मंडळी नमस्कार,
आपण या लेखामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर (Shivaji University kolhapur) येथील एम ए च्या पहिल्या वर्षाला असणारी ही लघु कथा (Short Story) The Fall of the House of Usher पाहणार आहोत. ही लघु कथा एडगर आलेन पोय ( Adger Allen poe) यांनी लिहली आहे. 1839 मध्ये ही कथा प्रसिद्ध करण्यात आली होती. तर ही Burton's Gentleman's Magazine या मॅगझीन मध्ये सर्वात प्रथम पब्लिश करण्यात आली होती. त्यानंतर याचा समावेश शॉर्ट स्टोरीज च्या कलेक्शन मध्ये करण्यात आला त्याच नाव होत Tales of Grotesque या मध्ये करण्यात आला. (1840)
तर या शॉर्ट स्टोरी थीम आहे गॉथिक फिकशन (Gothic Fiction) म्हणजे यात भय, मृत्यू, कुटुंब, वेडेपणा, isolation, आणि मेट्याफिजिकल इडेंटिटीएज चा समावेश केला जातो. म्हणजेच यात भयकारक घटना पाहायला मिळतात.
यात तीन मुख्य पात्र आहेत.
- निवेदक (Narrator)
याच नाव यात सांगितलेलं नाही
हा रॉडरिक अशर चा बेस्ट फ्रेंड आहे आणि एकमेव आहे.
हा रॉडरिक अशरला मदत करण्यासाठी आलेला असतो कारण रोडरीक मानसिक आणि शारिरीक आजारी असतो.
याला रोडरीक ने पत्र लिहून बोलावून घेतलेलं असतं.
आणि त्यांन भरपूर वेळ रॉडरिक अशर सोबत घालवल आहे.
आणि हा दयाळू, सहानभूती असलेला (sympathetic) आणि मदत करणारा असतो.
पण या लघु कथेत आपल्याला कळत की त्याला तिराईत माणसासारख वागवलं जात. त्याला बोलवून तर घेतलं जात पण एवढी माहिती त्याला रॉडरिक देत नाही.
आणि रॉडरिक ची जुळी बहीण कायम याला इग्नोर करत असते.
- रॉडरिक अशर (Roderick usher)
यांच्यावर ही कहाणी आहे
हा खूप चागल्या कुटुंबातुन येतो.
आणि यांच्या कुटुंबातील / वंशज मधील हा शेवटचा व्यक्ती आहे. मॅडेलिन अशर (Madeline usher)
ही त्याची जुळी बहीण आहे. आणि या कथेत ते दोघे स्टँग कनेक्शन शेअर करतात. यामध्ये काही क्रिटिक्स म्हणतात की त्या दोघांचे incestuous रिलेशनशिप असावं म्हणजे मेट्याफिजिकल जे ह्या स्टोरी मध्ये सांगण्यात आलं नाहीय. पण त्यांचं स्ट्रॉंग बॉंडिंग दाखवण्यात आलेलं आहे.
रोडरीक अशर अस ही मानतो की तो ज्या घरात राहतो तेच घर त्यांच्या ह्या खराब परिस्थितीस कारणीभूत आहे. कारण तो कायम मेंटल डिप्रेशनमध्ये मध्ये राहतो कायम दुःखी आजारी असतो.
आता मी इथं तुम्हाला सांगू इच्छितो की या कथेत जे घर दाखवण्यात आलेल आहे खूप विचित्र आणि मानवी असल्याचे दाखवण्यात आलेलं आहे, म्हणजेच त्या घरात जीव असल्यासारखं , म्हणून रॉडरिक अशर अस मानतो की तो जिथे राहतोय ते घर मानवी असल्या सारख आहे. आणि त्याच जे नशीब आहे ते त्या घरासोबत कनेक्शन आहे. म्हणजे ते घर नाही काही मानवी प्रकारची शक्ती आहे. म्हणजे इथे त्या घरास तस प्रसोनिफाय करण्यात आलेलं आहे. म्हणून रॉडरिक अशर स्वतःच्या घरातच घाबरून राहत असतो.
आणि एक मुद्दा म्हणजे रॉडरिक अशर हा एक सिक आणि चिंताग्रस्त, उद्विग्न ( gloomy), hypochondriacal (कायम आजारी आहे असा विचार करणे) असा मनुष्य आहे.
इथे त्याला कोणता आजार आहे ते सांगितलेलं नाहीय.- मॅडेलिन अशर (Madeline usher)
ही त्याची जुळी बहीण आहे.
ही पण आजारी असते आणि ती आजार पणाला झुंज देत असून तिच्या आजाराचे नाव आहे ....कॅटेलेप्सी
हा एक असा आजार आहे ज्यात रुग्णच शरीर सक्त, ताठ होत जात ज्यामुळे चालताना खूप त्रास होतो आणि नीट चालता येत नाही. आणि ज्यावेळी असा व्यक्ती चालतो त्यावेळी तो अजब दिसतो जस की एखाद भूत असेल. कॅटेलेप्सी हा आजार मॅडेलीन ला झालेला असतो.
आणि ती या आजारांमुळे खूप पॅरानॉर्मल, भुतासारखी दिसते. आणि ती कायम निवेदकाला इंग्नोर करते. आणि तीच आपल्या भावासोबत स्पेशल स्ट्रॉंग कनेक्शन आहे.“The Fall of the House of Usher” Summary in Marathi
या कथेच्या सुरवातीला आपण जाणून घेतो की या कथेमध्ये एक निवेदक आहे. पण “The Fall of the House of Usher” द फाल ऑफ द हाऊस ऑफ उशेर या कथेमध्ये त्याच नाव सांगण्यात आलेला नाही. का कुणास ठाऊक पण पूर्ण कथेमध्ये त्याच नाव कधीच येत नाही. हा निवेदक रोडरीक उशेर च्या घरी जात आहे कारण रोडरीक ने भेटण्याची इच्छा व्यक्त करत त्याला लेटर पाठवून बोलवून घेतलं आहे. उशेर हा त्याचा बालपणीचा मित्र आहे. आता त्या लेटर मधून रोडरीक ने निवेदकाला माहिती देत सांगितल आहे की तो मानसिक आणि शारीरिक आजारपणातून जात आहे. हा निवेदक (narrator) घोड्यावरून जात आहे तो देशाच्या एकदम कंटाळवाण्या भागातून जात आहे. तो दिवस वर्षाच्या अखेरीस कंटाळवाणा, गडद आणि निष्पाप ( dull, dark and soundless ) असा असतो. तो दिवसभर खूप लांब वरून प्रवास करून उशेर च्या घरी संध्याकाळच्या वेळेला पोहचतो. या घरातील वातावरण एकदम जड दुःखी भावनांनी भरलेली असते. निवेदकाला हे घर खूप डिस्टर्ब (disturbing)करणारे वाटते पण का याचा मात्र त्याला कोणता सुगावा लागत नाही. सुरवातीला तो विचार करतो की हे एक स्वप्न आहे पण ज्यावेळी त्या घरातील (tarn) पर्वतातील लहान सरोवर असलेल्या फोटो कडे पाहतो, त्यावेळी ते अधिक भयानक असे वाटते.
या वातावरणामुळे उशेर चे (the House of Usher) घर खूप भयानक वाटत असते. डिप्रेशन आणि नर्व्हसनेस मध्ये ( depression and nervousness ) असणाऱ्या अशरला त्यातून बाहेर येण्यासाठी मदत व्हावी म्हणून निवेदक तिथे राहण्याच ठरवतो.
याशिवाय, अशर जो चिंतेने पूर्णपणे आजारी होता त्याला निवेदकाच्या कंपनीची खूप गरज होती. यावेळी निवेदक पूर्वीच्या बालपणीच्या दिवसांची आठवण काढतो. उशेर हा सॉर्ट ऑफ रिजर्व पर्सन असतो. (Usher had been a sort of reserved
person. ) उशेर च्या कुटूंबाला त्याच्या विचित्र स्वभावाची, त्याच्या समाजातील रिप्युटेशनची ( reputation for
charity ) आणि कलेतील रसाची, विशेषतः सगीतांबद्दलची आवड यांबद्दल माहीत होते. त्या कुटुंबाबद्दल आणखी एक महत्त्वाचा तथ्य म्हणजे वंश ( Another important fact about the family was the purity of its lineage. )
Rodecrick ला कोणीही वारस नव्हते आणि चुलत भाऊ किंवा बहीण ही नव्हती. या कुटुंबातील शेवट चा वारस हा रॉडरिक अशर आहे. त्यामुळे अशर च्या घरास नाव अशर फॅमिली मुळे पडले आहे. ही कथा सांगणारा निवेदक संपूर्ण घर तपासून पाहतो त्याला गडद आणि त्रासदायक असे सभोवताली वातावरण वाटते( dark and annoying
atmosphere surrounding it ), भिंती मधून निघणारी आणि लहान तळ्या शेजारी सडलेली झाडे वैगेरे दिसतात. पण तो स्वतःच सांत्वन करतो स्वतःला समजावू पाहतो की हे सर्व त्याला स्वप्नं पडलेले आहे आणि तो पुन्हा घर पाहू लागतो. ते संपूर्ण घर अखंड नसते त्यातील काही काही भाग पडलेले, तुटलेले असतात आणि काही सेक्शन हे बाजूला झालेले आणि त्यात कोळ्यांचे जाळे पसरलेले असते.( covered with
spider nets) त्याने हे देखील पाहिले की एक jagged crack हा छपरापासून तलावात गेला होता. तेथील वातावरण हे जराही आनंदी नसते. ज्यावेळी तो घराबाहेर असतो त्यावेळी तो घराकडे बघतो ते घराच्या छपरापासून खाली जमिनी पर्यंत त्या घराला एक तडा गेलेले असते तो खूप लहान असतो. तर तो आत जातो आतही घर खूप भीती दायक असते आणि तो एक टनेल सारख्या पॅसेज मधून आत जातो तेथून आत गेल्यावर एका रूम मध्ये त्याचा मित्र रॉडरिक हा बसलेला दिसून येतो. आणि तो दिसायला खूप विचित्र दिसत आहे. नॅरेटर अशर चा माहिती देत असताना तो खूप पांढरा पडलेला आणि डोळे खूप बाहेर आल्यासारखे दिसतात असे वर्णन करतो. ओठामध्ये कोणताच रंग नाही. आणि तो माणूस नसल्यासारखाच वाटत आहे. अश्या पध्दतीच डिस्क्रिप्शन रोडरीक अशर च आहे. तर येथे मित्राला निवेदक भेटतो बोलतो आणि चर्चा करतात यावेळी रोडरीक त्याला सांगतो की तो शेवटचा सदस्य आहे त्याच्या कुटुंबातील कारण यांचे वंशज किंवा मूळ कुणासोबत जोडलेल नाहीय. आणि खुप वेळपासून हा एकटाच जिवंत आहे. म्हणजे अशर आणि त्यांची बहीण हे दोघेच असतात.
येथे निवेदक रॉडरिक अशर वर इम्प्रेस होतो कारण रोडरीक गिटार वाजवतो.. रोडरीक येथे त्याला काही स्वतः तयार केलेलं संगीत ऐकवतो. ते दोघे मिळून ते वाजवतात
यावेळी रॉडरिक एक गाणे म्हणू लागतो हंटेड पॅलेस नाव असलेलं.
यावेळी रोडरीक निवेदकाला सांगू लागतो की त्याला वाटत हे घर जिवंत आहे म्हणजे जिथे आपण राहतो ते घर स्वतः जिवंत आहे आणि सांगतो हे आसपास असलेलं वातावरण मला खूप भीतीदायक वाटत...
आणि मी तुम्हला वर सांगितल्या पद्धतीने रोडरीक अशर स्वतःच्या घरात खूप घाबरून राहत असतो आणि रॉडरिक यावेळी त्याला सांगतो की ह्या घराचे जे खिडक्या आहेत ते डोळे आहेत म्हणजे या घराच्या दरवाज्यांना तो डोळ्यासोबत कमपेर करतो आणि कायम त्याच्या कडे पाहत आहेत असे तो म्हणतो आणि हे घर नसून एक माणूस आहे असे तो म्हणतो यावर निवेदक थोडं विश्वास ठेवतो की तो मानसिक रित्या आजारी असल्याने ती असे बोलत असेल. त्यानंतर थोड्या वेळाने रोडरिक अस म्हणतो की त्याच नशीब आहे ते याच घरासोबत जोडलेल आहे, कारण एवढं सगळं होत असत तरीही तो याच घरात राहत असतो एवढ्या विचित्र घटना नंतरही तो हे घर सोबत नाही. आता जी मॅडेलीन अशर आहे ती जास्त बोलत नसते ती निवेदकाकडे जास्त लक्ष देत नसते त्याला इग्नोर करत असते. ते लोक भरपूर दिवस तिथे राहत असतात. निवेदक रोडरीक चा काळजी घेत असतो. रॉडरिक निवेदकाला सांगतो की त्याची बहिणीच डेथ झालेलं आहे आणि आता तिला आमच्या कुटूंबाच्या घराखाली एक टनेल सारख चेंबर आहे तिथे तिच दफन करूया यासाठी तिला तिथं दफन करणार असतात की, तिला कॅटेलेपटिक आजार असतो आणि त्या काळात 18 व्या व 19 व्या शतकात समाज मान्य होत की कोणत्याही व्यक्तीला जर आजार आहे तर शास्त्रज्ञ रिसर्च करणारे ती बॉडी उचलून घेऊन जायचे किन्वा चोरून घेऊन जायचे. त्याच्यावर एक्सपरिमेन्ट रिसर्च करण्यासाठी ते घेऊन जात असत. तो निवेदकाला सांगतो की आपण तिला 2 3 आठवड्यासाठी घराखाली असलेल्या चेंबर मध्ये दफन करूया नंतर दफनभूमी जिथे असेल तिथे नेऊया. कारण रॉडरिक अशर च तिच्या बहिणी सोबत बॉंडिंग चांगल असत. म्हणून त्याची इच्छा नाही की तिच्या बहिणीला कोणी घेऊन जाईल. तिच्या बहिणीच्या बॉडी ची चोरी होऊ नये म्हणून तिला त्या family टुंब जे आहे तिथे काही दिवसासाठी दफन करूया. नंतर तिला कायमच दफनभूमी मध्ये दफन करू.
यावेळी रॉडरिक निवेदकास मदत मागतो आपण दोघे मिळून त्याच्या बहिणीला मॅडेलीन ला दफन करू तर ते लोक तिथे जातात. निवेदक त्याला मदत करतो. तिला थडग्यात घालून तिथे ठेवतात. यावेळी निवेदक मॅडेलीन च्या चेहऱ्याकडे पाहतो तर तिचा चेहरा एकदम रोजी फ्रेश वाटतो. त्यावेळी निवेदकाला शंका येते की, डेड बॉडी आहे आणि रोजी गाल कसे आहेत. बर ते राहू दे .. त्यानंतर ते दफन करून येतात त्यानंतर मात्र त्यांना अजब अजब आवाज येत असतात, ओरडलेले किंचाळलेले आवाज येत असतात, यावेळी ते दोघे खूप काळजीत असतात, काही वेळा सोसाट्याचा वारा सूटतो ते शांत राहू शकत नाहीत. एकदा जोरात वादळ चालू असत रॉडरिक अशर खुप घाबरलेला असतो त्या वादळामुळे. त्यावेळी रॉडरिक अशर निवेदकाच्या खोलीत येतो त्यावेळी निवेदक त्याला एक कथा/ novel वाचून दाखवतो जेणे करून रॉडरिक शांत व्हावा. त्या नोवेलच नाव असत द मॅटरिस्ट तर या novel मधील कथेत एक सरदार असतो त्याची लढाई चालु असते ड्रॅगन सोबत अस सगळं त्यात असत तर ती स्टोरी जशी पुढे सरकेल तशी घटना खरोखर होऊ लागतात. उदारणार्थ जर लढाई करताना तलवार खाली पडली तर तलवार पडलेल आवाज किंवा कोणतं तरी लोखंडी वस्तू पडलेलं आवाज येत असत जर ढाल पडली किंवा त्याला तलवार लागली तर तसा आवाज येत असे. त्यावेळी त्या ड्रॅगन ला सरदार मारला तर तो ड्रॅगन ओरडलेला आवाज येत असे मारायच्या अगोदर जसा ओरडत असतो तसा आवाज त्यांना ऐकू येतो सुरवातीला हे लोक विचार करतात की, हा त्यांचा भ्रम असेल पण जशी जशी ती कथा पुढे जाऊ लागते तश्या घटना होऊ लागतात आणि जी पेंटिंग असलेली भिंत आहे ती हालू लागते आवाज येऊ लागतात थरथरू लागतात. तो आवाज खूप विचित्र रिपिंग, कर्कश, चित्कार मारलेला असतो. यावेळी रॉडरिक खूप घाबरलेला असतो म्हणजे खूप घाबरलेला असतो. तो तिथे पायाची घडी घालून त्याच्या मोठ्या खुर्ची वर बसतो त्यावेळी रॉडरिक काहीही स्वतःच स्वतःला पुटपटू लागतो.
कारण तो खूप भ्यायलेला असतो. यावेळी निवेदक त्याला शांत करू पाहतो त्यावेळी तो ओरडत असतो माझी बहीण अजून जिवंत आहे त्याच वेळी हे सगळं होत असताना खिडकीतून बाहेर पाहतो तर तिथे एक छोटं तलाव असत ते चमकत असत ग्लो करत असत निळ्या रंगात ते खूप सुन्दर दिसत असत तर नरेटर त्याला विचारतो हा तलाव एवढ्या अंधारात देखील कसा काय चमकत आहे. अंधारात तर हे चमकू नये. तर रॉडरिक म्हणतो हे सगळं खुप विचित्र होत आहे येथे आणि हे नैसर्गिक तर अजिबात नाहीय. तो घाबरून त्या खुर्चीवरच बसून राहतो. तो म्हणत असतो की त्याची बहीण खरच इथे आहे आणि त्याला वाटत की ती त्या दरवाज्या मागे उभी आहे. तसही वादळ चालूच असत विचित्र वातावरण झालेलं असत त्यावेळी दरवाजा एकदम जोरात उघडला जातो आणि तिथे उभी असते ती मॅडेलीन अशर आणि तिच्या संपूर्ण शरीरावर रक्त असत आणि ती तशीच बाहेर येते त्यावेळी रॉडरिक जागेवरून उभा राहतो. निवेदक ही उभा राहतो आणि मॅडेलीन आत येते आणि रॉडरिक ला धडक देते रोडरिक आणि मॅडलिन अशर दोघे धडकतात आणि जमीनीवर कोसळतात त्यावेळी ते मरून पडतात. त्यावेळी निवेदक हा खूप घाबरलेला असतो कारण तोच एकमेव असा व्यक्ती होता ज्याने घडलेलं सर्व पाहिलेलं असत आणि कोणी माणूस नाहीय हा फक्त निवेदक आहे जो सर्व ते पाहतो आणि स्वतः ला फील करतो की काय झालं हे सर्व. तो त्यावेळी खूप घाबरलेला असतो तो तेथून लगेच पळून जातो. तो पळून जात असताना मागे वळून पाहतो तर त्यावेळी त्याला ते घर दुभंगताना दिसते. या कथेच्या सुरवातीस मी आपल्याला सांगितलेलं होत की एक लहान चिर crack त्याच्या छतापासून खाली पर्यंत आलेलं असत. तो आता खूप मोठा होत जातो आणि तयातून चंद्राची छाया पडत आहे आणि ते घर दोन भागात वेगळे होते आणि पडून फुटते. आता हे म्हत्वाच आहे की हा निवेदक एकमेव आहे जो हे सर्व पाहिलेला असतो. ही कथा खूपच विचित्र आणि भयदायक आहे.
Related
- द फॉल ऑफ द हाउस ऑफ अशर या लघु कथा मराठी सारांश |...
- house of usher in marathi