जागतिक पुस्तक दिन

जगप्रसिद्ध लेखक शेक्सपिअर यांचा जन्मदिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. शेक्सपिअर यांचा जन्म (23 एप्रिल 1564 ) व योगायोगाने मृत्यूदिनही तीच तारीख (23 एप्रिल 1616). जन्मगाव व मृत्यूगावही एकच. जन्म मृत्यूची तारीख व जन्म मृत्यूचं गाव एकच असा योग शेक्सपिअरच्या बाबतीत घडून आला. 

जागतिक पुस्तक दिन माहिती,

जागतिक पुस्तक दिन कधी असतो,

जागतिक पुस्तक दिन शुभेच्छा,

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

जागतिक पुस्तक दिन फोटो,

जागतिक पुस्तक दिन विशेष,

जागतिक पुस्तक दिनाच्या,
जागतिक पुस्तक दिन

शेक्सपिअरच्या शरीरधर्माला भूतलावर अवघं पन्नाशीचं आयुष्यमान लाभलं पण लेखनानं निर्माण केलेलं कीर्तीमान अमर ठरलं आहे.
लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती (प्रसिद्धी) व सर्वोच्च श्रीमंती (आर्थिक सुबत्ता) लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस. 38 नाटकं व 154 कविता ही त्यांची लेखन संपदा. 38 नाटकांपैकी 10 नाटके ऐतिहासिक ,16 नाटके सुखात्मक व 12 नाटकं शोकात्मक. 
*शेक्सपिअरच्या साहित्य संपदेचं वैशिष्ट्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत* अनेक भाषेत चित्रपट व नाटके रंगभूमीवर सादर झालेली आहेत. रोमिओ आणि ज्यूलिएट ही तर अजरामर प्रेमकहानी.आजही प्रेमाचं वारं पिऊन भरार भरारी स्वप्न रंगवणा-या तरुण तरूणीला लोकं रोमिओ-ज्यूलिएट असं म्हणतात. कोवळ्या वयात रंगवलेले प्रेमाचे कथानक व दुर्दैवी अंत हे या नाटकाचे सूत्र लोकांना इतकं भावलं की चारशे वर्षानंतरही तीच भावना जगाच्या पाठीवर मानवी भेदाच्या सर्व पाय-या ओलांडून मनामनात कायम आहे. अन् त्याचं अमरत्व इतकं अबाधित आहे की, सृष्टीवर मानवी अंश असेपर्यंत प्रेमातला संघर्ष व त्यातली ओढ रोमिओ-ज्यूलिएटनेच अधोरेखित होणार आहे. हॕम्लेट, किंग लिअर, मॕक्बेथ, अॉथेल्लो ही नाटकेही अशीच मानवी जीवनातील कटकारस्थाने, घातपात, विश्वासघात व प्रेम, सत्य अशा मूल्यांतील पराकोटीचा संघर्ष पेरणारी. जगावं की मरावं? That is the question. हा प्रश्न सातासमुद्रापल्याडच्या सर्वच रंगभूमीवर शेक्सपिअरने नेला. याला म्हणतात प्रतिभेचं अमरत्व.
वाचनाशी माणसाची मैत्री असावी. मोठ्या रस्त्याने दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थास जशी सावली देतात व सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात तसं मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात. सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानांतूनच जातो. आपल्या मराठी भाषेतही विपूल साहित्यसंपदा उपलब्ध आहे.
वि.स.खांडेकर, वि. वा. शिरवाडकरपासून आज पर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंत... रविन्द्रनाथ टागोरापासून गुलजारसाहेबांपर्यंत..
कन्नड भाषेतही दिग्गज लेखक आहेत. शिवराम कारंथासारख्या लेखकाची पुस्तके अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत...
*लिहणारे लिहीत जावे...*
*वाचणा-याने वाचत जावे*
*कधीतरी वाचणा-याने लिहणा-याचे शब्द घ्यावे*
इतकं सुंदर👌🏻 आहे हे वाचणं.
वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात.
माझ्याकडे इतकी संपत्ती, इतका जमीनजुमला आहे. असले फुकाचे अंहकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
वाचनाने विचार आणि वाचा यात प्रगल्भता येते.
*म्हणून वाचाल तर वाचाल*
*समृद्धीपणे जगाल*
आज आपल्याला कोरोनासारख्या रोगाने दाखवून दिलय. माणसाच्या बेसिक गरजा अत्यंत थोड्या असतात...
आतातरी आपण विचारांनी समृद्ध होऊ या.
आपणा सर्वांना जागतिक पुस्तकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

सोर्स : व्हाट्सऍप वरून