महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा विधान सभेच्या सभागृहात येत आहेत, आणि या वेळी माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडायला हवा होता पण त्याऐवजी त्यांनी नको ते मुद्दे काढत सभागृहातून बाहेर पडणं पसंत केलं अश्या पध्दतीच निरीक्षण एन सी पी चे  विधी मंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी आज विश्वासदर्शक ठरावा वेळी केलं.
आणि पुढे जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे 'विरोधी पक्षाचा नेता दर्जेदार असावा'.
 चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष नेते हवेत की देवेंद्र फडणवीस याबबद्दल भाजपात चर्चा सुरू होती. तेव्हा त्यांची स्पर्धा होऊ द्या आणि नंतर त्यांना एकमताने विरोधी पक्षनेता ठरवू द्या,' अशी अपेक्षा व्यक्त केली. 
पुढे जयंत पाटील म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले यांचे नाव शपथविधीच्या वेळी घेतलं तर भाजप नेत्यांना का त्रास झाला. सरकारस्थापनेसाठीची सर्व प्रक्रिया आपण गेले काही दिवस पाहात आहात. माझ्यासह सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली. जो मजकूर आमच्या हातात होतं तोच मजकूर आम्ही वाचला. एखादं चागलं काही आयुष्यात घडत असताना आपलं जे दैवत आहे, त्याचा उल्लेख केला आणि खास करून छत्रपतींचा उल्लेख झाला असेल तर देवेंद्र फडणवीस यांना का राग आला? या महापुरुषांविषयी यांच्या मनात पिढ्यानपिढ्या असूया आहे.'