महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रिजल्ट लागल्यावर शिवसेनेस कमी जागा मिळाल्या आहेत पण शक्ती डबल झालेली आहे. भाजपला बहुमता हुन खूपच लांब राहावं लागले असल्यामुळे शिवसेनेची जागा वाटपाची मागणी वाढली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी केली आहे.
तर आता काँग्रेसकडून देखील आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी मागणी केली जाऊ लागली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबेनी आदित्य ठाकरे यांना 'संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही' असा सल्ला देत विस्तृत फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनुभवाचे उदाहरण दिले आहे.
अडीच-अडीच वर्षांच्या निमित्ताने...
प्रिय आदित्यजी,
2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी 'अध्यक्ष' व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.
मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, 'सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल'. पुढे सर्व जिल्हा मला 'भावी अध्यक्ष' म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या.
पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला.
हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.
आपलाच,
सत्यजीत तांबे
Hoshil ka Ga Majhi Diwani, Tujhya Vina Rani Majhi Adhuri Kahani | Sanju Rathodhttps://t.co/UKv5azZJuV
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 27, 2019
परळीतून ;या; मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का, EXIT POLLचा निकाल! Parali Vidhansabha Exit Poll 2019https://t.co/lU1fkKFE4J
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 21, 2019
भाजके पोहे चिवडा | Bhajake Pohe Chivda by madhurasrecipe | Diwali Recipehttps://t.co/lwbJBKaCMD
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 21, 2019
चल जाऊ लोनावला | Chal Jau Lonavala | Rajneesh Patel | Mayur Mohite , Sunil Patil | Koli Love Songhttps://t.co/NemJ7wqpl3
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 21, 2019
जीभ लाल होणे त्वचा खरबरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील?https://t.co/FSiw8cIJzj
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) October 4, 2019