जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

मराठी व्याकरण : समास व समासांचे प्रकार

समास म्हणजे काय?

काटकसर हा मानवी लक्षणांपैकी एक आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात खूप काटकसर करतो आहोत.तसेच बोलतानाही आम्ही हा गुण वापरतो. बर्‍याचदा आपण संपूर्ण वाक्य न बोलता शब्द वाचवून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.

 •  दोन शब्द एकत्र करण्याच्या पद्धतीला समास म्हणतात.


 • दोन शब्द एकत्र करून बनविलेले जोडशब्द  याला सामासिक शब्द म्हणतात


सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात


 •  तक्ता नीट पाहा:

  दोन शब्द सामासिक शब्द

  विग्रह
  पाप पुण्य पापपुण्य पाप किंवा पुण्य
  मीठ भाकरमीठभाकरमीठ, भाकर व इतर पदार्थ
  यथा शक्ती यथाशक्ती शक्तीप्रमाणे
  भीम अर्जुन भीमार्जुनभीम आणि अर्जुन
  नीळ कंठनीळकंठनिळा आहे कंठ ज्याचा असा तो
  न आस्तिकनास्तिक आस्तिक नसलेला

  सामासिक शब्दात दोन शब्द असतात, त्याना पदे म्हणतात
  पहिल्या शब्दाला पहिले पद म्हणतात
  दुसर्‍या शब्दाला दुसरे पद म्हणतात
  समासामध्ये,
   कधी पहिले पद महत्त्वाचे असते.
   कधी दुसरे पद महत्त्वाचे असते.
  कधी दोन्ही पदे महत्त्वाची असतात.
  कधी दोन्ही पदे महत्त्वाची नसतात.
  म्हणून, पदांनुसार समासाचे प्रमुख चार प्रकार होतात.
   [ महत्त्वाचे > प्रधान, कमी महत्त्वाचे > गौण ]
   (१) पहिले पद प्रधान -> अव्ययीभाव समास.
   (२) दुसरे पद प्रधान -> तत्पुरुष समास.
   (३) दोन्ही पदे प्रधान -> दवंदूव समास. (व्दंव्द समास)
  • (४) दोन्ही पदे गौण -> बहुव्रीही समास.

सामासिक शब्द

विग्रह समास
पापपुण्य पाप किंवा पुण्य द्वंद्व
मीठभाकरमीठ, भाकर व इतर पदार्थद्वंद्व
यथाशक्ती शक्तीप्रमाणेअव्ययीभाव
भीमार्जुनभीम आणि अर्जुनद्वंद्व
नीळकंठनिळा आहे कंठ ज्याचा असा तोबहुव्रीही
नास्तिक आस्तिक नसलेलातत्पुरुष


“नास्तिक' या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे, म्हणून तो तत्पुरुष समास आहे. परंतु पहिले पद 'न' हे नकारयुक्‍त असल्यामुळे त्याला नत्र तत्पुरुष (तत्पुरुषाचा एक पोटप्रकार) म्हणतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या