मंडळी नमस्कार सध्या लॉक डाऊन असल्यामुळे आपण सर्वजण तर घरीच आहोत त्यामुळे रोज काहीतरी नवीन नवीन पदार्थ तयार करणे हे चालूच आहे तर मंडळी आज आपण शुक्रिया नवीन एक पदार्थ तो म्हणजे बोंबलाचा झुणका
लागणारे साहित्य:
मोठे सुके बोंबील, कांदे बारीक कापून, चिंचेचा कोळ, हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, अर्धी वाटी तेल, कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
करावी लागणारी कृती:
▪️ सगळ्यात प्रथम बोंबील कोमट पाण्यात 15 मिनिटे ठेऊन टाका.
▪️ त्यानंतर त्यामधले मधला काटा काढून टाका.
▪️ त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा व मिरची परतवून घ्या.
▪️ त्यानंतर हळद आणि लाल तिखट व मीठ टाकून चांगले एकत्र करून घ्या.
▪️ व त्यानंतर त्यामध्ये बोंबील टाकुन चिंचेचा कोळ व कोथिंबीर टाकून चांगले परतवून वाफ आणा.
अशा पद्धतीने आपल्याला बोंबलाचा झुणका करता येऊ शकतो तर मंडळी ही रेसिपी आपल्या प्रियजनांना सोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी साठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद