मंडळी नमस्कार आज आपण पाहणार आहोत टीईटी परीक्षा 2020 मध्ये झालेली परीक्षे तील मराठी विषयाचे प्रश्न
आपण जर टीईटी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर मागील झालेले प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होतो काही प्रश्न रिपीट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जास्तीत जास्त मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा दुसरा फायदा असा की आपल्याला परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे याचा आढावा घेता येतो चला तर मंडळी आपण सुरूवात करूया प्रश्नपत्रिके ला.
ही प्रश्नपत्रिका 2020 मधील सीईटी परीक्षेतील बी या कोडचे आहे.
31.
‘पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही अधोरेखित सर्व नामाचा प्रकार ओळखा
1. अनिश्चित✔
2. संबंधी
3. दर्शक
4. प्रश्नार्थक
32.
पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? ( मूळ प्रश्नपत्रिकेत वाक्य दिले नव्हते)
1. नाम साधित
2. धातुसाधित
3. अव्यय साधित
4. सार्वनामिक
33.
‘गडकरी’ हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्यातील काळ ओळखा.
1. पूर्ण भविष्यकाळ
2. साधा भविष्यकाळ
3. अपूर्ण भविष्यकाळ✔
4. रीती भविष्यकाळ
34.
वाक्यात नसलेले विराम चिन्ह कोणते?
मिनू सांगू लागली,” आजोबा, वेबसाईट म्हणजे
‘ संकेतस्थळ.’ कळलं का आता?”
1. स्वल्पविराम
2. प्रश्नचिन्ह
3. संयोग चिन्ह✔
4. पूर्णविराम
35.
पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता?
1. गुलामगिरी
2. कलाकार
3. प्रतिसाद✔
4. मानवता
36.
कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता?
1. अंबुज
2. अग्रज✔
3. नीरज
4. पंकज
37. ते40 खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा.
अनंता, एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे
उडाया पाखरांसाठी ,जरा आभाळ ठेवावे||
फुलांचा भार न व्हावा, कधी कोणत्या देठा
चालत्या पावलांसाठी, असुदे मोकळ्या वाटा||
चालता तिमिर वाटेने, सोबती चांदणे यावे
घनांचे घाव होताना, फुलांनी सांत्वना द्यावे||
अनंता येवढे द्यावे, चे अंग मी व्हावे
शेवटी श्वास जाताना, फुलांचे रंग मी व्हावे||
37. कवी कोणाकडे मागणे मागत आहे?
1. आकाश
2. मुलगा
3. माणूस
4. परमेश्वर✔
38. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही?
1. सुमन
2. वसुंधरा
3. nabh
4. कमुदी✔
39.कवी कोणते मागणे मागत नाही?
1. फुलांचे रंग कायम राहावे.
2. फुलांचा भार देठांना सोसावा. ✔
3. अंधाऱ्या वाटेनेच चांदणे सोबत असावे.
4. पाखरांसाठी आभाळ मिळावे.
40.कवीची शेवटची इच्छा कोणती आहे.
1. पक्षी होऊन नभी उडावे
2. घणाचे घाव सोसावे
3. फुलांचे रंग व्हावे✔
4. फुलांचे सांत्वन करावे
41 ते44 खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा.
कसब, गुण आणि कर्तव्ये याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्या बद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते, तसेच त्यांचे मन ही होते त्यामुळेच समाजातील गुणी कर्तुत्वान लोकांना महाराजांचा आधार वाटत होता तसेच, लहान खेड्यातील लहानश्या माणसालाही आधार होता सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्या यांना पिडीतांना जो अपील कोर्टात सारखा वाटावा आणि कर्तुत्ववान ना त्याचा आधार वाटावा. शाहू महाराज कसे होते आणि म्हणूनच ते एक केंद्रबिंदू बनले होते. चंबु काकडे लोखंडाचे कण धाव घेतात, त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. राजश्री शाहू महाराज केवळ वारसाहक्काने नव्हे तर ते लोकांचे राजे होते.
41. उतारानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1. शाहू महाराज हे मनाने संकुचित होते ✔
2. दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे.
3. शाहू महाराज हे लोकांचे राजे होते
4. शाहू महाराज हे एक केंद्रबिंदू बनले होते
42. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उताऱ्यात आलेला नाही?
1. कौशल्य
2. दया
3. आश्चर्य✔
4. तनु
43. शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती?
1. कसब
2. वारसा✔
3. गुण
4. कर्तव्य
44. शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे?
a. राज्यकर्त्यांना
b. कर्तुत्ववान लोकांना
c. पीडितांना
1.a,b आणि c
2. फक्त a व b
3. फक्त c
4. फक्त b व c ✔
45. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती?
1. आजी* आजोबा
2. कोवळे* लहान
3 शिखर* माथा
4 नवे* जुने ✔
46.’ पूजा उद्या येणार आहे ना?’ वाक्याचा प्रकार कोणता?
1 विधानार्थी
2 नकारार्थी
3 प्रश्नार्थी✔
4 उद्गारार्थी
47. पुढीलपैकी वचनांचे योग्य जोडी कोणती?
1 दगड- दगडे
2 कागद- कागदे
3 पुस्तक- पुस्तके✔
4 कपडा- कपडी
48. वाक्यातील क्रियापदांचा प्रकार ओळखा.
कुत्रा भुंकू लागतात मुले पळू लागली
कुत्रा भुंकू लागतात मुले पळू लागली
1 शक्य
2 संयुक्त✔
3 प्रयोजक
4 सकर्मक
49. चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास ‘ वारा’ या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल?
1 दुसऱ्या आणि नवव्या
2 सहाव्या आणि नव्या
3 चौथ्या आणि नवव्या
4 पाचव्या आणि 9व्या✔
50. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल?
1 अभिनंदन पत्र
2 सूचना पत्र
3 तक्रार पत्र
4 निमंत्रण पत्र✔
51.’ श्रद्धांजली’ मधील एकूण वर्ण किती?
1 7
2 10
3 11✔
4 8
52 पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
1 शुक सरिता ✔
2 बोका- भाटी
3 मोर- लांडोर
4 कोल्हा- कोलीन
53 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी _______ओळख नाही.
1 मिसाईल मॅन
2 शास्त्रज्ञ
3 गायक✔
4 माजी राष्ट्रपती
54 पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात
1 3 जानेवारी ✔
2 14 नोव्हेंबर
3 11 नोव्हेंबर
4 30 जानेवारी
55’ गीताई’ या ग्रंथाचे लेखक कोण?
1 संत ज्ञानेश्वर
2 विनोबा भावे
3 लोकमान्य टिळक
4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ✔
56. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा
1 हळुहळू✔
2आखणी
3 प्रतिध्वनी
4 मुलाखन
57 पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा.
1 हय
2 तुरग
3 वारू
4 गज✔
58 घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा
1 पिल खाना
2 पागा ✔
3 गोठा
4 आराम गृह
59 पुढीलपैकी योग्य वाक्यप्रचार पर्याय कोणता?
1 हात टेकणे✔
2 कान फुटणे
3 डोळे येणे
4 नाक गळणे
60. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? (अधोरेखित shabd dilela nahi)
घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली.
1 शब्द योगी अव्यय
2 क्रियाविशेषण अव्यय
3 उभयान्वयी अव्यय
4 केवलप्रयोगी अव्यय