कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्ही वरील मालिके मध्ये महाराष्ट्रात स्वराज्याच स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर आणि जन माणसांत संताप निर्माण झाल्याने सोनी टीव्हीने ट्विट करत माफी मागितली आहे. या कार्यक्रमात हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडिया आणि जन मााणसांमध्ये टीकेची झोड उठली होती.
‘KBC’मध्ये बुधवारी ब्रॉडकास्ट झालेल्या भागात दुर्लक्षातून छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा चुकीचा संदर्भ दिला गेला. आम्ही या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेत आम्ही कालच्या भागात खेद व्यक्त करण्यासाठी एक स्क्रोल चालवला होता असं ट्वीट सोनी टीव्हीच्या ट्विटरवर करण्यात आलं आहे.
There was an inaccurate reference to Chhatrapati Shivaji Maharaj during Wednesday’s KBC episode, due to inadvertence. We deeply regret the same and being mindful of the sentiments of our viewers have carried a scroll expressing regret during our episode yesterday.
There was an inaccurate reference to Chhatrapati Shivaji Maharaj during Wednesday’s KBC episode, due to inadvertence. We deeply regret the same and being mindful of the sentiments of our viewers have carried a scroll expressing regret during our episode yesterday. #KBC11 pic.twitter.com/WARGsKnk2p
— Sony TV (@SonyTV) November 8, 2019
यामध्ये सोनी tv ने KBC कार्यक्रमात सुद्धा एक स्क्रोल जोडून माफी मागितली होती.
काय घडलं आहे प्रकरण?
नुकत्याच ब्रॉडकास्ट केलेल्या एपिसोडमध्ये हॉटसीट वर बसलेल्या स्पर्धक शाहेदा चंद्रन यांना हा प्रश्न विचारण्यात आला.
‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’
- महाराणा प्रताप
- राणा सांगा
- महाराजा रणजीत सिंह
- शिवाजी
व हे वरील चार पर्याय दिले होते. यावेळी प्रेक्षकांचे म्हणणं अस आहे की या प्रश्नाचे उत्तर वाचत असताना पर्याय दुरुस्त करता आले असते.
त्यामुळे सोशल मीडियावरुन प्रेक्षकांसह अमिताभ बच्चन यांचे चाहते देखील नाराजी व्यक्त करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी KBC मध्ये माफी मागावी अशी मागणी सोशल मीडिया युजर करत आहेत करत आहेत.

आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन @sonykbc10 नी अपमान केला आहे..
— nitesh rane (@NiteshNRane) November 8, 2019
लवकर माफी मागा नाही तर शो ची एक पण lifeline राहणार नाही !!
आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विट करत लवकर माफी मागा नाही तर शो ची एक पण lifeline राहणार नाही अस म्हंटल आहे.
नितिन छवन-पाटिल यांनीOne of the main objectives of Aurangzeb’s policy was to demolish Hindu temples ! And many brutal objectives so far.........
— Nitin Chavan-patil (@Ni3RChavan) November 8, 2019
How KBC can call him "Samrat"🤔😡
And our Chhatrapati Shivaji Maharaj as only "Shivaji" !!!#Boycott_KBC_SonyTv #AmitabhBachchan pic.twitter.com/Q6E78LYlvJ
लिहल आहे " औरंगजेबच्या धोरणांचे एक प्रमुख ध्येय म्हणजे हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करणे. केबीसी त्याला सम्राट कसे म्हणू शकेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त शिवाजी का म्हटले गेले?"
नवा अपडेट केलेला वििडेओ