मंडळी नमस्कार, तर आज जाणून घेऊया अब्बा हार्मोनियम खाते थे. फेम या वायरल व्यक्ती बद्दल गेले कित्येक दिवस झाले इंटरनेटवर या व्यक्तीचे मिम्स ने ही धुमाकूळ घातला असून ही व्यक्ती कोण आहे नेमकं काय काम करते आणि हा व्हिडीओ का व्हायरल होतोय हे अनेक प्रश्न अनेक वाचकांना तो व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षकांना पडत आहे. तर मंडळी आपण आज जाणून घेऊया या व्यक्तीबद्दल.
तर ही व्यक्ती आहे पाकिस्तानी कलाकार मोईन अख्तर हे एक पाकिस्तानी कलाकार असून त्यांनी टेलिव्हिजन चित्रपट रंगमंच या सर्वच पडद्यांवर स्टेजवर आपल्या विनोदी कला शैलीने प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे तर मोईन अख्तर यांचा जन्म 24 डिसेंबर 1950 रोजी झाला होता...
ते पाकिस्तानातील प्रसिद्ध असे स्टेज आर्टिस्ट हार्मोनियम वाजवणारे कॉमेडियन होस्ट राईटर सिंगर ट्रॅक्टर आणि प्रोडूसर अशा सर्व कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवलेले होते. त्याच्या सहकारी कलाकार अन्वर मकसूद आणि बुशरा अन्सारी यांच्या समवेत रेडिओ पाकिस्तानच्या कार्यक्रमातुन वर आलेले होते.तो त्याच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्व "रोझी" च्या माध्यमातून एक आयकॉन बनला आणि उपखंडातील चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
त्याने त्यांची कारकीर्द 45 वर्षाहून जास्त गाजवली.
तर यांचा। मृत्यू 22 एप्रिल 2011 रोजी झाला.
अख्तरचा जन्म पाकिस्तानच्या सिंध, कराचीमध्ये झाला. मोईनचे वडील मुहम्मद इब्राहिम मेहबूब, वयाच्या 92 व्या वर्षी अख्तरच्या काही महिन्यांनतर मरण पावले. त्यांचा जन्म आधुनिक काळातल्या उत्तर प्रदेश(भारत) राज्यातील मुरादाबाद येथे झाला आणि भारत पाकिस्तान फाळणी नंतर कराचीमध्ये स्थायिक झाल्यानंतर, "स्वत: च्या प्रिंटिंग प्रेसमध्ये आणि कपड्यांच्या व्यवसायामध्ये कंत्राटदार म्हणून त्यांचे आयुष्य गेले."इंग्रजी, बंगाली, सिंधी, पंजाबी, मेमनी, पश्तो, गुजराती आणि उर्दू या सर्व भाषांमध्ये मोईन अख्तर बोलण्यास अस्खलित होते.
मोईन अख्तर यांनी वयाच्या 13 व्या वर्षी बाल अभिनेता म्हणून आपल्या अभिनय करियरची सुरूवात केली होती. त्यांनी शेक्सपियरच्या नाटकामध्ये द मर्चंट ऑफ व्हेनिसमधील शायलॉकची भूमिका केली होती.
अख्तरची विनोदबुद्धी अत्यंत डायनॅमिक आणि अष्टपैलू होती. त्यांनी त्यांच्या टेलिव्हिजन करियरची सुरवात 6 सप्टेंबर 1966 रोजी PTV वरील एक शो मधून केली हा शो पहिल्या डिफेन्स डे बद्दल ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी स्टँड अप कॉमेडियन म्हणून हॉलिवूड अभिनेता अँथनी क्विनची तोतयागिरी आणि यूएसएचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या भाषणांपैकी एक मिमिक्री केली.टेलिव्हिजन स्टेज शोमध्ये त्याने बर्याच भूमिका केल्या आहेत, नंतर अनवर मकसूद आणि बुशरा अन्सारी यांच्याबरोबर त्यांनी टीमअप केलं.
त्यांनी केलेलं मुख्य कामांपैकी
रोझी
या नाटकात त्यांनी स्त्री कलाकार म्हणून काम केलं. त्यामुळे ते प्रेक्षकांच्यात प्रसिद्ध झाले तर रॉसी हा डस्टिन हॉफमन स्टारिंग केलेला ‘Tootsie’ या हॉलिवूड चित्रपटाचा उर्दू रूपांतर होता. मोईन सांगितलं की त्याच्या आवडत्या पात्रांपैकी ते एक पात्र आहे.
लूज टॉक (टॉक शोज)
1995 मध्ये एआरवाय डिजिटल (ARY Digital) वर सुरू झालेल्या टॉक शो मध्ये, तो टीव्ही होस्ट अनवर मकसूद यांनी मुलाखत घेतलेल्या 400 हून अधिक एपिसोडमध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये नवीन व्यक्तिरेखा साकारत काम केले होते. या कार्यक्रमाचे लेखक अन्वर मकसूद होते. मोईन अख्तर यांनी 'क्या आप Banaingay करोडपती' हा शो आयोजित केला होता, हू वॉन्ट्स टू मिलियनेअर? या कार्यक्रमाची पाकिस्तानी आवृत्ती होती. त्यांनी दिग्गज व्यक्तींचा समावेश असलेल्या कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आणि यामध्ये दिलीप कुमार, लता मंगेशकर आणि माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक भारतीय व पाकिस्तानी दिग्गजांसमवेत स्टेजवर सादर केले.
सध्या इंटरनेट वर गाजत असलेल्या मी मध्ये मोईन अखतर आणि अन्वर मकसूद हे असून लूज टॉक या कार्यक्रमातील हा मुलाखतीचा भाग आहे ज्यामध्ये त्यांनी अब्बा हार्मोनियम खाते ते उठ के पीछे बजा तेथे असले वाक्यांचे उल्लेख आलेला आहे यामध्ये सुसंस्कृत असलेल्या मुलाखतकारस आपल्या शिवीगाळी आणि घमंडी शब्दांनी, वाक्यांनी पार जळवून सोडला आहे.