन त्या जागी व्हॉईसरॉय हे पद तयार करण्यात आले. ब्रिटिशांच्या घोषणापत्र असे आश्वासन दिले प्रजा ही कोणत्याही धर्माचे असेल जातीचे असेल त्यांना कोणताही भेदभाव न करता पात्रता प्रामाणिकपणा व शिक्षण त्यांच्या आधारावर शासनातील कोणत्याही पदावर नियुक्ती देण्यात येईल. भारतातील राजांनी ब्रिटिशांच्या राजपदाची सर्व श्रेष्ठता निवडली भारतातील सैन्याची पुनर्रचना करण्यात येऊन ज्यानुसार भारतीयांची संख्या कमी करून युरोपीय सैनिकांची संख्या वाढवण्यात आले. तर मुस्लिम समुदायाची जमीन आणि संपत्ती जप्त करण्यात येऊन त्यांना नेहमी संशय दृष्टीने बघण्यात आले . ब्रिटिशांनी तिथून पुढे धार्मिक व सामाजिक बाबतीत हस्तक्षेप करण्याचे टाळले तर जमिनीचे मालक आणि जमीनदार त्यांना संरक्षण देण्यासाठी नवीन धोरणे राबवण्यात आली त्यानुसार जमिनीवरील हक्क अबाधित राहिले.
जीवन मराठी: राज्य व तिथे राहणाऱ्या जमाती | स्पर्धा परीक्षेच्या... https://t.co/y3EU5V4Pw1
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 1, 2019