हिंदी चित्रपटातील स्टार अक्षय कुमार ह्या आपल्या कृतीतून नेहमी सैन्य विषय देशाविषयी आणि शेतकऱ्यांविषयी असलेले प्रेम दाखवत आलेला आहे तर याची प्रचिती पुन्हा एकदा पुण्याजवळच्या मावळ मध्ये आली आपल्या लेकी सोबत सुट्टी घालवण्यासाठी आलेला अक्षय कुमार हा एका शेतकऱ्यांच्या घरी जातो तिथे आपल्या तहानलेल्या मुलीसाठी पाणी मागतो आणि त्या दाम्पत्याने त्याला पाणी सोबतच आयोजित गुळ भाकरी खाण्यास देते परंतु त्या वृद्ध दाम्पत्यांना आपल्या घरी आलेला पाहुणा इतका मोठा स्टार असल्याचे जराशीही कल्पना नव्हती खुद्द अक्षयकुमारने ट्विटर वर येथील फोटो काढून त्याबद्दल ट्विट केलेले आहे.

अक्षय कुमार ट्विटर


 तर अक्षय कुमार पवना धरणाच्या बॅक वॉटर येथे आपल्या कुटुंबासोबत दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी आला होता तो सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुलीसोबत वॉकसाठी बाहेर पडला ते धरणालगत च्या डाळिंब या गावात पोहोचले अक्षयच्या मुलीला तहान लागली होती इकडे तिकडे पाणी दुकानात विचारल्यास दुकान ही नव्हते त्यावेळी समोर अक्षयला एक झोपडी दिसली त्या झोपडी मध्ये जाऊन अक्षय ने प्यायला पाणी मागितले तेथे एक वृद्ध दाम्पत्य होते त्यांनी अक्षय कुमार ला आपल्या ग्रामीण स्टाईल ने पाहुणचार करत त्याला पाणी सोबतच गुळ आणि भाकरी देऊन पाहुणचार केला.

परंतु आपल्या घरात आलेल्या आणि आपण पाहुणचार करण्यात आलेला हा व्यक्ती कोणी साधासुधा माणूस नाही हे या ढमाले कुटुंबाला माहित नव्हतं अक्षयने स्वतःची माहिती दिली यावेळी धमाले दांपत्याने अक्षय कुमारला चहा घेण्याचा आग्रह केला पण अक्षय ने चहा ऐवजी गुळ भाकरीचा आस्वाद घेतला.

यावेळी ढमाले कुटुंबासोबत अक्षय स्वतःहून फोटो काढला आणि ट्विट करून या शेतकऱ्यांच्या  सोबत आलेले अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

Today’s morning walk turned into a life lesson for the little one. We walked into this kind, old couple’s house for a sip of water and they made us the most delicious gur-roti. Truly, being kind costs nothing but means everything!
हे ही वाचा