जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

महा टीईटी परीक्षेचा पाठ्यक्रम (अभ्यासक्रम) | Maharashtra TET Syllabus 2021-22MAHATET Paper 1,2 Exam Pattern> जीवन मराठी

Maharashtra TET Syllabus 2021-22 MAHATET Paper 1,2 Exam Pattern

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी महाराष्ट्र टीईटी अभ्यासक्रम 2021- 2022 (Maharashtra TET Syllabus 2021-22) release केेलं आहे. पेपर १ आणि २ मध्ये भाग घेत असलेल्या  उमेदवारांसाठी हे अभ्यासक्रम जाहीर केले आहे.

Maharashtra TET Syllabus 2021-22

परीक्षा प्राधिकरणाने महाटीईटी अभ्यासक्रम व परीक्षा 2021/2022  जाहीर केली आहे.  महाराष्ट्र टीईटी अर्जाचा फॉर्म सादर केलेल्या इच्छुकांनी आता महाराष्ट्र TET पेपर १ व २ अभ्यासक्रम  पाहू शकता.  

tet 2020, tet definition,tet assam,tet book,b tet syllabus,b tet exam,b tet news,b tet exam date,b tet admit card 2019,b tet qualification,tet maharashtra exam 2019, tet maharashtra result,tet maharashtra 2020,tet maharashtra syllabus pdf,tet maharashtra official website,tet maharashtra application form last date,tet maharashtra question paper pdf,tet maharashtra admit card,tet maharashtra answer key 2018,tet maharashtra answer key,tet maharashtra books in marathi,tet maharashtra books,tet maharashtra books in urdu,maharashtra tet book in hindi,maharashtra tet books pdf,maharashtra tet books online,maharashtra tet exam books,b.ed tet maharashtra,tet b ed syllabus maharashtra,b.ed tet exam maharashtra,b.ed tet result maharashtra,maharashtra tet certificate,maharashtra tet cut off,tet cet maharashtra
mahatet exam

महा टीईटी प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमात
 बालकांचा विकास व शिक्षणशास्त्र (Child Development and Pedagogy, ), गणित व विज्ञान (Mathematics & Science) या विषयाचा समावेश आहे.  म्हणून आम्ही सर्व उमेदवारांना सूचित करतो आहे की ते आजपासून त्यांची महा टीईटी (Maha TET) परीक्षेची तयारी (Maha TET Exam Preparation) सुरू करू शकतात.  सर्व अर्जदार या परीक्षेस बसण्यास तयार आहेत.  म्हणून आजपासून जागरूक व्हा आणि परीक्षेची तयारी सुरू करा.

महा टीईटीची पुस्तके विकत घ्या ह्या लिंक वरून Click Here

(महाराष्ट्र टीईटी परीक्षा अभ्यासक्रम 2021 तपशील)
Maharashtra TET Exam Syllabus 2021 Details

  • Department Name:- Maharashtra State Examination Council, Pune
विभागाचे नाव: - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
  • Exam Name:- MAHATET
परीक्षेचे नाव: - महा टीईटी 
  • Designation:- Teacher
पदनाम: - शिक्षक

Official Site:- https://mahatet.in/

महा टेट 2021/2022 निवड प्रक्रिया
(MAHA TET 2021/22 Selection Process)

खालील पेपर द्वारे त्यांच्या कामगिरीवर आधारित उमेदवार निवडले जातील. म्हणून, त्यांनी दिलेल्या सर्व पेपरमध्ये ते पात्र ठरले पाहिजेत.

पास होण्यासाठी
  • Paper-I- 90 मार्क्स कमीत कमी
  • Paper-II- 90 मार्क्स कमीत कमी

  • पेपर (1) 

१) भाषा-1 व २) भाषा-2

 परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील. 

भाषा-१मराठीइंग्रजीउर्दुबंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजीमराठी किंवा इंग्रजी


इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील 

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :- (Pediatrics and Pedagogy)

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील. 

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील. 

४) गणित :- (Mathematics)

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील. 

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल. 

५) परिसर अभ्यास :- 

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील. 

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या  अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील. 
  • काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. 

अभ्यास करण्यासाठी संदर्भ 

  •  प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम 
  •  अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम 
  • संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली  इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके 

  • पेपर(२)

१) भाषा-१ व २) भाषा-२

पाठ्यक्रम (Syllabus)
या  गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील. 

भाषा-१मराठीइंग्रजीउर्दुबंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजीमराठी किंवा इंग्रजी

  •  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :- (Pediatrics and Pedagogy)

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील. 
या साठी अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील. 

  •  अ) गणित व विज्ञान विषय गट :- (Mathematics and science subject group)

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील. 

 प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील. 

  • ब) सामाजिक शास्त्रे विषय गट (Social science subject group):- 

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. 

 प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. 
  • काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. 

अभ्यास करण्यासाठी संदर्भ 

  •  प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम
  •  अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम 
  •  संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली  इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके 
  •  बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

महत्वाची मााहिती ( Important Information )

  • पेपर १ मध्ये 5 topics विषय असतील ज्यात बालविकास आणि शिक्षणशास्त्र, भाषा - १, भाषा, II, गणित, परिसर अभ्यास
  •  पेपर 1 मध्ये 150 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील.
  •  प्रत्येक विभागात 30 प्रश्न असतील
  •  प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी दिलेला एकूण वेळ 90 मिनिटे असेल
  •  निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाही.(No negative marking will be there)



व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या