मागील काही आठवड्यांपासून सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड फ्लिप ( Samsung Galaxy Z Flip ) हा मुख्य चर्चेत राहिलेला आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग कंपनी कडून दुसरा फोल्डेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप हा होणार आहे परंतु हा फोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड या फोन पेक्षा खूप वेगळा असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा येणारा अप कमिंग स्मार्टफोन मोटो राझर सारखा क्लैमशेल डिझाईन मध्ये येणार आहे त्याचा डिस्प्ले आतील बाजूस दुमडता येणार आहे आता लॉन्च च्या अगोदर या स्मार्टफोनला एफसीसी मध्ये पाहिले गेलेला आहे जिथेे स्मार्टफोन बद्दल खूप सारी माहिती समोर आलेली आहे.
लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये हे भरपूर साऱ्या बैंड्स सपोर्ट मिळणार आहे. परंतु यामध्ये फाईव जी सपोर्ट बद्दल काहीही अजूून सांगितलं गेलेलं नाही त्याच्या अगोदर या डिवाइस च्या स्पेसिफिकेशन्सस (samsung galaxy z flip specification)काही लिक झाल्या होत्या ज्यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी झेड क्लिप मध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर सोबत आठ जीबी रॅम आणि 256 जीबी फोन स्टोरेज दिले जाणार असल्याची माहिती समोर आलेली होती तर दुसरीकडे यामध्ये 22 9 अस्पेक्ट रेशियो मिळणार असल्याची सोबत 6.7 इंच फोल्डेबल डिस्प्लेे मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे फोन क्लोज केल्यानंतर येथे नोटिफिकेशन चेक करण्यासाठी आणखी एक छोटा 1.06 इंचाचा सुपर अमोलेड(Super AMOLED) डिस्प्ले सुद्धा मिळणार आहे याच्याशिवाय एक्स्टर्नल डिस्प्ले च्या ठीक बाजूला दोन 12 मेगापिक्सल चे कॅमेरे पण उपलब्ध असतील तर मेन डिस्प्ले मध्ये एका कट आउट मध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल तर याच्याच बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा माउंट असणार आहे याच सोबत या स्मार्टफोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट(USB type C) 15 व्हाट(15W) फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि आणी 9 व्हाट क्यू आय (9W Qi) वायरलेस चार्जिंग चा सपोर्ट सुद्धा मिळणार आहे.
तर मंडळी या स्मार्टफोनच्या किमती (Samsung Galaxy Z Flip Price) बद्दल बोलायचं तर एका जुन्या रिपोर्टच्या दाव्यानुसार याची किंमत अमेरिकी डॉलर मध्ये 860 आणि 1295 च्या मध्ये हे असू शकणार आहे. परंतु या साऱ्या रिपोर्ट ना अजून आपण गंभीरतेने घेऊ शकत नाही. ही वास्तविक याची सर्व माहिती आपल्याला पुढील महिन्यात होणाऱ्या(samsung galaxy z flip release date) गॅलेक्सी अनपैक्ड इवेंटमध्ये समोर येऊ शकतील.
Samsung Galaxy Z Flip | सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप याच सॅमसंगच्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोरhttps://t.co/p9bLbFI6MM
— Jeevan Marathi (@MarathiJeevan) January 31, 2020