महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग (सीईसी) यांना पत्र लिहून महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुका लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे. “केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी,” असे या पत्रात म्हटले आहे.
उद्धव की राह होगी आसान, राज्यपाल ने EC ...
governor-koshyari-requests-ec-to-declare-elections-for-9-vacant-coucil-seats-in-state
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे ही विनंती केली आहे. 24 एप्रिलपासून राज्यात विधानपरिषदेच्या जागा रिक्त आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे निवडणूक लवकरात लवकर व्हायला हवी असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.

आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यातील प्रलंबित असलेल्या विधानसभा निवडणुका लवकरात लवकर लावण्याची विनंती केली आहे. राज्यपाल कार्यालयाने ट्विटरवर सांगितले. यात त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यातील 9 प्रलंबित जागांसाठी विधानपरिषद निवडणुका घेण्याची विनंती केली आहे.  त्यांनी आपल्या विनंतीत राज्यातील अस्थिरतेची जी परिस्थिती आहे त्याबद्दलही आयोगाला माहिती दिली आहे.

 महाविकास आघाडीचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र 


महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी राज्यपालांना एक पत्र सोपवले आणि विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका 27 मेपूर्वी घेण्यात याव्यात अशी मागणी केली. त्यानुसार राज्यपालांनी एक पत्र लिहिले. या तिन्ही पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले. याची एक प्रत राज्यपालांना देण्यात आली.

राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना संकटाच्या वेळी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशियरी यांनी विधानसभा निवडणुका घेण्याची शिफारस आयोगाला करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो.

संविधानाच्या तत्वांचं पालन करतच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारशीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो, असं फडणवीस म्हणाले आहेत.