शेतामध्ये, वेगवेगळ्या लोकेशन वर जाऊन शूटिंग करणारे, 90 च्या दशकातील गाणी बॅकग्राऊंडला असलेली "मैने प्यार किया" यासारख्या चित्रपटातील गाण्यावर आपल्या अदा दाखवत, जे जोडपे आपल्याला काही दिवसापासून सोशल मीडियावर आणि टिकटॉक, विगो सारख्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर गाजलेले दिसत आहे. ते जोडपे, त्या जोडप्याची माहिती आपल्याला मिळालेले आहे. आपल्यालाही हा प्रश्न असेलच की सोशल मीडियावर हे धमाल करणारे दोघेजण कोण असतील. हे कुठल्या गावचे असतील. याची उत्सुकता आपल्याला असेलच, चला तर मग जाणून घेऊया....
माळमाथा या परिसरातील जामदे (ता.साक्री) या गावातील फासेपारधी समाजातील या आदिवासी जोडप्याची सध्या टिकटॉक व्हिडिओज सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर जब्बर धुमाकूळ घालत आहेत. तर आता बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच लाखो युजर्स त्यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रीया नोंदवून या व्हिडीओना डोक्यावर घेतले आहे. पण युजर्सना पडणारा प्रश्न म्हणजे हे कलाकार कोण ? कुठले? नेमके ते जोडपेच आहे ना? कोठे हे व्हिडिओ बनविले गेले?
तर मंडळी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडलेली आहेत...
जोडप्याची कमाल नुसती धम्माल
जामदेपासून काही अंतरावर शेतामध्ये झोपडीसारख्या छोट्या घरात राहत असलेले दिनेश शंकीलाल पवार -वय 31 व लखाणी दिनेश पवार -वय 25 या जोडप्याच्या धडपडीला दाद द्यावी लागेल. दिनेश यांचे प्राथमिक शिक्षण झाले असून त्यांच्या पत्नी लखाणी या अशिक्षित आहे. या दांपत्याचा व्यवसाय शेती आहे तर यांना रश्मी (वय 13) आणि शिवम (वय 11) अशी दोन मुले आहेत ते दोघे नवापाडा येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत.
गावातील जानिश सुरेश चव्हाण यांच्या सहकार्याने त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात त्यांच्या जवळच्या शेतात तसेच आसपास च्या परिसरात त्यांनी अर्धा ते एका मिनिटांचे सुमारे शंभरावर 'टिकटॉक' व्हिडिओ बनवले.
संपादन शुभम गौराजे