जेव्हापासून नोकिया ब्रँड(nokia mobile) ची कमान एच एम डी ग्लोबल (HMD Global) या कंपनीच्या हातात आली आहे, तेव्हापासून कंपनी नोकियाची सगळ्यात मजबूत कमान असलेली फीचर फोनवर सुद्धा लक्ष देत आहे. मंडळी, फीचर्स फोन (Nokia Feature Phone) हे स्मार्टफोनच्या तुलनेत कमी फंक्शन वाले असतात तरीपण KaiOs आल्यापासून यामध्ये काही ही बदल आपल्याला पाहायला मिळतात. हा Os टॉप ऑफ द लाईन फीचर फोन्स मध्ये दिला जात आहे, ज्यामध्ये नोकिया 2720 फ्लीप सुद्धा सामील आहे आता एच एमडी ग्लोबल KaiOs पेक्षा ही पुढे जाऊन यावर्षी अँड्रॉइड बेस्ड फिचर फोन आणायच्या तयारीत आहे.
वाय-फाय अलाईन्स या वेबसाईटवर एका लिस्टिंग मध्ये नोकिया 400 या नावाने एका नवीन फिचर बद्दलची माहिती समोर आलेली आहे. जो GAFP वर चालतो आहे. GAFP हा एक माहित नसलेला टर्म आहे. कारण याबद्दलची अजून कोणती घोषणा करण्यात आली नाही. परंतु हे काही नवीन नाही मागल्या वर्षी नाइन टू फाइव्ह गुगल (9to5google) च्या हवाल्याने अँड्रॉइडवर चालणारा एक नवीन नोकिया फीचर फोन ची इमेज समोर आली होती. यामध्ये पाहण्यात आले होते लक्ष देण्याची बाब अशी आहे. की हा अँड्रॉइड गो पेक्षा वेगळा असणार आहे. स्टॅंडर्ड अँड्रॉइड व्हर्जन पेक्षा इतर GAFP मध्ये फिजिकल बटन च्या मदतीने टचलेस इंटरॅक्शन (Touchless interaction) चा सपोर्ट मिळू शकतो. या इकोसिस्टीम मध्ये युट्युब गुगल असिस्टंट(Google Assistant) आणि गुगल क्रोम (Google Chrome) सुद्धा स्पोट करण्यात आला आहे.
सध्यातरी Nokia 400 4G ला घेऊन कोणती स्पेसिफिकेशन समोर आलेले नाहीत परंतु जर हा पिक्चर फोन लॉन्च होतो तो अँड्रॉइड गो चा डाउनग्रेडेड व्हर्जन दिला जाऊ शकतो परंतु सध्या तरी ही माहिती साफ नाही कि हा फिचर फोन कधी लॉन्च केला जाईल.
तर दुसरीकडे लिकड रिपोर्टनुसार ही माहिती मिळत आहे की एम डब्ल्यू सी(MWC- Mobile World Congress) बार्सिलोना मध्ये एच एम डी ग्लोबल इव्हेंट मध्ये नोकिया 8.2 5g नोकिया 5.2 नोकिया 1.3 आणि एक ओरिजनल सिरीज ला लॉन्च केलं जाऊ शकतं, सोबतच या वेळेत आणखी काही फोनचे लॉन्चिंग सुद्धा होऊ शकत.