नमस्कार, सीटीईटी परीक्षा पुन्हा एकदा जाहीर झालेले आहे ही परीक्षा जुलै 2020 रोजी महिन्यात असणार आहे तर त्या बद्दलची माहिती मी तुम्हाला या पोस्ट मधून देत आहे.तर मंडळी आता टीईटी दिला असाल आपले मार्क कमी पडत असतील किंवा पेपर सुटत नसेल तर आपण या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता. या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती देत आहे कृपया हि पोस्ट आपल्या मित्रांना वर्ग मित्रांना शेअर करा जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळू शकेल.

सीटीईटी परीक्षा जाहीर | जुलै 2020 | परीक्षा देण्यासाठी काय पात्रता लागते | CTET- JULY 2020
सीटीईटी परीक्षा जाहीर | जुलै 2020 | परीक्षा देण्यासाठी काय पात्रता लागते | CTET- JULY 2020

तर मंडळी ह्या पोस्टमध्ये मी तुम्हाला अधिक माहिती देणार आहे ती म्हणजे तिथी एक्झाम दिल्यानंतर काय काय होतं CTET एक्झाम दिल्यावरही आपल्याला महाटीईटी द्यावी लागते का तसंच  सीटीईटी एक्झाम  पास झाल्यावर आपल्याला कुठे कुठे याचा फायदा होऊ शकतो ही सर्व इन डिटेल माहिती मी तुम्हाला देत आहे.
तसंच सीटीईटी परीक्षा देण्यासाठी काय पात्रता लागते सोबत स्थिती पास होण्यासाठी किती मार्कांची पात्रता लागते हे सर्व मी सांगणार आहे.

 सीटीईटी एक्झाम 5 जुलै 2020 रोजी रविवारी होणार आहे.ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो एप्लीकेशन करावं लागतं आणि याची तारीख 24 जानेवारी 2020 पासून 24 फेब्रुवारी 2020 पर्यंत आहे.आणि 24 फेब्रुवारी 2020 पर्यंत आपला फॉर्म भरून झाला असेल तर आपल्याला तिथून पुढे 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत त्याची फी भरायची तारीख देण्यात आलेली आहे.

तर मंडळी आता पाहूयात आपण  सीटीईटी परीक्षेचा फायदा काय?
 ही परीक्षा पास झाला असाल तर आपल्याला
  • केंद्रीय विद्यालय (kvs) साठी आपण पात्र ठराल
  • नवोदय विद्यालय (nvs)  साठी आपण  असाल
  • तिबेटियन शाळेमध्ये ही तुम्ही अर्ज करू शकता
  • केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आहेत त्या शाळांसाठी तुम्ही पात्र ठरता
  • आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शिक्षक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण जर सीटीईटी पास झाला असाल तर आपल्याला महाटीईटी  पास होण्याची गरज नाही.


मंडळी त्यासाठी महत्त्वाची म्हणजे ही परीक्षा जी स्थिती आहे पास होण्यासाठी एकदम सोपा अभ्यासक्रम आहे आणि त्याचा पेपर पॅटर्न ही खूप सोप आहे.

  •  गुण निकष

मंडळी, आता पाहू या आपण ही परीक्षा पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता असते म्हणजेच आपल्या कॅटेगिरी साठी किती मार्क हवेत जेणेकरून आपल्याला ही परीक्षा पास आहे,  अस सर्टिफिकेट मिळेल.

मंडळी, यामध्ये आपल्याला कास्ट वाईज ती
मार्कंची रचना केली गेली आहे.
  •  जर आपण ओपन कॅटेगिरी मध्ये असाल किंवा एसबीसी असाल किंवा ईडब्ल्यूएस असाल तर तुम्हाला राज्य शाळेसाठी 90 मार्क हवेत केंद्रीय शाळेसाठी 90 मार्क हवेत येत केंद्रशासित शाळेसाठी ही 90 मार्क हवेत आणि दुसऱ्या राज्यात आपण अर्ज करणार असाल तरीही 90 मार्क हवेत यामध्ये सर्व शाळेमध्ये 90 मार्ग ओपनवाल्यांना हवेत.
TET, CTET, TAIT FAQ | पहिली ते बारावी पर्यंत शिकवण्यासाठी कोणकोणत्या एक्झाम पास असाव्यात.
http://www.jeevanmarathi.in/2020/01/tet-ctet-tait-faq.html
  •  तर  ओबीसी साठी राज्यातल्या शाळेमध्ये 82 मार्कांची गरज आहे. केंद्रीय शाळेमध्ये सुद्धा 82 मार्कांची गरज आहे. केंद्रशासित शाळांमध्ये आपल्याला 90 मार्क हवेत ते तसेचदुसऱ्या राज्यात जर आपण अर्ज करणार असाल तरीही 90 मार्कस हवेत.

  •  sc/st एसटी कास्ट मध्ये असाल तर आपल्याला सर्व ठिकाणी 82 मार्क हवेत म्हणजे राज्य,  केंद्रीय, केंद्रशासित, आणि दुसऱ्या राज्यात शाळेत अर्ज करावयास तुम्हाला बँक मार्क हवे.

तर मंडळी या परीक्षेसाठी आपल्याला दोन माध्यम मिळतात एक हिंदी आणि दुुसरा इंग्रजी, तर परीक्षा देत असताना आपल्याला जी प्रश्नपत्रिका मिळते त्यामध्ये दोन्ही माध्यमांमध्ये ही पेपर मिळतात त्यामुळे आपल्याला पेपर सोडवताना अडचण येत नाही. लैंग्वेज साठी आपण मराठी भाषा निवडली असेल तर मात्र आपल्याला 30 मार्कांचे प्रश्न हे मराठीमध्ये असतात.
या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजेच स्पर्धा परीक्षेला कसे तीन किंवा चार प्रश्न चुकीचे असल्यास एक मार्क कट केले जातो त्या पद्धतीने येथे  ती मार्किंग सिस्टीम नाहीये.
तर मंडळी, आपण जर महाराष्ट्रात राहत असाल तर आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये पाच केंद्र आहेत येत्या आपण जाऊन परीक्षा देऊ शकतो ते आपल्याला पेपरचे फॉर्म भरतो आपण ऑनलाईन त्यावेळी आपल्याला निवडावे लागतात यामध्ये
1. मुंबई
2. औरंगाबाद
3. नागपूर
4.पुणे
5.नाशिक
हे केंद्र उपलब्ध असून यातील केंद्र आपल्याला चार निवडावे लागतात पण सहसा करून आपण जो पहिल्यांदा रेफरन्स देतो तोच केंद्र आपल्याला पडत असतो.


तर आता पाहूया या परीक्षेसाठी आपल्याला किती फी भरावी लागेल.

 यामध्येसुद्धा कॅटेगिरी वाईज डिस्ट्रीब्यूशन करण्यात आलेला आहे हे मागच्या वर्षी या परीक्षेची फीथोडी कमी होती.पण ती यावर्षी वाढवण्यात आलेली आहे.
 यामध्ये जनरल आणि ओबीसी कॅटेगरी साठी जर केवळ एक किंवा केवळ दोन पेपर द्यायचा असेल तर एक हजार रुपये असेल. आणि दोन्ही पेपर जर एकाच वेळी द्यायचे असतील बाराशे रुपये असेल,
तर एस सी/ एसटी/ डिफ.abled पर्सन साठी जर एक पेपर किंवा दुसरा पेपर द्यायचा असेल तर पाचशे रुपये फी आहे आणि बोथ पेपर द्यायचे असतील म्हणजे दोन्ही पेपर एका वेळी द्यायचे असतील तर सहाशे रुपये असणार आहे.

  • तर मंडळी फी आपण e चलनाद्वारे सुद्धा भरू शकता.
यासाठी ई-चलन हे सिंडिकेट बँक कडून किंवा कॅनरा बँक कडून काढावा लागेल.
  •  शिवाय आपण ही फी ऑनलाइन मोड  ते सुद्धा भरू शकता यामध्ये आपल्याला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग द्वारा ही फी भरता येऊ शकते.

तर आता महत्त्वाचं म्हणजे आपण जर ऑनलाईन एक्झाम ची फॉर्म भरत असतो, एप्लीकेशन करत असतो त्यावेळी जर काही चुका झाल्या तर त्यासाठी आपल्याला 24 फेब्रुवारी नंतर काही वेळ दिला जातो. म्हणजे परीक्षा फॉर्म  भरायचे अंतिम दिवस झाल्यानंतर ही मुदत आपल्याला मिळते. पण आपण शक्यतो करून अचूकच माहिती भरायचा प्रयत्न करा. सोबतच आपला फोटो आणि सही हे आपलेच आहेत का हे पहा जर आपण नेट कॅफेमध्ये फॉर्म भरत असाल, तर तेथे भरपूर फार्म एकावेळी आल्यामुळे गोंधळ होतो आणि आपला फोटो दुसऱ्याला किंवा आपली सही दुसऱ्याला दुसऱ्याला फोटो आपल्याला किंवा सही आपल्याला येऊ शकते त्यामुळे आपण फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा. जर चुकलेला फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला 17 मार्च 2020 पासून 24 मार्च 2020 पर्यंत तारीख देण्यात येणार आहे.
तर रजिस्ट्रेशन करत असताना आपले नाव वगैरे अन्य माहिती आहे ती मात्र अचूक भरावी त्यामध्ये नंतर बदल करता येत नाही.

मंडळी आता पाहूयात आपण या तीन शेडूल कसा असणार आहे

 यामध्ये 
  •  जुलै 5, 2020 रोजी दोन्ही पेपर असणार आहेत 
  • तर यातील पहिला पेपर आहे तो सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी 
तर हा पेपर अडीच तासाचा असून 12 वाजता संपणार आहे. 
  • दुसरा पेपर  दोन तासानंतर  2 वाजता चालू होणार आहे आणि 4:30 वाजेपर्यंत तो पेपर असणार आहे हाही पेपर अडीच तास असणार आहे.


तर मंडळी आता या परीक्षेसाठी नेमक्या पात्रता काय आहेत हे पाहूयात म्हणजे ही परीक्षा आपल्याला जर द्यायचे असेल तर काय पात्रता लागेल?

जर मंडळी आपण पहिला पेपर देणार असाल तर पहिली ते पाचवीसाठी हा पेपर असणार आहे.
  • यासाठी पहिली पात्रता आहे तुम्ही बारावी 50 टक्के मार्क उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि आणि तुमचं डीएड पास असाल किंवा डीएडच्या सेकंड इयर ला म्हणजे दुसऱ्या वर्षी असाल तर तुम्हाला ऑप्शन मधील पहिला मुद्दा निवडायचा आहे.
  • किंवा तुम्हाला बारावी मध्ये 45 टक्के मार्क असतील आणि तुम्ही तुमच्या डीएड पूर्ण केला असेल किंवा सेकण्ड इयरमध्ये असाल तरी तुम्ही   सीटीईटीदेऊ शकताअशावेळी तुम्ही तेथील दुसरा ऑप्शन निवडला आहे.
  • किंवा तुम्ही तुमचं बारावी येईल पन्नास टक्क्याने पूर्ण केला असाल आणि बीएडच्या चार वर्षाच्या प्रोग्रामला असाल तुम्ही त्यातील तीन नंबरचा ऑप्शन ची पात्रता निवडायचे आहे.
  • किंवा तुमचं स्पेशल  डीएड  असेल आणि बारावी मध्ये 50%    गुणांनी उत्तीर्ण असाल तर तुम्ही त्यातील चौथा ऑप्शन निवडायचा आहे.
  • आणि  जर तुमचं ग्रॅज्युएशन पन्नास टक्क्यांनी पास असाल आणि बीएडला असाल किंवा बी एड पूर्ण असेल तर तुम्ही त्यातील पाच  मुद्दा निवडायचा आहे.
  • आणि जर तुमचं बीएड पूर्ण असेल तर सर्वांनी पहिला पेपर साठी फॉर्म भरावा ज्यावेळी तुमच्या शाळेमध्ये सिलेक्शन होईल त्यावेळी तुम्हाला सहा महिन्याचा ब्रिज कोर्स पूर्ण करावा लागेल  आणि तो ब्रिज कोर्स पूर्ण आपल्याला एक्स्टर्नल करावा लागतो.


तर मंडळी आता पाहूयात आपण दुसरा पेपर म्हणजेच सहावी ते आठवीसाठी लागणारी पात्रता

  • तर मंडळी यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असायला पाहिजे आणि डीएड म्हणजे तुमचा जो दोन वर्षाचा डिप्लोमा प्रोग्रॅम आहे तो पूर्ण असायला पाहिजे.त्यात जरी तुम्ही फायनल इयरला असाल तरीही तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे.
  • तुम्हाला ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के मार्क असतील आणि तुमचा एक वर्षाचा b.ed कोर्स असाल किंवा  सध्या तुमचा कोर्स चालू असेल तरी तुम्ही हा मुद्दा निवडून घ्या, या परीक्षेला बसू शकता.
  • किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशनला 45 टक्के मार्क आहेत आणि बीएडला   पहिल्या वर्षाला असाल तरी तुम्हाला हा मुद्दा निवडून या परीक्षेला बसता येऊ शकतो.
  • वा तुम्हाला बारावी मध्ये पन्नास टक्के मार्क आहेत आणि तुम्ही चार वर्षाचा b.ed चा कोर्स केला असाल किंवा  चालू असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडून पेपरला बसता येऊ शकतात.
  • त्यानंतर जर तुम्हाला बारावी मध्ये 50 टक्के मार्क असतील आणि तुम्ही चार वर्षांचा बीए/बीएससी ed किंवा बीए ऍड    या patratene  तुम्ही ही परीक्षा देऊ शकता.
  • वा तुम्हाला ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के मार्क आहेत आणि तुम्ही बीएडच्या स्पेशल एज्युकेशन ला असाल एक वर्षाच्या तरी तुम्हाला हा पेपर देता येऊ शकतो.
  • यावरील  पैकी  कोणत ही पात्र नसेल परंतु तुमचा बी एड   पूर्ण असेल तुम्हाला या परीक्षेला बसता येऊ शकतं त्यासाठी हा शेवटचा ऑप्शन निवडायचा.




मंडळी आता पाहू आपण c.t.e.t. एक्झाम साठी पहिली ते पाचवी पर्यंत स्ट्रक्चर कसा असणार आहे आणि त्यामध्ये नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे.
तर मंडळी यामध्ये आपल्याला दीडशे मार्कांसाठी प्रश्न असतात दीडशे प्रश्न असतात आणि दीडशे मिनिटे वेळ असते म्हणजे अडीच तास वेळ असतो
मंडळी पेपर 1 मध्ये पाच विषय असतात
  • Paper I (for Classes I to V) Primary Stage; Duration of examination-Two-and-a-half hours Structure and Content (All Compulsory): (Appendix I)

(i) Child Development and Pedagogy 30 MCQs 30 Marks
(ii) Language I (compulsory) 30 MCQs 30 Marks
(iii) Language II (compulsory) 30 MCQs 30 Marks
(iv) Mathematics 30 MCQs 30 Marks
(v) Environmental Studies 30 MCQs 30 Marks
Total 150 MCQs 150 Marks


  • Paper II (for Classes VI to VIII) Elementary Stage : Duration of examination - Two-and-a-half hours Structure and Content (All Compulsory): (Appendix I)
(i) Child Development & Pedagogy(compulsory) 30 MCQs 30 Marks
(ii) Language I (compulsory) 30 MCQs 30 Marks
(iii) Language II (compulsory) 30 MCQs 30 Marks
(iv) Mathematics and Science 60 MCQs 60 Marks (for Mathematics and Science teacher) OR (v) Social Studies/Social Science 60 MCQs 60 Marks (for Social Studies/Social Science teacher) *For any other teacher - either (IV) or (V)

Total 150 MCQs 150 Marks


Application https://ctet.nic.in/

मंडळी या परीक्षेचा निकाल हा सहा आठवड्यानंतर लागतो किंवा सहा आठवड्यामध्ये लागतो एक्झाम घेतल्यापासून.

  ही माहिती आपल्याला कशी वाटली हे सांगायला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका,  आणि आपल्या मित्रांना ही पोस्ट शेअर करा जेणेकरून त्यांना या परीक्षेबद्दल माहिती होईल धन्यवाद.


 या परीक्षेसाठी सर्वोत्तम पुस्तक म्हणजे  अरिहंत प्रकाशन चे पुस्तक आहे,त्या पुस्तकाची लिंक मी येथे देत आहे आपण येथून हे पुस्तक विकत घेऊ शकता. तसेच इतर  पुस्तकांची ही लिंक मी येथे देत आहे जेणेकरून आपल्याला घ्यायला सोपं पडेल.



  • CTET Success Master Paper-I Class 1 to 5 Shikshak Ke Liye 2019


https://ekaro.in/enkr2020012439554095

  • CTET Success Master Samajik Addhyan/Vigyan Shikshak ke liye Paper-II Class 6 to 8 2019

https://ekaro.in/enkr2020012439554151