MHTET 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख
या फोटो नुसार महा टीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याची तारीख 8 नोव्हेंबर 2019 पासून असून अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2019 आहे.
MHTET 2020 ऑनलाईन प्रवेश पत्र प्रिंट करण्याची तारीख
या फोटोनुसार महा टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढता येणार असून त्याची तारीख 4 जानेवारी 2020 ते 19 जानेवारी 2020 असणार आहे.
महा टीईटी परीक्षा दिनांक
तर ही परीक्षा 19 जानेवारी 2020 ला होणार असून त्या दिवशी टीईटीचे दोन्ही पेपर होणार आहेत. यातील पहिला पेपर हा सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजे पर्यंत असणार आहे तर दुसरा पेपर हा दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 पर्यंत असणार आहे.
जीवन मराठी: सोनी टीव्ही ने मागितली माफी🙏 | छत्रपती शिवाजी महाराजांचा केला होता एकेरी उल्लेख https://t.co/0mNpdRbTx1 via @marathijeevan
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) November 8, 2019
जुलै पासून रखडत असलेली ही परीक्षा होणार असल्याने आता बी एड व डी टी एड धारक इच्छुक विध्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे.
तर याचे प्रसिद्धीपत्रक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 यांच्या स्वाक्षरी सहित असल्याने ही परीक्षा होणार असल्याची खात्री देता येते.
या परीक्षेसंदर्भात सर्व माहिती mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.