बिग बॉस मराठी कलर्स वाहिनीवरील कार्यक्रमात स्पर्धक म्हणून असणारे आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार अभिजित बीचुकले यांनी नव्या आमदारांना पत्र पाठवून पाठिंबा देण्याचे आव्हान केल्याचे लेटर हाती आली आहे या लेटर नुसार येत्या दोन दिवसांमध्ये ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले आहे.



या पत्रामध्ये अभिजीत बिचुकले असे लिहितात की ‘मी स्वत: गेली २० वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणांस माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपती पद मिळावे यासाठी देखील मी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक २०१९ साठी मी १८२ वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.’



या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी होतकरू शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू-भगिनींना जाहीर आव्हान करतो की की आपण मला सर्वांनी आपले आपले जात धर्म व पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा द्यावा व माझ्या मंत्रिमंडळामध्ये योग्य मंत्रिपदावर विराजमान व्हावे इतर पक्षांनी व त्यांच्या प्रमुख यांनी स्वतःचे कसे आणि किती वेळा भले करून घेतले आहे हे तुम्हाला माहीत असेलच तेव्हा अशी स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्याबरोबर यावे हीच अपेक्षा.


येणाऱ्या दोन दिवसांमध्ये राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

कवी मनाचे नेते,

श्री अभिजीत वामनराव आवडे बिचुकले.

अशा आशयाचे पत्र त्यांनी सर्व आमदारांना पाठवलेले आहे. आता हे बघण औत्सुक्याचं ठरेल यातील किती आमदारांनी त्यांना पाठिंबा देतील आणि ते खरंच सत्ता स्थापनेचा दावा करतील का?

आपणही कमेंट्स मध्ये सांगू शकता.

हा लेख आवडला असेल तर आपल्या सर्व सोशल मीडियावर शेअर करा.