अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. अलीकडे सिद्धार्थ आणि त्याची भावी पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर यांचे रोमँटिक पोजमधील फोटोज सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.



 याच वर्षी  24 जानेवारी 2019 ला वांद्रे येथील MIG Club मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला पण त्यापूर्वीपासूनच त्यांनी आपले एकत्र असलेले फोटोज शेअर करत चाहत्यांना खिळवून ठेवले होते. तर आता यापुढे जाऊन त्यांनी अंडरवॉटर रोमान्स करत असलेले फोटोज शूट केलं असून हे फोटोज त्यांच्या चाहत्यांना फार आवडलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटोज शेअर तर करतच आहेत सोबत त्यांच्या या फोटोज वर लाईक्स आणि शेअर चा धुमाकुळ सुरू आहे. 


सिद्धार्थने हे फोटोज आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले असून आतापर्यंत या फोटोला 46 हजार वर लाईक्स आले आहेत. त्यांचे हे फोटोज अंडर वाटर असून व्हाईट कलर च्या ड्रेस मध्ये त्यांचा हा फोटो खूपच स्टनिंग आला आहे. तर हे फोटोज फोटोग्राफर गौतम हिंगे यांनी शूट केलं आहे.




मागील वर्षी फेब्रुवारीत व्हॅलेंटाइन डे ला सिद्धार्थने प्रथम इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून आपल्या प्रेमाची कबुली दिली. तर सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोजही केलं होतं. आता हे दोघेही लग्न कधी करणार याबाबत त्यांचे चाहते  जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.



सिद्धार्थ आणि मिताली हे दोघे ही एका ऑस्ट्रेलियन चित्रपटात दिसणार असून दोघंही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नुकतेच ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. सुमारे महिनाभर तिथे ते राहणार आहेत.



सिद्धार्थ चांदेकर ने केलेले चित्रपट व कार्यक्रम
  • गुलाबजाम २०१८
  • Mayanagari-City of Dreams २०१९
  • झेंडा २००९
  • क्लासमेट्स २०१५
  • हमने जीना सीख लिया २००७
  • Vazandar २०१६
  • जीवलगा २०१९
  • रणांगण २०१८
  • Lost & Found २०१६
  • Lagna Pahave Karun २०१३
  • Prem Mhanje Prem Mhanje Prem Asta २०१३
  • Dusari Goshta २०१४