आजकाल वाहतुकीचे नियम फार कठोर झाले आहेत. लायसन्स नसेल , कागदपत्रे नसतील , किंवा वाहतुकीचा एखादा नियम मोडल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसेल एवढा दंड भरावा लागत आहे. पण कधी आपण हा विचार करतो का की सध्याला रस्त्यांची अवस्था काय आहे कशी आहे.
मी सातारा जिल्ह्यामध्ये रहातो. रस्त्यांची अवस्था अतिशय खराब म्हणजेच दयनीय अशी आहे. नॅशनल हायवे क्रमांक ४ हा सुद्धा फार दयनीय आणि निकृष्ठ अवस्थेत आहे. या रस्त्यांचे दर्जा सुधारण्याचे चिन्ह शुन्य दिसत आहेत. सरकार कोणाचेही असो. जर आम्ही तुम्हाला निवडुन देतो तर तुम्ही मतदानाच्या वेळीच आम्हाला किंमत का देता? नंतरची ५ वर्ष फक्त जनतेची तडफड आणि समस्यांना तोंड द्यायला भाग का पाडता? तुम्ही तुमची कर्तव्य का विसरता? जनतेने जर निवडून दिले आहे तर त्याची जाण का नाही ठेवत. टोल जर भरावाच लागतो मग रस्त्यांमध्ये सुधारणा का नाही?
सध्याला सातारा, वाडेफाटा परिसरात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये चालकांची चुकी कमी आणि खड्ड्यांची चुकी जास्त म्हणता येईल. सरकार जर चालकाच्या प्रमाणतेचे सर्व पुरावे बघत असेल तर जे लोक रस्त्यांची कामे करतात त्यांच्या दर्जा, गुणवत्तेचे पुरावे का बघत नाही? सर्वसामान्य लोकांच्या चुका या माफीलायक नाहीत तर मग रस्त्यांच्या ठेकेदारांच्या चुका माफीलायक कशा? काल रस्त्याचे काम पुर्ण होत नाही की एका पावसात रस्ता वाहुन जातो. मग दोषी कोण? वाहनचालक , रस्त्यांचे ठेकेदार की सरकार? फिरुन सर्व दोष हा सर्वसामान्यांच्या माथ्यावर मारला जातो.तुम्ही वेडीवाकडी गाडी चालवत आहात वगैरे. पण खड्डे चुकवायला तुम्ही वेडीवाकडी गाडी चालवत होता हे कोणी सरकारी अधिकारी बोलणार नाहीत. माझ स्वत:च एक उदाहरण सांगतो वाडेफाट्याजवळ माझी गाडी खड्ड्यातून गेली माझ्या गाडीचा टायर फुटला. साधारण ५ महिन्यापुर्वी मी माझ्या गाडीचा टायर बदलला होता. त्यानंतर अपघात होवून लागले ते वेगळेच. कमीत कमी मला त्यावेळेला ८००० ते ९००० रुपये खर्च आला, ही रक्कम सर्वसामान्य लोकांसाठी खुप जास्त आहे. पैशाचही जाऊ द्या... जीव गेला तर काय? त्याची भरपाई कोण देणार? मीच नाही पण अशा कित्येक घटना काही दिवसात याच परिसरात घडल्या आहेत. मग सरकार प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? किती बळी गेल्यानंतर सरकार आणि प्रशासन याचा विचार करणार आहे? प्रशासकीय कार्यालयात याचे उत्तर विचारायला गेल्यावर उडवाउडवीचे उत्तर मिळतात. लोकांनो विचार करा. भारत पुढे जातोय की मागे याचा विचार करा. उभे आपणच राहुन याचा जाब विचारणे खूप गरजेच आहे.
जीवन मराठी: बी. एड. डी. टी. एड धारकांना गोड बातमी 😍 TET परीक्षेची आली तारीख https://t.co/pcnys3UKXG via @marathijeevan
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) November 7, 2019
शेवटी माझा एकच प्रश्न आहे की जर तुम्ही टोल चे पैसे वसुल करता, वाहतुकीचे दंड वसुल करता मग हा पैसा नेमका कोठे जातो ? रस्त्यांमध्ये सुधारणा का होत नाही ?
-अभिजीत देशमुख
फेसबुक :
https://www.facebook.com/abhijeet.deshmukh.923
टीप : ह्या लेखातील मते वैयक्तिक लेखकांचे असून वेबसाईटवर केवळ प्रकाशित करण्यात आले आहे.
©जीवन मराठी
Vivo S5 | स्पेसिफिकेशन आले समोर | 14 नोव्हेंबरला लॉन्च https://t.co/TPbcmFZtTE via @marathijeevan pic.twitter.com/EUWFNfToDn
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) November 6, 2019
जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi
जीवन मराठी ला Twitter वर फॉलो करा.
http://www.twitter.com/marathijeevan
TELEGRAM वर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करून जॉईन व्हा...
@jeevanmarathi
Jeevan marathi telegram
या स्पर्धात्मक जगात आपल्यास अपडेट ठेवण्यास तत्पर
https://t.me/jeevanmarathi