दंडम या मराठी चित्रपटावर अन्याय होत असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक V. सत्तू यांनी काल दंडम च्या फेसबुक पेजवर लाईव्ह येत सांगितलं. या मध्ये त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायबद्दल बोलले असून ते म्हणाले की "कोणीही गॉड फादर नसताना आम्ही गेली 3 वर्ष कष्ट करून हा सिनेमा बनवला पण हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून एक लॉबी प्रयत्न करत आहे. 

 खूप मोठ्या रक्कमेची मागणी केली जात असून आज मी एकटा त्याच्याशी झुंझ देतोय. बॉम्बे  हायकोर्ट मध्ये खोटे कागदपत्र देऊन एक पिटिशन दाखल करण्यात आलेल आहे. आम्ही दबावात येऊन, ब्लॅकमेल होऊन आम्ही त्यांना पैसे द्यावं असा प्रयत्न होत आहे. पण मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि मी असल्या कोणालाही भीक घालणार नाही. त्यांच्याशी लढेन व चित्रपट रिलीज करेनच" अस त्यांनी फेसबुक पेजवर लाईव्ह मध्ये सांगितलं.

दंडम मराठी चित्रपट दंडम मराठी चित्रपट cast दंडम फिल्म दंडम मूवी ट्रेलर दंडम मराठी मूवी ट्रेलर दंडम मराठी मूवीस दंडम मराठी चित्रपट release date दंडम फिल्म मराठी दंडम मराठी सॉन्ग
facebook | dandam

तर या चित्रपटात शरीर सौष्ठव स्पर्धेत जगजेत्ता असणारा संग्राम चौगुले यांची भूमिका आहे. सोबत मुख्य भूमिकेत मयूर राऊत, रिपुंजय लष्करे हेही आहेत.या चित्रपटाच्या ट्रेलर ला युट्युब वर 15 लाखाच्या वर व्हीवज आले असून तरुण मुलांच्या मनात हा चित्रपट कधी रिलीज होतोय याबद्दल चर्चा रंगलेली आहे. 


    
या चित्रपटातील गाण्यांचे गीतकार सागर बाबानगर यांनी सुद्धा संगीतकार अभिमन्यू कार्लेकर यांना टॅग करून हा लाईव्ह शेअर करत फेसबुकवर विस्तृत पोस्ट लिहून याबाबत आपले मत मांडले आहे.
काय असतं बर एका कलाकाराचं स्वप्न? आपण जी कलाकृती निर्माण करतो ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी. तसं झालं तरच त्याला आनंद होतो आणि त्यातून अजून काहीतरी नवीन, अप्रतिम निर्माण करण्याची ऊर्जा त्यांना मिळते. लोकांना एक तर आवडेल किंवा नाही आवडणार. पण या चॉईसेस साठी त्यांना त्या कलाकृतीचा आनंद तरी घ्यायला हवा ना! कलाकार मन लावून एखादी सुंदर कलाकृती तयार करतात आणि ती लोकांपर्यंत पोहचावी याची वाट बघत असतात. कधीकधी एखादी कलाकृती अशी असते की त्यांनी आधी केलेल्या कलाकृतीपेक्षा एकदम वरचढ. मग साहजिकच ती लोकांपर्यत लवकर जावी असं त्या कलाकाराला हिरेरीन वाटत असतं. म्हणता म्हणता वर्षं उलटून जातात. अडथळे पार करत चढउतार घेत ही कशी लोकांपर्यंत येऊ पहाते आणि लोकांपर्यंत पोहचण्याच्या आशा एकदिवस धूसर होत जातात....कारण कधी आर्थिक असतात तर कधी मानसिक. आर्थिक कारणांच  ठीक आहे पण मानसिक कारणांच काय? इगो हा आजकाल माणसाला एवढा पोखरतोय ना माणूस हा "माणूसच" रहात नाही. काही बुद्धिजीवी लोकांच्या या वागण्यामुळे त्या गोष्टीशी संलग्न असणाऱ्या शंभरभर कलाकारांचं भवितव्य टांगणीला लागतं. आणि हे असंच चालत आलेलं आहे आणि चालू राहणार. पैसाच सर्व काही नसतो ना. कलेचं मोल कधीच पैशात करता येत नाही. पण हे या लोकांना कधी कळणार. खूप वाईट वाटत जेव्हा अशी चिंता सतावते की आपणच निर्माण केलेल्या ती कलाकृतीचं काय होणार. लोकांपर्यंत जाणार की डब्यात जाणार हा मोठा प्रश्न मनाला टोचत राहतो. यावेळी शांत राहून पुढचं काम करणे याशिवाय दुसरा पर्यायच नसावा. ते "तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणं" म्हणतात ते हेच असावं ना!
©सागर बाबानगर
एकीकडे हिरकणी सारख्या मराठी  चित्रपटाचे शोज हाऊसफुल होत असताना 'दंडम' सारख्या मराठी चित्रपटांना न्यायालयाच्या फेऱ्यात अडकून राहावे लागत आहे हे दुर्देव.
या चित्रपटातील गाणं 'दिल माझा बिगी बिगी' खूप गाजलेलं असून प्रेक्षकांच्या पसंतीस पुरेपूर उतरलेल आहे.

   
Related :
  • मराठी चित्रपट दंडम
  • दंडम मराठी मूवी
  • दंडम मराठी चित्रपट cast
  • दंडम मराठी 0 1
  • दंडम ट्रेलर