झी मराठी वरील ‘लागीर झालं जी’ ही  एक अशी मालिका, जी बंद झालीय पण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. कारण, त्यामधल्या आज्या, राहुल्या, भैयासाहेब किंवा विक्या ह्यांनी आणि अन्य कलाकारांनी अल्पावधीतच महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. त्यामधील प्रत्येक कलाकाराचा एक चाहतावर्ग तयार झाला इतक अप्रतिम काम प्रत्येक कलाकाराने केले. 

लागीर झालं जी मधील कलाकार पुन्हा एकत्र

मात्र, लागीर झालं जी मालिका बंद होवून काही महिने झाले पण हे सगळे कलाकार पुन्हा एकत्र कधी दिसतील? दिसले तर सिनेमात की सिरीयलमध्ये असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडत असतील. आपण ही या कलाकारांचे चाहते असाल तर आपल्याला ही हा प्रश्न बहुधा पडला असावा. त्यातल्याच काही प्रश्नांची उत्तर आज आपल्याला मिळू शकतील.     
'लागीर झालं जी' ह्या मालिकेमधील कलाकार नितीश चव्हाण, किरण गायकवाड, राहुल मगदम आणि निखील चव्हाण यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आणि मराठी सिनेसृष्टीत चर्चेला उधाण आलं.  त्या फोटोने मात्र सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले आहे. 

नेमका कोणता फोटो आहे तो ते पाहू.  एकाच दिवशी, एकाच वेळी ह्या चार कलाकारांनी लक्ष्यवेधी कॅप्शन टाकत फोटो पोस्ट केला. 




या फोटोत श्री गणेशाची प्रतिमा दिसत असून त्या  प्रतिमेला पुष्पहार घातला आहे सोबत क्लॅप बोर्ड असून क्लॅप बोर्डवर जे काही लिहिलेले आहे ते मात्र आपल्या मनाची ‘क्वीरिओसिटी’ वाढवणारं आहे.  तर CURIOSITY MEDIA WORKS PVT.LTD अस लिहिलेलं आहे.  अजय भोसले आणि अनुप कारवा ही निर्मात्यांची नाव मात्र पहायला मिळत आहेत. सोबत क्लॅप बोर्ड पुढे भलीमोठी स्क्रिप्ट ठेवलेली दिसत असून त्यावर वाहिलेले आहेत पण या बोर्डवरील टायटल ब्लर केलेले असून दिग्दर्शकाचं नावही ब्लर केले दिसून येतंय. आणि यामुळे आपल्या मनात जे द्वंद्व निर्माण झालं आहे. 

पण आता चर्चेचा मुद्दा हा की ह्या आपल्या आवडत्या चारही कलाकरांचा सिनेमा येतोय की सिरीयल? हा प्रश्न जरी गोंधळात टाकणारा असला तरी टाळता न येणारा आहे. ह्या चार कलाकारांनीच हा फोटो पोस्ट केला आहे, ह्यावरून 'लागीर झालं जी २' येतीये का ? की 
अन्य कोणता सिनेमा येतोय याची बातमी प्रेक्षकांना चाहत्यांना मिळेल हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
जीवन मराठी चॅनेलला युुुट्युबवर सबस्क्राईब करा.
 

https://www.jeevanmarathi.in

जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi

जीवन मराठी ला Twitter वर फॉलो करा.
http://www.twitter.com/marathijeevan

TELEGRAM वर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करून  जॉईन व्हा...
@jeevanmarathi
Jeevan marathi telegram
या स्पर्धात्मक जगात आपल्यास अपडेट ठेवण्यास तत्पर
https://t.me/jeevanmarathi