रोग निर्मिती करणाऱ्या सूक्ष्म जीवांना रोग कारक जीव म्हणजेच  पॅथोजन असे म्हणतात.

मानवी रोग हे संसर्गजन्य व असंसर्गजन्य असे दोन प्रकारचे असतात

यामध्ये संसर्गजन्य रोगाने मध्ये विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांचा आपण येथे आढावा घेणार आहोत

जीवन मराठी, jivan marathi, marathi jeevan, share chat, jeevan marathi.com, जीवन मराठी. कॉम, विषाणू, जिवाणू, संसर्गजन्य रोग, मानवी रोग, आदीजीव, गोवर, एड्स, नागीण, देवी, पोलिओ, jeevanmarathi.com, majhi malika, spardha pariksha, viral infection , chicken pox, aids herpes,
jeevanmarathi.in

  • गलगंड : mumps
पॅरामिझो या विषाणूमुळे होणारा हा रोग असून याचा उपचार लसीकरणाने करता येतो.

  • कांजण्या chicken pox
व्हेरिसेला झोस्टर विषाणूमूळे हा रोग होतो. हा रोग मुलांमध्ये जास्त आढळतो यावर पूर्णपणे रोग बरा करण्यासाठी कोणती उपचार लस उपलब्ध नाही मात्र कॅलामाइन हे मलम उपयोगी पडते.

  • पोलिओ poliomyelities
एंटोरो या विषाणूमुळे होनारा हा रोग असून रोगप्रतिबंधक लस उपलब्ध आहे.
  • गोवर measles
मायक्झो विषाणूमुळे हा रोग होणारा असून यावर गॅमाग्लोबिल्युन प्रतिकारक लस उपलब्ध असून हा रोग मुलांच्या मध्ये जास्त आढळतो.
  • शीतज्वर (influenza)
हा रोग अर्थोमीगझो या विषाणूमुळे होतो यावर विषाणूंवर लसी उपलब्ध आहेत.
  • रेबीज Hydrophobia
(हायड्रो फोबिया) -हेेब्डो या विषयांमुळे व कुत्रा चावल्यावर हा रोग होतो यावर 14 दिवसांपर्यंत लसीची मालिका व दंडावर घेतली जाणारी लस  उपलब्ध आहे.
  • खुपऱ्या Trachoma
डोळे चुरचुरणे डोळ्यातून पाणी येणे यासारखे होणे यावर प्रतिजैविकांचा द्वारे उपचार उपलब्ध आहेत.
  • देवी smallpox
( स्मॉल्पॉक्स ) व्हेरीओला विषाणूमुळे हा रोग होतो हा रोग लसीकरणा द्वारे बरा केला जाऊ शकतो.
  • नागिण herpes
सिंलेक्स विषाणूंमुळे हा त्वचारोग होतो यावर प्रतिजैविके उपलब्ध असून हा रोग बरा होऊ शकतो.
  • एडस (acquired immuno Deficieny syndrome)
एच आय व्ही या विषाणूंमुळे हा रोग होतो असुरक्षित संभोग व दूषित रक्ताद्वारे हा रोग पसरू शकतो हा रोग विषाणूमुळे होतो यावर कोणतीही लस उपलब्ध नसून त्यावर उपचार नाही योग्य प्रतिबंध हाच यावर आधार आहे यावर एलायझा व वेस्टरन ब्लोट चाचणी करून रोग निदान करतात.

  • यकृत सूज ( Hepatits)
प्रदूषित अन्न व पाण्यामुळे हेपेटायटिस अ तर दूषित रक्ताद्वारे हेपॅटायटस ब हा रोग पसरतो.


तर मंडळी या पोस्टमध्ये आपण विषाणूंमुळे होणारे संसर्गजन्य रोग पाहिलो आहोत पुढील पोस्टमध्ये आपण जिवाणू मुळे होणारे रोग पाहुयात त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा