राज्यपाल भगतसिंग कोशियरी यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनात गेले होते. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात 20 मिनिटांची चर्चा झाली. या भेटीमध्ये सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव अजोय मेहता आणि खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. राज्यामधील विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात चर्चा झाली.

CM Uddhav Thackeray meets Governor at Raj Bhavan
 मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली, राजभवनावर चर्चा

काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या नऊ जागांसाठी लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात येण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदातील 9 जागा भरण्याची विनंती केली आहे.