जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

TET, CTET, TAIT FAQ | पहिली ते बारावी पर्यंत शिकवण्यासाठी कोणकोणत्या एक्झाम पास असाव्यात.

हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो बरेच तुमचे प्रश्न आहेत टीईटी आणि सीटीईटी रिलेटेड आणि अभियोग्यता चाचणी संदर्भात
मी  सीटीईटी पास आहे तर मी अभियोग्यता देऊ शकेल का?



तर मंडळी यामध्ये आपले काही प्रश्न असे आहेत की
मी महा टीईटी पास आहे पण सीटीईटी नापास आहे.
मी CTETपास आहे पण महाटीईटी नापास आहे .
तर मंडळी या विषयी आपण सर्व माहिती या सदरात घेणार आहोत.

तर हि परीक्षा जर आपण पास नापास असू, तर आपल्याला अभियोग्यता चाचणी देता येईल की नाही. अभियोग्यता चाचणी कोणते  इयत्ता पर्यंत लागते याबद्दलची ही माहिती यामध्ये घेऊया.

तर मंडळी, आता आपण टीईटी म्हणजेच महाटीईटी आणि  सीटीईटी  मधील फरक बघूया,
मंडळी ही माहिती आपल्याला माहीत असेल परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच शिक्षकांना तसेच या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ही माहिती माहीत नसते त्यामुळे त्यांच्या संभ्रमावस्था असते म्हणूनच मी हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे कृपया आपल्या डीएड, बीएड झालेल्या आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रियजन मित्र कुटुंब मधील  सदस्यांना ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.
तर मंडळी, यातील जी टीईटी आहे ती राज्यशासनाकडून म्हणजे राज्य स्तरावरून ही परीक्षा घेतली जाते. आणि जी सीटीईटी  आहे केंद्र स्तरावरून घेतली जाते. तर मंडळी आपण जर टीईटी  पास असाल तर जी राज्यांमध्ये भरती होते त्यामध्ये आपल्याला आपला अर्ज दाखल करता येऊ शकतो.
पण, जर तुम्ही सीटीईटी  असाल तर तुम्हाला केंद्रस्तरावर जि भरती निघते शिक्षक भरती त्यासाठीही तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो आणि राज्य स्तरावर सुद्धा जी भरती निघते तिथे सुद्धा तुम्ही सीटीईटी द्वारे अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही जर सीटीईटी   पास  असाल तर तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर हाच फरक आहे महा टीईटी आणि सीटीईटी  यामध्ये.
तर मंडळी आता दुसरा प्रश्न आता येतो की काही जण भरपूर वेळा असे विचारतात मी आता टीईटी पास आहे तर मला अभियोग्यता चाचणी देता येऊ शकते का ?आणि पुढे असे विचारतात की मी एकच पेपर त्यातील पास आहे. तर मंडळी तुम्ही नक्की अभियोग्यता चाचणी देऊ शकता यामध्ये तुम्ही टीईटी म्हणजेच महाटीईटी आणि सीटीईटी  त्यामधील कोणताही एक पेपर  पास असाल तर तुम्ही अभियोग्यता देऊ शकाल म्हणजे तुम्ही पेपर-2 किंवा पेपर1 यापैकी कोणताही एक पेपर पास असावा. म्हणजे तुम्ही ज्या वर्गासाठी आपलाय करणार आहात त्या वर्गाची टीईटी पेपर  पास असावा.  

तर मंडळी आता बघू आपण पहिली ते बारावी पर्यंत शिकवण्यासाठी कोणकोणत्या एक्झाम पास असाव्यात.

तर यामध्ये प्रथमता आपण थोडं अभियोग्यता चाचणी बद्दल माहिती घेऊया.
तर मंडळी आता 2020 मध्ये शेवटची एक्झाम अभियोग्यताची ती म्हणजे 2017  यावर्षी झालेली त्यानंतर अजून अभियोग्यता चाचणी परीक्षा म्हणजेच  टीएआयटी (Tait)ची परीक्षा झालेली नाही.
तर मंडळी हे अभियोग्यता चाचणी एका उमेदवारास केवळ पाच वेळा देता येते. तर मंडळी तुम्ही शेवटचे म्हणजे 2017चे ही अभियोग्यता चाचणी दिली असाल आणि त्यामध्ये सक्सेस झाला नसेल तर तुम्हाला अजून चार संधी उपलब्ध आहेत. तर मंडळी पहिली ते आठवी इत्यादी वर्गांना शिकवत असताना अभियोग्यता चाचणी आवश्यक आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढे घेऊ या.
तर मंडळी यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर नववी ते बारावी या वर्गांवर शिकवणारा असाल तर तुम्हाला टी आयटी म्हणजेच अभि योग्यता चाचणी द्यायची गरज नाही. तर यामध्ये तुम्ही बीएड असाल आणि पदवीत्तर पदवी जर तुमच्याकडे असेल म्हणजेच तुम्ही पोस्टग्रज्युएट असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला अभियोग्यता चाचणी देण्याची गरज नाही. तर मंडळी आपल्यापैकी खूप उमेदवारांना किंवा शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही माहिती माहीत नाहीये.

तर मंडळी आता आपण पाहूया कोणत्या वर्गासाठी किती शिक्षण हवं.

तर यामध्ये जर आपल्याला पहिली ते पाचवी या वर्गांच्या साठी शिकवायचे असेल त्या भरतीसाठी अप्लाय करायचे असेल.
तर मंडळी तुम्हाला यासाठी डीएड पास असावं लागणार आहे सोबतच बारावी पूर्ण असावे लागणार आहे तर यामध्ये जनरल कॅटेगरी असणाऱ्यांना म्हणजेच ओपन कॅटेगरी असणाऱ्यांना 45% ने तर रिझर्व कॅटेगिरी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना 40%  इतक्या गुणांनी आपण उत्तीर्ण असायला हवं. आणि आपल्याला टीईटी म्हणजेच महाटीईटी किंवा सीटीईटी  मधील जो पेपर पहिला आहे तो आपण पास  असावं लागेल. आणि अभियोग्यता चाचणी मध्ये तुम्ही जर मेरिटमध्ये आलात तर तुम्हाला पहिली ते पाचवी  पर्यंत शिकवण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो.
आता पाहूयात आपण सहावी ते आठवी शिक्षक भरतीसाठी काय पात्रता पाहिजे.
तर मंडळी यासाठी आपल्याला पेपर2 हा टीईटी किंवा सीटीईटी  चा उत्तीर्ण असायला हवं. आणि तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवि कम्प्लिट असलं पाहिजे आणि तुम्ही डीएड  किंवा  बीएड या दोन्ही पैकी  एक उत्तीर्ण असायला हवा.
म्हणजे तुम्ही डीएड असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट हवच आणि बीएड तर आपल्याला ग्रॅज्युएशन नंतरच करता येतं त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. आणि पुढे तुम्ही अभियोग्यता चाचणी मध्ये मेरिटमध्ये  यायला हव तर मंडळी लक्ष देण्याची बाब अशी की पहिली ते आठवी या इयत्तेसाठी शिकवायचे असेल तर तुम्हाला अभियोग्यता चाचणी पास हवं तर तुम्ही अपॉइंटमेंट होणार आहात  आणि अपॉइंटमेंट होण्यासाठी तुम्हाला मेरिटमध्ये यावे लागेल आणि ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 45 टक्के आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला चाळीस टक्के इतक्या मार्गांनी उत्तीर्ण हवं.तर मंडळी इतकी रिक्वायरमेंट आपल्याला सहावी ते आठवी शिकवण्यासाठी आहे.
तर मंडळी आता पाहूयात आपण नववी ते दहावी शिक्षक भरतीसाठी
तर मंडळी या वर्गांसाठी आपल्याला अभियोग्यता चाचणी पास होण्याची बिलकूल गरज नाही येथे तुम्ही जर अभियोग्यता चाचणी  पास नसाल तर ही तुम्ही शिक्षक होऊ शकता. तर यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवं आणि बीएड किंवा बीपीएड उत्तीर्ण असायला हव. या तुम्हाला जर ओपन कॅटेगरी मधून असाल तर 50 टक्क्यांनी उत्तीर्ण असायला हवं आणि रिझर्व कॅटेगरी मधून आसाल तर 45 टक्क्यांनी उत्तीर्ण असायला हव.  ही रिक्वायरमेंट आपल्याला ग्रॅज्युएशन साठी आहे .
आता मंडळी आपण पाहूयात अकरावी ते बारावी ह्या वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी काय पत्रता आवश्यक आहे.
तर मंडळी यासाठी सुद्धा तुम्हाला अभियोग्यता चाचणी ची काहीही गरज नाही परंतु पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण असायला हवं सोबतच तुम्ही b.ed किंवा बीपीएड हा कोर्स पूर्ण केलेला असावा. आणि तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर 50 टक्क्यांनी आणि रिझर्व कॅटेगरी मधून असाल तर 45 टक्क्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण असायला हवे.तर मंडळी आपण अशाप्रकारे पहिली ते बारावी पर्यंत कोणकोणती शिक्षण पात्रता आपल्याकडे असायला हवी शिक्षक होण्यासाठी हे आपण ह्या उताऱ्यात पाहिलेला आहे हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आपल्या काही शंका असतील तर नक्की विचारा.पुन्हा भेटूया एका नवीन अशाच पोस्ट मध्ये आमच्या आणखी काही पोस्ट वाचण्यासाठी खाली त्याच्या लिंक दिलेली आहेत नक्की पहा आणि हि पोस्ट आपल्या शिक्षक मित्रां पर्यंत पोचवायला विसरू नका. धन्यवाद .

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या