जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Auxiliary verbs (सहाय्यकारी क्रियापदे)- English Grammar

Auxiliary verbs(सहाय्यकारी क्रियापदे)
वाक्याच्या अनेक घटकांपैकी क्रियापद हा एक प्रमुख घटक आहे. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण
होत नाहीत किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. क्रियापदाला सहाय्य करणारी इतर काही क्रियापदे
असतात. या क्रियापदास सहाय्य करणाऱ्या इतर क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापद असे
म्हणतात. या सहाय्यकारी क्रियापदांचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो.

Auxiliary verbs (सहाय्यकारी क्रियापदे)- English Grammar

उदा. काळ बदलणेसाठी, प्रयोग बदलणेसाठी, प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य बनविण्यासाठी.
सहाय्यकारी क्रियापदे खालीलप्रमाणे
1) have - have/has/had
2) can
3) do-do, does, did
4) shall
5) should
6) will
7) would
 8) could
9) must
10) might
11) ought (to)
12) must
13) used to
14) need
15) dare
16) may
17) be - was/were/am/are/is

सहाय्यकारी क्रियापदांचे विविध उपयोग

1) काळ बनविण्यासाठी
2) प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी
3) काही विशिष्ट रचना करण्यासाठी
4) नकारार्थी वाक्य बनविण्यासाठी

सहाय्यकारी क्रियापदांचे एकूण दोन प्रकार आहेत
1)Primary Auxiliaries - प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे

2) Modal Auxiliaries.
Shall, can, could, should, would, will, might, may, must, ought to यांना
defective verbs असे म्हणतात.
वैशिष्ट्ये-
1) त्याचे infinitive चे रुप तयार होत नाही.
2) त्यांना ing युक्त रुपही नाही.
3) तृतीय पुरुषी एकवचनी रुपात s लागत नाही.
4) स्वतचा अर्थ नसल्याने स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही.
Auxiliaries चे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
1) Have -
  • Have ची रुपे पुढीलप्रमाणे - has, have, had जवळ असणे या अर्थी
वापरले जाते.
e.g. I have a book.
  • पूर्ण काळ करताना
e.g. I have eaten an apple
  • आज्ञा दर्शविणेसाठी infinitive बरोबर वापरले जाते.
e.g. I have to start reading soon.
2) can-
  • can या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर क्षमता व्यक्त करण्यासाठी केला जातो.
1) शक्यता व्यक्त करण्यासाठी वापर -
e.g. He can come tomorrow.
2) विनंती करताना वापरले जाते.
e.g. Can you give me your pen.
3) परवानगीसाठी वापर
e.g. You can go to see the circus.
4) मनाईप्रतिबंध करण्यासाठी वापरले जाते
e.g. You cannot leave this hall.
5) सामर्थ्य शक्ती प्रदर्शनासाठी वापर
e.g. I can write a letter.

3) Do - या सहाय्यकारी क्रियापदाची रुपे पुढीलप्रमाणे आहेत 
do, does, did
उपयोग पुढीलप्रकारे करता येतो 
1) नकारार्थी वाक्य बनविताना
e.g. He didnot come to me yesterday.
2) क्रियापदाच्या अर्थावर जोर stressemphasis देण्यासाठी.
e.g. Do write me letter regularly.
3) प्रश्नार्थक वाक्य बनविताना वापर करता येऊ शकतो.
e.g. Do you like this colour
4) मुख्य क्रियापद म्हणून वापर करताना 
e.g. Do your work carefully.

4) Be - या सहाय्यकारी क्रियापदाची रुपे पुढीलप्रमाणे आहेत 
am, is, are, was, were
be या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर  
1) अपूर्ण काळ बनविण्यासाठी.
e.g. I am reading a book. Policensruption
2) Passive रचना करताना.
___e.g. The thief was arrested by the police.
3) इतर काही प्रकारे
e.g. 1) It is nine a.m.
2) He is sad.
3) I am very restless.

5) Should . हे shall या सहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळी रूप, याच्या सहाय्याने
क्रिया घडण्याची अपेक्षा असते.
1) परवानगीसाठी
e.g. Should we go to Mahabaleshwar 
2) नम्रविनंती.
e.g. I should be happy if you could guide me.
 3) कर्तव्य / बंधन व्यक्त करण्यासाठी
e.g. You should always work very honestly.
4) माहिती/मत/सूचना व्यक्त करण्यासाठी 
e.g. I should be happy to know the details.

6) Could - Could हे can या सहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळी रुप आहे. भविष्य काळातील
शक्यता व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो.
1) विनंती करताना याचा वापर केला जातो.
e.g. Could I see the picture ?
2) गूढता दर्शविण्यासाठी.
e.g. What could it be?
3) अप्रत्यक्ष कथन करताना.
e.g. He said he could write a letter.
4) भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर.
e.g. She could not find the answer.

7) Will - साधा भविष्यकाळ तयार करण्यासाठी Will या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर
केला जातो. इतरही याचे अनेक उपयोग आहेत.
Will या सहाय्यकारी क्रियापदाचे उपयोग 
1) साधा भविष्यकाळ तयार करण्यासाठी वापर.
e.g. I shall write a letter.
2) निश्चय व्यक्त करताना वापर केला जातो.
e.g. I will work very hard to get first class in the examination.
3) विशिष्ट सवयीचे वर्णन.
e.g. He will talk about nothing but cricket.
4) अप्रत्यक्षआज्ञा किंवा हुकूम देण्यासाठी
e.g. You will get together on the play ground for exercise.
5) विनंती करण्यासाठी वापर
e.g. Will you lend me your pen ?
6) धमकी देताना वापर.
e.g. Will you shut up?

8) Would - Would हे Will चे भूतकाळी रुप आहे. सहाय्यकारी क्रियापद म्हणून Would
चा पुढीलप्रमाणे उपयोग केला जातो.
1) इच्छा किंवा मत व्यक्त करणेसाठी.
e.g. I would like to visit Mahabaleshwar.
2) निश्चय व्यक्त करण्यासाठी.
e.g. She would not sing today.
3) अप्रत्यक्ष कथन करण्यासाठी वापर.
e.g. He told that he would not watch the cricket match on T.V.
4) नम्र विनंती करण्यासाठी वापर.
e.g. Would you like to give me your pen?
5) सवय.
e.g. She would sit for hours watching cricket match.
6) अट दर्शक याचा वापर केला जातो.
e.g.If he had studied hard, he would have passed the examination.

9) Might - Might हे May चे भूतकाळी रुप.
Might चे आणखी उपयोग पुढीलप्रमाणे.
1) नापसंतीअनिच्छा व्यक्त करण्यासाठी . 
e.g. You might pay more attention to your studies.
2) अटदर्शक
e.g. If you called him, he might come.
3) क्षीण याचना व्यक्त करण्यासाठी Might चा वापर केला जातो.
e.g. She might buy a new pen.

10) May - May या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर परवानगी/शक्यता/हेत दिग्दर्शन या
साठी केला जातो.
1) शक्यता वर्तविण्यासाठी वापर.
e.g. She may be in the central hall.
2) सदिच्छा व्यक्त करण्यासाठी
e.g. May God rest his soul in heaven.
3) हेतू दर्शक म्हणून वापर. 
e.g. We eat that we may live.
4) परवानगी (औपचारिक)
e.g. May I go out sir

11) Shall - साधा भविष्यकाळ तयार करण्यासाठी वापर केला जातो. याचे इतरही अनेक
उपयोग आहेत.
1) भविष्यकाळासाठी उपयोग
e.g. We shall play tennis tomorrow.
2) निर्धार व्यक्त करण्यासाठी.
e.g.I shall pass the exam with first class.
3) परवानगी.
e.g. Shall we go home?
4) आश्वासनासाठी.
e.g. You shall have holiday tomorrow.
5) द्वितीय/तृतीय पुरुषाबरोबर वापरुन धमकी/आज्ञा/निर्धार व्यक्त करण्यासाठी.
e.g. You shall obey my orders.
12) Must - Must या सहाय्यकारी क्रियापदाच्या सहाय्याने निश्चितता, आवश्यकता, खात्री
व्यक्त केली जाते.
1) भविष्यकाळासाठी उपयोग
e.g.We must obey the orders.
2) मनाईप्रतिबंध व्यक्त करण्यासाठी वापर -
e.g. You must not play cricket.
3) आज्ञा
e.g. You must go to school everyday
4) दाट शक्यता व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो.
e.g. He must be made to work hard.
5) नामासारखा उपयोग.
e.g. It is must for him.

13) Ought (to) - Ought (to) या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग कर्तव्य भावना /
आवश्यकता  / इष्टता व्यक्त करण्यासाठी केला जातो.
e.g.1) We ought to love our motherland.
2) Students ought to respect their teachers..
3) He ought to speak only truth in the court.
14) Need - Need या क्रियापदाचा वापर मुख्य आणि सहाय्यकारी क्रियापद अशा दोन्ही
प्रकारे केला जातो. सामान्यत नकार दर्शविण्यासाठी याचा उपयोग जास्त केला जातो.
1) मुख्य क्रियापद म्हणून.
e.g. 1) He needs my guidance.
2) She does not need your help.
2) याचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केल्यास शक्यता/गरज व्यक्त होते.
e.g. 1) He need not go home.
3) Infinitive सोबत need चा वापर केला जातो.
e.g. 1) I don't need to help him.

15) Dare - Dare चा वापर मुख्य क्रियापद तसेच सहाय्यकारी क्रियापद म्हणूनही केला
जातो. क्रियापद म्हणून वापरताना dare/dares/dared रुपे होतात पण सहाय्यकारी
क्रियापद म्हणन वापरताना वरीलप्रमाणे त्याची रूपे होत नाहीत
उपयोग 
1) मुख्य क्रियापद म्हणून जेव्हा dare वापरले जाते तेव्हा त्याचा अर्थ आव्हान देणे/
धैर्य असणे असा असतो.
e.g. 1) He does not dare to show his progress card to his father.
2) He dares me to fight.
2) सहाय्यकारी क्रियापद म्हणून जेव्हा dare वापरले जाते. प्रश्नार्थक किंवा नकारार्थी
रचना करताना याचा जास्त वापर केला जातो.
e.g. 1) He dares not oppose me.
2) The driver dares not stop the car.
16) Used to - Used to या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर भूतकाळातील सवय
दर्शविण्यासाठी केला जातो.
उपयोग
e.g. 1) I used to see Hindi films in my childhood.
2) Rahul Dravid used to play cricket in his school going days.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या