नमस्कार मंडळी,जीवन मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी आपल्या आजपर्यंत एलआयसीच्या अनेक पॉलिसी असतीलच तर एक फेब्रुवारीपासून नव्या पोलिसिज म्हणजे प्लॅन सुधारित रित्या येणार आहेत. तर मंडळी आज आपण यामध्ये जीवन आनंद पॉलिसी बद्दल ची माहिती घेऊया या मध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत हे आपण पाहूयात.



यामध्ये प्रथमता जीवन आनंद हा जो प्लान होता त्याचा पूर्वी अंक होता तो 815 होता ज्याला आपण टेबल नंबर या नावाने सुद्धा ओळखतो तर तो टेबल नंबर आता 915 या नावाने ओळखला जाईल. तर मंडळी प्रथमत आपण चेंज च्या बद्दल बोलायचं तर तरी यामध्ये रिव्हायवल टाइम पिरियडबद्दल चेंज झालेला आहे. यापूर्वी जो जीवन आनंद प्लॅन होता त्याचा रिव्हायवल पीरियड होता तो दोन वर्ष होता परंतु 1 फेब्रुवारी पासून होणाऱ्या चेंजेस मध्ये हा टाईम आपल्याला पाच वर्ष करून देण्यात आलेला आहे म्हणजे आपली पॉलिसी जर हप्ता भरायचा थांबला असेल तर आपल्याला आता पाच वर्षांमध्ये त्याच्या दंडासह हप्ता भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे. हा आहे आपल्याला आपल्या दृष्टीने चांगला असलेला म्हणजे उमेदवारांच्या आणि एलआयसीच्या सुद्धा दृष्टीने चांगला असलेला बदल. तर मंडळी आता आपण दुसऱ्या चेंज बद्दल बोलायचं तर यामध्ये दुसरा चेंज असा आहे की यामध्ये आपल्याला सरेंडर व्हॅल्यू टाईम पिरियड जो होता त्यामध्ये पूर्वी या चेंजेस व्हायच्या अगोदर आपल्याला तीन वर्षानंतर आपली पॉलिसी सरेंडर करता येत होती ज्याला आपण पॉलिसी मोडणे असे संबोधतो तर मंडळी आता चेंज नंतर म्हणजेच एक फेब्रुवारी नंतर आपल्याला हा पिरियड केवळ दोन वर्षात करण्यात आलेला आहे म्हणजे आपल्या जर पॉलिसी काढून दोन वर्ष झाले असतील आणि ती पॉलिसी आपल्याला कायमचे थांबवायचे आहे अशा वेळेस आपल्याला सरेंडर करण्यासाठी आता केवळ दोन वर्षातच करता येऊ शकतं पूर्वी यासाठी तीन वर्षे लागत होते. यामध्ये जर आपण दोन वर्षात आपली पॉलिसी जर सरेंडर केली तर आपल्याला आपण पॉलिसी भरलेल्या रकमेच्या 30 टक्के रक्कम मिळू शकते. तर मंडळी यानंतर विषय येतो तो म्हणजे कर्जाबद्दल चा तर मंडळी या एक फेब्रुवारी चेंजेसच्या व्हायच्या अगोदर आपल्याला लोन घेण्यासाठी पॉलिसी काढल्यानंतर तीन वर्ष थांबावे लागत होते किंवा तीन वर्षानंतर आपल्याला हे लोन मिळत असते परंतु आता एक फेब्रुवारी नंतर होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला कर्ज दोन वर्षातच मिळू शकते तर मंडळी यामध्ये आपल्या पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू होईल त्याच्या 90 टक्के लोन आपल्याला एलआयसीच्या या पॉलिसीज वर मिळू शकेल. यानंतर या पॉलिसीमध्ये आणि काही बेनिफिट ॲड करण्यात आलेले आहेत. तर मंडळी या जीवन आनंद प्लॅनमध्ये जो 915 या टेबल क्रमांकाने येतो यामध्ये आपल्याला एक्सीडेंट बेनिफिट राइडर देण्यात आलेला आहे. तर मंडळी आपल्या पैकी कोणताही विमेदार इच्छुक असेल एक्सिडेंटल बेनिफिट रायडर घेण्यासाठी तर त्यालाही बेनिफिट घेता येऊ शकत तर मंडळी हा रायडर घेण्यासाठी जो प्रीमियम मध्ये एक्स्ट्रा काही प्रीमियम द्यावा लागणार आहे तो आपल्याला प्रीमियम मध्ये ऍड होऊन येणार आहे (याची रक्कम खूप काही नसते अगदी नाममात्र स्वरूपात ही रक्कम असते) तर मंडळी या जीवन आनंद प्लान मध्ये आणखी एक ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे तो म्हणजे सेटलमेंट ऑप्शन म्हणजे काय तर मंडळी आपण ज्यावेळी आपली पॉलिसी मॅच्युरिटी होते किंवा ज्या पॉलिसीचा मृत्यू क्लेम होतो ती येणारी रक्कम आपण इंस्टॉलमेंट मध्ये घेऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला जर एक लाख रुपये येणार असतील तर आपण त्याला पाच वर्षात दहा वर्षात पंधरा वर्षात अशा इंस्टॉलमेंट मध्ये घेऊ शकta ( यामुळे आपल्याला एक पेन्शनचे रूप रक्कम आल्यासारखे वाटते) तर मंडळी या सेटलमेंट ऑप्शनमध्ये आपल्याच दोन ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत एक मॅच्युरिटी नंतर तर दुसरा येतो बेनिफिट इंस्टॉलमेंट. तर मंडळी हा नंतर आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे SUM ASSURED ON DEATHतर मंडळी यामध्ये पूर्वी जे एक फेब्रुवारी यापूर्वी म्हणजेच बदल व्हायच्या अगोदर आपल्याला on death वर जो दिला जायचा तो बेसिक sum assured च्या 125 टक्केकिंवा आपल्या प्रीमियमच्या वार्षिक प्रीमियमच्या 10 पट होणारी रक्कम दिल्ली जायचे. परंतु यामध्ये एक फेब्रुवारी नंतर होणाऱ्या चेंजेस मध्ये आता एकशे पंचवीस टक्के sum assured किंवा सात पट वार्षिक प्रीमियमच्या यापैकी जास्त कुठली आहे ती रक्कम आपल्याला दिली जाईल. तर मंडळी ह्या मध्ये हा एक चेंज झालेला आहे जो पूर्वी आपल्याला दहापट देत असत ते आता सातपट दिले जाईल हा एक महत्त्वाचा बदलSum assured on death मध्ये करण्यात आलेला आहे.  

 तर मंडळी यामध्ये आणखी एक बदल आलेला आहे तो म्हणजे ग्रेस पीरियडचा तर मंडळी यामध्ये पूर्वी म्हणजे एक फेब्रुवारीला बदल व्हायच्या अगोदर आपल्या प्रीमियमच्या जो ग्रेस पिरियड असायचा म्हणजेच हप्ता भरण्याचा जो वेळ असायचा तो एक कॅलेंडर महिना दिलेला असायचापण ते तीस दिवसांपेक्षा कमी नसत. म्हणजेच एखाद्याचा महिना फेब्रुवारी महिन्यात असेल तरी त्याला एक महिना म्हणून तीस दिवस दिले जात असत. परंतु नव्या होणाऱ्या चेंजेस मध्ये एक फेब्रुवारीपासून आपल्याला केवळ तीस दिवसात प्रत्येक पॉलिसीला ग्रेस पिरीयड देण्यात येणार आहे. पण यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा महिन्याचा हप्ता आहे म्हणजे महिन्याला जे हप्ता भरतात त्यांना मात्र केवळ पंधरा दिवसच ग्रेस पिरीयड देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर आपला मासिक हप्ता असेल तर आपण सजग राहा आणि हप्ता लवकरात लवकर भरून टाका जेणेकरून नंतर दंड बसणार नाही. तर मंडळी जर आपल्याकडे असणारी पॉलिसी वार्षिक अर्धवार्षिक म्हणजे सहामाही किंवा किंवा तिमाही असेल तर आपल्याला 30 दिवसाचा ग्रेस पिरीयड हप्ता भरण्यासाठी मिळणार आहे. तर मंडळी यामध्ये जास्त काही बदल करण्यात आलेले नाहीत परंतु आपण एक लक्षात ठेवायचं आपला जर हप्ता मासिक असेल तर आपण 15 दिवसाच्या आत तो हप्ता भरून काढायचा आहे. तर मंडळी या नंतर आपण बोलूया गॅरेंटेड सरेंडर व्हॅल्यू फॅक्टर बद्दल तर मंडळी यामध्ये आपण दोन वर्षानंतर सलेंडर करू शकणार आहात आणि लोन सुद्धा दोन वर्षानंतर घेऊ शकणार आहात तर मंडळी याच्यासोबत असणाऱ्या फॅक्टर्स बद्दल सुद्धा बद्दल होणार आहेत त्यामुळे याबद्दल आपल्या सल्लागार कडे चौकशी करू शकता. तर मंडळी ही झाली एक फेब्रुवारीपासून होणाऱ्या जीवन आनंद पॉलिसी मध्ये बदल. अशाच आणखी माहितीसाठी आमच्या या ब्लॉग ला फॉलो करू शकता सोबतच आमचे एक यूट्यूब चैनल याच नावाने आहे जीवन मराठी डॉट इन तर आपण तेथेसुद्धा सबस्क्राईब करू शकता सोबतच आपण हा पोस्ट फेसबुक पेजवरून पाहत असाल तर फेसबुक पेज ला सुद्धा लाईक करा आणि हॅलो वर वाचत असाल तर तेथे सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करून याच्याबद्दल माहिती द्या. सोबतच यामध्ये माहिती काही जर चुकीचे असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका सोबतच सांगायला सुद्धा विसरू नका आणि आपल्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारण्यासाठी कमेंट शिक्षण सेक्शन आहे.

Subject solved ; LIC New Guidelines: Life insurance policy guidelines,
Life insurance policy rules to change from today. Check important details,
LIC polices new Changes In marathi, Jeevan Anand New policy table no 915.