सॅमसंग गॅलेक्सी m21 व गॅलेक्सी ए 50एस मॉडेलच्या किमतींमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे सरकारने जीएसटी च्या दरांमध्ये वाढ केल्याच्या घोषणेनंतर गेल्या महिन्यामध्ये या हँडसेटच्या किमती वाढल्या होत्या. हँडसेटच्या किमतीच्या वाढीनंतर ४ जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी स्टोरेज असलेला गॅलेक्सी m21 व्हेरियेण्ट 14222 रुपयांवर पोचलेला होता तर दुसऱ्या बाजूला ६ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 163२9 रुपयात मिळत होता. पण आता किमती कमी झाल्यानंतर चार जीबी रॅम असलेला मोबाईल 131९९ रुपये तर सहा जीबी असलेला मोबाईल १५ हजार 499 रुपयात मिळत असल्याचे कंपनीच्या वेबसाइटवर दिसत आहे.
तर कालच्या माहितीनुसार आपल्याला माहित आहे की आता लॉक डाउनचा कालावधी अजून दोन आठवड्यांनी वाढवण्यात आलेला आहे.आणि आता देशांमध्ये रेड झोन आणि ऑरेंज झोन, ग्रीन झोन असेच झोन्स तयार करण्यात आलेले आहेत . त्यानुसार अजूनसुद्धा इ कॉमर्स वेबसाइटना नोन इसेन्शियल म्हणजे अनावश्यक ज्या वस्तू आहेत मोबाईल सह वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याला हे मोबाईल घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.