Q 121. जीभ लाल होणे त्वचा खरबरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील?
1.आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्य
2.दूध, शार्क लिव्हर ऑइल, कोड लिवर ओईल
3.डाळी पालेभाज्या दूध
4.पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध
बरोबर उत्तर
- ऑप्शन 3 . डाळी पालेभाज्या दूध
वरील प्रश्नातील आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्य यामध्ये विटामिन सी असते ये हे स्करवी व हिरड्यातून रक्त येणे या विकारांवर उपचार आहेत तर ऑप्शन 2 दूध, शार्क लिवर ओईल, कोड लिवर ओईल यामध्ये विटामिन डी असते ये हे मुडदूस रोगावर तसेच हाडे ठिसूळ होणे यावर उपचार आहेत तर ऑप्शन नंबर चार हे पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध यामध्ये विटामिन असते हे रातांधळेपणा त्याच्यावर उपाय आहे म्हणून ऑप्शन तीन नंबर डाळी पालेभाज्या दूध हे उत्तर बरोबर आहे.
तर मंडळी आपण आता जीवनसत्वे त्याच्या अभावी होणारे आजार आणि त्यासाठी लागणारे व त्यावर उपचार होणारे घटक पाहूयात
◆ जीवनसत्व अ ( विटामिन ए )
जीवनसत्व अ च्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो यासाठी पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई दूध हे घटक उपयुक्त असतात.
◆जीवनसत्व ब (विटामिन बी)
याच्या अभावामुळे जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे हे आजार होतात हे आजार होऊ नयेत म्हणून डाळी पालेभाज्या दूध हे आपल्या आहारात समाविष्ट करावेत
◆जीवनसत्व क (विटामिन सी) स्कर्वी, हिरड्यातून रक्त येणे हे आजार जीवनसत्व क च्या अभावामुळे होऊ शकतात. जीवनसत्व क साठी आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेले कडधान्य, चिंच हे आहारात समाविष्ट असावेत.
◆जीवनसत्व ड (विटामिन डी) हाडे ठिसूळ होणे, मुडदूस, पाठीला बाक येणे हे आजार होण्याची शक्यता असते. या आजारांवर उपाय म्हणून आपल्या आहारात दूध, शार्क लिव्हर ऑइल, कोड लिवर ओईल हे समावेश करावेत त्याच्यासोबत कोवळ्या सूर्यप्रकाशात बसावे.
◆ जीवनसत्व इ (विटामिन इ) विटामिन ई च्या अभावामुळे स्त्रियांमध्ये वांझपणा मृत बालक जन्माला येणे पुरुषांमध्ये प्रजनन समतेचा नष्ट होण्याचा धोका असतो नवजात बालकांमध्ये तांबड्या रक्तपेशी निर्माण होऊन हिमो लिसेस हा एक प्रकारचा रक्तक्षय प्रकारचा रोग आढळतो. आहारामध्ये वनस्पती तेल गहू कापूस तांदूळ यांची तेले मास अंडी इत्यादींचा समावेश केल्यावर विटामिन ई निर्माण होतो
◆ जीवनसत्व के (विटामिन के) याच्या अभावामुळे जखमा भरण्यास उशीर प्राण्यांच्या आतड्यात काही सूक्ष्मजीव या जीवनसत्त्वाची निर्मिती करतात लहान बालकांमध्ये रक्तस्त्राव ची समस्या उद्भवू शकते हे जीवनसत्व आपल्या शरीरात येण्यासाठी हिरव्या पालेभाज्या पालक व कोबी दूध अंड्यांचा पिवळ बलक मास कृत मासे इत्यादींचा समावेश आपल्या आहारात करावा.