मंडळी, आपल्या सर्वांच्या आवडता युट्युब वरील वेबसिरीज म्हणजे गावाकडच्या गोष्टी. या गावाकडच्या गोष्टींचा पर्व तिसरा लवकरच सुरू होणार आहे. याची माहिती खुद्द गावाकडच्या गोष्टी वेबसिरीजमधील कलाकार शुभम कलोळीकर यांनी दिली आहे.
कोरी पाटी प्रोडक्शन ह्या युट्युब चॅनेलवरील सर्वात गाजलेल्या गावाकडच्या गोष्टी या कार्यक्रमात आपण आपल्या गावाकडच्या घडलेल्या गोष्टी अनुभवत असतो आणि त्याची नाळ आपल्या सोबत जोडल्यामुळे आपण नेहमी त्यांचे नवे एपिसोड आवर्जून पाहत असतो. त्यांचे एपिसोड्स कधी येतात याची वाट आपण नक्कीच पाहत असतो. तर मंडळी आपल्यासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीजचा नवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये नवे कलाकार असणार की जुने आपले सर्व आवडते कलाकार असणार याबद्दल संभ्रम आहे. परंतु लवकरच ही वेब सिरीज युट्युब वर आपल्या भेटीला येत असल्यामुळे हा संभ्रम दूर होणार आहे.
तर याचे दिग्दर्शक नितीन पवार यांनी गावाकडच्या गोष्टी मध्ये सर्वांच्या लाडक्या संत्या व सुरकी यांची कथा आपल्याला सांगितलेले आहे. सोबतच अव्या व माधुरी यांचे फुलत जाणारे प्रेम आजपर्यंत आपण पाहिलेला आहे. परंतु आता माधुरी सरपंच झालेली आहे आणि संतूर्की मध्ये आपण पाहिले की संत्या आणि सुरकी यांच्या प्रेमाची ताटातूट कशी होते. त्यानंतर आता हे पर्व सुरू होतं या पर्वातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा तसेच कोण कोणत्या गावाकडच्या गोष्टी पाहायला मिळतील याची उत्सुकता सर्व "गावाकडच्या गोष्टी"च्या चाहत्यांना लागून राहिलेली आहे.
माधुरी.... माझी बायको ! नावात जितकं माधुर्य तितकं व्यक्तिमत्त्व मात्र दनकट...भल्याभल्यांना तिच्या बोलण्यानेच गार करते, हा... आता गावची सरपंच म्हटल्यावर तसा रुबाब हवाच! पण तशी मनाने खूप भोळी आहे माझी माधुरी...शाळेत असताना तिचा थोडा धाक होता पण कॉलेजात गेल्यापासून थोडंस का होईना तिच्याशी बोलायची हिम्मत झाली... आता ती माझ्या इज्जतीचा पंचनामा करायची ती गोष्ट वेगळी पण तीच पण बरोबर हाय...अस कोनाशीपन गप्पा कशा मारायच्या, पण हळूहळू तीलाबी कळायला लागलं की मला ती आवडते....पहिल्यापासून माधुरीसाठी काहीही करायची तयारी ठेवलीय, ती आजपण आहे... यामागचं कारण पण तितकंच गंभीर आहे, माझ्यासारख्या मुलावर तिने संसार करायचा विचार केला, मला शेवटपर्यंत साथ द्यायचं वचन देऊन स्वतःच घरदार सोडून माझ्यासोबत लग्न केलं, खूप त्याग केलाय तिने ... आणि म्हणूनच तिच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर राहील.मी माधुरीसोबत तिचा नवरा नाही तर एखाद्या मित्रासारखं राहतो, तिचा सांभाळ करतो... बायको ही फक्त चूल अन मूल एवढ्यासाठी नसते, तिच्या मनात आलं तर ती आख्ख जग सांभाळू शकते ; आता माधुरीचं बघा ना, आमचं गाव कशी सांभाळते ते...आपल्या जोडीदाराला आपणच साथ द्यायची असते, मग हा समाज, लोक के म्हणतील यावर लक्ष द्यायचं नाही अन आता मीदेखील तेच करतोय!... तुम्ही विचार करत असाल की आज ह्यो अचानक अस का बोलायला लागला ? या प्रश्नाचं उत्तर उद्या सकाळी आठ वाजता कोरी पाटी प्रोडक्शन या आमच्या युट्युब चॅनेलवर नुकत्याच सुरू झालेल्या "सकस प्रस्तुत - गावाकडच्या गोष्टी : पर्व ३ रे" द्वारे नक्की मिळेल... उद्याचा एपिसोड जरूर पहा !