कॅबिनेट मिशन या योजनेप्रमाणे जुलै 1946 मध्ये प्रांतिक कायदेमंडळां तर्फे या संविधान सभेची निर्मिती झाली पण ही सार्वभौम नव्हती तसेच विधानसभेत जनप्रतिनिधी नव्हते तर 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या एका ठरावानुसार ही संविधानसभा सार्वभौम झाली. आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटनेच्या मसुदा समितीची नेमणूक केली. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पास करण्यात आली तर 26 जानेवारी 1950 पासून ती अमलात आली म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.


  • राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये
  • लिखित आणि विस्तृत राज्यघटना
  • सार्वभौम घटना मंडळाद्वारे निर्मिती
  • संसदीय शासन व्यवस्था
  • संघराज्य पद्धती
  • अंशत परिवर्तनीय आणि अंशत परिदृढ राज्यघटना 
  • एकेरी नागरिकत्व
  • धर्मनिरपेक्ष राज्य
  • मूलभूत अधिकार 
  • नीति दर्शक तत्वे
  • स्वतंत्र आणि दुहेरी न्यायपालिका
  • इतर देशातील राज्य घटनांचे संमिश्रण
  • निरंकुश वाद
  • उदारवाद 
  • समाजवादाचे मिश्रण
  • जन निर्मित संविधान
  • लोक कल्याणकारी राज्य

  • लिखित आणि विस्तृत राज्यघटना
भारत देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपातील राज्यघटना असून या राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमी असून दहा परिशिष्ट आणि 22 विभागात विभागले आहे.
  • संसदीय शासन व्यवस्था
भारत देशाने संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला असून ही संसदीय शासन पद्धती ती इंग्लंड देशाच्या संसदीय शासन पद्धती नुसार कार्यकर्ते परंतु ती संपूर्णतः इंग्लंड देशासारखे नाही.
  • सार्वभौम घटना मंडळाद्वारे निर्मिती
भारत देशाची राज्यघटना ही परंपरेने तयार झाली नाही तर सार्वभौम घटना मंडळाद्वारे तिची निर्मिती झालेली आहे ही राज्यघटना लिहिण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महीने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला.
  • अंशता परिवर्तनीय आणि अंशत परिदृढ राज्यघटना
भारताचे संविधान हे अमेरिकेसारखे परिदृढ नाही इंग्लंड सारखे परिवर्तनीय नाही तर भारतीय संविधान हे काही बाबतीत परिवर्तनीय असून काही बाबतीत परिदृढ आहे.
  • संघराज्य पद्धती
भारतात अनेक प्रांतांचे आणि संस्थानांचे मिळून बनलेले एक संकीर्ण राज्य आहे या देशाला लिखित संविधान सर्वोच्च न्यायालय शक्तिशाली केंद्र यामुळे या राज्यघटनेचा प्रकार संघराज्याचा आहे आणि त्याचा आत्मा एक केंद्रीय स्वरूपाचा आहे असे म्हटले जाते म्हणजे भारतीय संविधान हे पूर्णतः एकात्मक किंवा पूर्णता संघात मग नाही तर त्या दोन्हींचे संमिश्रण आहे.