नमस्कार आपण महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल (About the history of Maharashtra)जाणून घेणार आहोत ही माहिती आपल्याला टीईटी(TET),एमपीएससी(MPSC) ,यूपीएससी (UPSC) अन्य इतर स्पर्धा परीक्षांसाठी (Competitive Exams) उपयुक्त आहे तर मंडळी सुरुवातीला आपण पाहूयात एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन तर यामध्ये धार्मिक जीवन कसे होते हे पाहत असताना काही मुद्द्यांचा आपण आधार घेऊयात
>>महाराष्ट्रातील धार्मिक जीवन(Religious life in Maharashtra)
>एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील समाज जीवनाला धर्माला फार महत्त्वाचे स्थान होते
>समाजजीवनावर धर्मसंस्थेचा पगडा होता
>हिंदू धर्मात कर्मकांड दानधर्म अनुष्ठाने व्रत-वैकल्ये इत्यादीचे महत्त्व होते
>अंधश्रद्धा रूढी-परंपरांना या काळात जास्त महत्व होते
>धर्मात बेबंदशाही ची निर्मिती झाली
>आणि आळशी पुरोहित वर्ग
>>महाराष्ट्रातील समाज जीवनाचा आता आढावा घेऊया यामध्ये आढावा घेत असताना खालील मुद्द्यांचा अभ्यास करता येतो.
>वर्ण व्यवस्था श्रेष्ठ-कनिष्ठ स्पृश्य-अस्पृश्य जाती व्यवस्था इत्यादी बाबतीत कडक निर्माण होते.
>समाज अनेक जाती व जातींमधील विभागला गेलेला होता
>स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि या काळातील स्त्रियांची स्थिती हलाखीची होती
>सती बालविवाह विधवा विवाह बंदी बहुपत्नीकत्व केशव पण देवदासी या प्रथा या काळात होत्या
तर एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली आणि या इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्व क्षेत्रांमध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू झाल्याचे दिसते.
प्रबोधन
समाजात प्रचलित असलेल्या आचार-विचार आणि व्यवहारात जेव्हा-जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन असे म्हणतात.
तर मंडळी आता पाहूयात आपण महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळ आणि त्याची कारणे (Prabodhan movement in Maharashtra and its causes)
यामध्ये प्रथमता
> पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव
राष्ट्रवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, औद्योगिकीकरण, उदारमतवाद व्यक्ती स्वातंत्र्य व समता या संकल्पनांची महाराष्ट्र तील जनतेला ओळख आणि नव शिक्षित मध्ये जाणीव-जागृती निर्माण
> पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव
इंग्रजांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षण भारतात सुरू केले हे शिक्षण सर्व जाती धर्मांना आणि स्त्रियांना खुले केले,
आपल्या समाजातील रूढी परंपरा चालीरीती खुळचट कल्पना या आपल्या अधोगतीचे कारणे आहेत हे यातून समजले यातून महाराष्ट्रात धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी सुरू झाल्या
> वैज्ञानिक आणि भौतिक सुधारणा
इंग्रजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भौतिक सुधारणा याचा अवलंब केला.
आपल्या मागासलेपणाची जाणीव येथील तरुणांना यामुळे झाली.
> ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य
समाजव्यवस्था व परंपरागत धर्म यातील दोष दाखवण्याचे कार्य.
समाजातील अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यावर कडकडून टीका.
महाराष्ट्रातील धर्मसुधारणा चळवळ व प्रबोधना चालना
>धर्म आणि विचार प्रसाराची साधने
यावेळी मुद्रणकलेचा शोध, भारतीय भाषांमध्ये बायबलचे भाषांतर, छापील ग्रंथ, वृत्तपत्रांमधून जांभेकर लोकहितवादी तरखडकर बंधू त्यांच्या प्रबोधनात्मक लेखन इत्यादी महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळ कार्यरत झाली.
महाराष्ट्रातील समाज सुधारक
मंडळी आता आपण महाराष्ट्रात कोण कोण समाज सुधारण्यासाठी हातभार लावले याची माहिती या सदरात घेणार आहोत.
महाराष्ट्रातील समाजसुधारक (Social reformer in Maharashtra)
> जगन्नाथ शंकर शेठ
(जन्म 1803 | मृत्यू 1865)
तर मंडळी जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव होते. मुरकुटे हे त्यांचे उपनाम होते. लहानपणी वडिलांचा मृत्यू झाला, तर त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी केला.
शैक्षणिक कार्य:
- जगन्नाथ शंकरशेट यांनी विद्या दान खेरीज आमचा उद्धार होणार नाही असे एलफिन्स्टन स्पष्टपणे सांगितले.
- तर 1822 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली भारतात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून स्थापन झालेली ही पहिली संस्था होती. मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या यामध्ये बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांचे फार मोठे सहकार्य लाभले.
- एलफिस्टन च्या स्मारकासाठी जमवलेल्या फंडातून एलफिस्टन कॉलेज सुरू केले.
- सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशन वर नानांची नियुक्ती करण्यात आली याच बोर्डाche 1856 चालली विद्या खात्यात रूपांतरण झाले.
- 1845 साली दादाभाई नवरोजी, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ची स्थापना केली यासाठी नानांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
- तर त्यांनी स्वतःच्या जागेत जगन्नाथ शंकरशेठ मुलींची शाळा काढली.
- ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलोशिप आणि जे जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेमागे नानांचे प्रयत्न होते.
>>सामाजिक कार्य
- 1846 साली मुन्सिपल ॲक्ट संमत होण्यामागे त्यांचे प्रयत्न आहेत.
- अग्री होर्टिकल्चर सोसायटी व जॉग्रफिकल सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
- मुंबई ते ठाणे रेल्वे सुरु होण्यामागे प्रयत्न आहेत.
>>राजकीय कार्य
- 1852 साली दादाभाई नौरोजी यांच्यासह बॉम्बे असोसिएशन ही संस्था मुंबईत स्थापन केली 1835 मध्ये जस्टिस ऑफ पीस या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली
- शंकर शेठ यांच्याबद्दल आचार्य जावडेकर म्हणतात लोकांच्या वतीने सरकारची बोलणारे आणि मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी होत तर आचार्य अत्रे यांनी मुंबईचा आणि अनभिषिक्त सम्राट असे म्हटले.