आंधळी ता. पलूस जि. सांगली येथील सुकन्या BSF जवान सना आलम मुल्ला (वय 22 ) या राजस्थानातील बिकानेर येथे शहीद झाल्या.
सुरक्षा दलात सेवेत असताना सना यांना विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी 25 नोव्हेंबर ला सकाळी आंधळी येथे अंत्यसंस्कार होणार असून या वृत्तामुळे गावात शोककळा पसरलेली आहे. त्या मागील 3 वर्षांपासून BSF मध्ये सेवेत होत्या. काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्यावर राजस्थानातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.मुल्ला यांचे वडील शेत मजूर असून आई वडील आणि दोन भाऊ असून ते सर्वजण आंधळी येथे राहतात.
सोमवारी जवान सना मुल्ला यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असून त्यापूर्वी आंधळी या गावातील हिंदकेसरी गणपतराव आंधळकर विद्यालयापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार असून, त्यानंतर ग्रामपंचायत पटांगणासमोर श्रद्धांजली वाहण्यात येईल.
सना यांना सोशल मीडिया वर सर्वजण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.