अठराव्या शतकाच्या मध्यात नवाब व राजे यांची शक्ती संथपणे कमी होऊ लागली होती. आणि समाजातील सन्मान देखील कमी होत होता. बऱ्याच दरबारात ब्रिटिश प्रतिनिधी ठेवण्यात आले होते. त्यामुळे नावांच्या आणि राज्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ लागली. अनेक नावांनी व राज्यांना सैन्य ठेवल्यावर व सैन्य ठेवण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आणि कर व राज्याचा भूभाग हे ब्रिटिशांकडून घेण्यात करण्यात येऊ लागले. सर्वात प्रथम अवधे तील  राज्य खालसा करण्यात आले. 1801  मध्ये अवध येथे तैनाती फौजेचा करार करण्यात आला त्यानंतर 1856 मध्ये अवध हे संस्थान खालसा करण्यात आले. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी अवध प्रदेशाचा राज्यकारभार योग्य रीतीने चालत नसल्याने आणि व्यवस्थित प्रशासन स्थापित करण्याच्या दृष्टीने तेथे ब्रिटिश शासन अमलात आणायला हवे असे कारण देत अवधेश संस्थान खालसा केले.

jeevan marathi.in, jeevan marathi.com, जीवन मराठी कॉम
Part of the Mughal Empire's in 1857


यानंतर मुघलांचे साम्राज्य संपवण्यासाठी कंपनीने पावले उचलली. 1849 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने बहादुर शहा या मोगल सम्राट याच्या मृत्यूनंतर मोगलांना लाल किल्ला हात सोडावा लागेल. त्यांना निवासासाठी दिल्लीमध्ये दुसरी जागा देण्यात येईल लॉर्ड कॅनिंग यांनी सम्राट बहादूरशहा  याच्या मृत्यूनंतर  कुठलाही वारसा राजा किंवा बादशहा  म्हणून ओळखला जाणार नाही तर तो प्रिन्स म्हणजेच राजपुत्र म्हणून ओळखला जाईल . कंपनीने पाडत असलेल्या नाण्यांवरून मुगलांच्या राजांचे नाव काढण्यात आले.