विचार, अनुभव, भावना व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे 'भाषा' होय.

भाषा ही मुख्यत: दोन प्रकारच्या आहेत.

  • स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा
  • कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा

भाषा व लिपी (Languages ​​and scripts) मराठी व्याकरण (Marathi Vyakran) | Marathi Grammar

  • स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा
मनुष्यप्राण्याची बोलण्याची भाषा किंवा हावभावाची भाषा यांची तुलना नैसर्गिक भाषेमध्ये होते.

‘भाष' या संस्कृत धातूपासून 'भाषा' हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे.

लिहीत असताना जी लिपी आपण वापरत आहे त्या लिपीचा शोध लागल्यामुळेच लेखन शक्य झाले आहे.

एक संवादाचे प्रभावी माध्यम 'भाषा' असून बोलणारा आणि ऐकणारा या दोहोंना जोडणारा दुवा किंवा पूल म्हणजे भाषा होय.
  • मातृभाषा
आपल्या घरात/कुटूंबात बोलली जात असलेली भाषा म्हणजे मातृभाषा होय.

आपली मातृभाषा ही मराठी आहे.
मराठीची भाषेची जननी संस्कृत भाषा आहे.
तर मराठी भाषेमधील पहिला शिलालेख कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथील श्रीगोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो.

शिलालेखातील 'श्री चामुण्डराये करवियले' ही ओळ मराठीमधील पहिले उपलब्ध वाक्य असून हे वाक्य तिथे इसवी सन ९८३ च्या सुमारास कोरले गेले असावे.

  • लीळाचरित्र’ हा आद्यगद्यग्रंथ लिहिणारे म्हाइभट मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होत.
  • 'विवेकसिंधू' हा ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज, 'श्री ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव' अलोकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केली.
  • २७ फेब्रुवारी हा दिवस जेष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असून जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे.

  • लिपी


आपण जी लिपी वापरत आहे, त्या लिपीचे नाव देवनागरी लिपी आहे.
बाळबोध लिपी असेही देवनागरी लिपीला म्हणतात.
  • आपली हि देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे.
  • लिहिणार्‍याच्या डावीकडून उजवीकडे तिचे लेखन होते. एक शब्द लिहिल्यानंतर त्या शब्दावर शिरोरेघा देण्याची पद्धत देवनागरी लिपीमध्ये आहे.

ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविला जातो व कोणत्याची वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, ती आदर्श लिपी आहे.

देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत.
देवनागरी लिपीमध्ये मराठी, संस्कृत, हिंदी भाषांचे लेखन आपण करू शकतो.
  • माधव जुलियन : मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे.
  • सुरेश भट: लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
  • व्याकरणाच्या अभ्यास करण्याचे महत्व
भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित पद्धतीने चालावा म्हणून काही नियम ठरविण्यात आले असून या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात.
भाषेचे व्याकरण म्हणजे भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था होय.
भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय.

व्याकरण हा शब्द वि आ  कृ (= करण) यांपासून बनला आहे. याचा शब्दश: अर्थ स्पष्टीकरण असा आहे.
श्रीपाद भागवत यांनी म्हटले, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय.          

महर्षी पतंजलीं यांनी व्याकरणास 'शब्दानुशासन' असे नाव दिलेले आहे. अनुशासन म्हणजे नियमन, शिस्त.     

आपल्या भाषेतील शब्दातील वर्ण, त्यांचे उच्चार, शब्दसिद्धी, वाक्यरचना, वाक्यातील पदांचे, शब्दांचे परस्परसंबंध इत्यादी बाबतीत नियम घालून देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण.

भाषेचे रचनास्वरूप आदर्श कसे असावेत हे प्रतिपादन करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय.

भाषास्वरुपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण असते. भाषा ही स्थलकालानुरूप बदलत जाते.           

भाषेची घडण समजून घेताना प्रथम लक्षात येते की भाषा वाक्यांनी बनते, वाक्य शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णानी बनतात.

व्याकरणाच्या अभ्यासाचे वर्णविचार, शब्दविचार वाक्यविचार असे घटक आहेत.